विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 20 July 2020

## झीन्नत उन्निसा बेगम आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर शाहू महाराज



## झीन्नत उन्निसा बेगम आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर शाहू महाराज

दिलरस बानू बेगम व औरंगजेब बादशाह यांची मुलगी झीन्नत उन्निसा बेगम . आई पर्शिअन होती जन्म औरंगाबाद येथे ५ ऑक्टोबर १६४३ मध्ये झाला . या औरंगजेबाच्या मुलीने छत्रपती शाहू महाराजांवर मुलासारखे प्रेम केले. झीन्नत उन्निसा बेगम हिने आयुष्यभर लग्न केले नाही . बखरकार म्हणतो " बेगमने बादशहाजवळ अर्ज केला कि "माझे लग्न तुम्ही करू नये . इतिक्यावर तुम्ही जबरी केल्यावर मी प्राणत्याग करिन. मग बादशाहाने तिचे लग्न केले नाही . संभाजी महाराज यांचा पुत्र शिवाजी (शाहू ) हाच माझा पुत्र . मी याची मातुश्री . असा अर्ज केल्यावर औरंगजेब पातशाह याणी बेगम साहेब यांचा अर्ज मनास आणून शिवाजी महाराज (शाहू )याजवर मोठी कमाल मेहेरबानी करू लागले . १४ जुन १७०४ शाहू महाराजांचे लग्न बहादुरजी जाधव यांच्या मुलीशी अंबिकाबाई हिच्याशी ठरले त्या निमित्ते राजे शाहू यास मदत म्हणून तेरा हजार रुपयांचे अलंकार देण्यात आले . बहादुरजी जाधव सिंदखेडकर याने मुलीच्या अंगावर दागिने घालावे म्हणून त्याला १३०० रुपयांचे दागिने देण्यात आले . १५ जुनं १७०४ बादशहाने शाहूस मुंडावळींसाठी म्हणून १००० रुपये किमतीचा माणकांचा शिरपेच ,१३०० रुपये किमतीचा रत्नजडित कंबरपट्टा व खालतीची वस्त्रे दिली . बादशाह म्हणाले दौलत खान्यापासून बहादूरच्या तंबू पर्यंत नौबती वाजवण्यात याव्यात राजा शाहू याच्या स्वारीसाठी छत्र असलेला लाल अंबारीचा हत्ती देण्यात यावा . वरातीमध्ये पुढील मंडळींनी राजा शाहू याच्या बरोबर राहावे (१) छावणीचा कोतवाल सरबराह खान (२)नगारखान्याच्या अधिकारी मुहंमद अमीन (३)फते दौलत कौल (४)फरासखान्याचा अधिकारी मुहम्मद हादी (५)खाजगीत निरीक्षक खिदमतगार याचा नायब हाजी सुहेल (६)वरातीबरोबर हमीदोद्दीन खानची पथके राहावीत . बादशहाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली . झीन्नत उन्निसा बेगम हिने शाहू महाराजांना मुलासारखे सांभाळले . बखरकार लिहितो बेगम साहेब आपले बाप औरंगजेब पातशाहास अर्ज केला कि मी आपली लेक व हा माझा लेक म्हणवितो. शाहू महाराज हा आपला नातू. त्यास त्याने कोठे राहावे त्यास पातशाहाने काही त्या संतां करून द्याव्यात असा अर्ज केल्यावरून पादशाहाची कमाल मेहेरबानी शाहू महाराज याजवर होऊन दक्षिण देशीचे सहा सुभे राज्य इनायत सरदेशमुखी दहा रुपये शेकड्याची बाब याजला दिधली . येणे प्रमाणे सनंदा औरंगजेब पातशाहाच्या स्वहस्ते गंधाचे पज्या उठवून दिल्हे . त्या सनदेवर सिका नाही . गंधाचे पंज्या हेच सीके . त्यावेळेस महाराज यास वस्त्रे ,भूषणे व जाड जवाहीर अलंकार मोर्चलाची जोडी व हिंदू पत पातशाहीचे पद दिल्हे व बरोबर तैनातीस मोठे मोठे उमराव त्यास एक एक मार्च काचे अधिकारी त्याचे समागमे दिल्हे . १ निबाळकर फलटणकर १निंबाळकर दहिगावकर १ घोरपडे मुधळकर १घोरपडे बहादूर वडीकर १घाडगे झुंजारराव मलवडीकर १ माने म्हसवडकर १डफळे हुलजातकार असे उमराव व फौज पातशाह याने समागमे देऊन दक्षिण देशी जाण्यास हुकूम केला . नंतर मातुश्री येसूबाई ,शाहू महाराज ,ज्योत्याजीराव केसरकर (वकील )व महाराज यांचा स्वार व उमराव यांची फौज झीन्नत उन्निसा बेगम यांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या हवेलीस गेले . त्यावेळेस बेगम बोलली तुम्ही माझे लेक मी तुमची मातुश्री म्हणविती तुम्हास यश येईल व तुमचे राज्य कायम राहील . व तुमची वंश वृद्धी वाढेल असा बेगम साहेब यांनी दिलापासून दुवा दिला . या वरून झीन्नत उन्निसा बेगम हिने छत्रपती शाहू महाराज यांच्यावर मुलासारखे प्रेम केले व त्यांच्या सुटकेसाठी तिने औरंगजेब बादशहाकडे प्रयत्न केलेले आहेत असे दिसून येते. ती ७ मे १७२१ मध्ये बेगमपूर येथे मरण पावली . तिची कबर बेगमपुरा या (सांगोला -सोलापूर रोडवर ) ठिकाणी आहे . धर्म वेगळा असूनही व दुष्मनाच्या मुलावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या औरंगजेबा सारख्या धर्मवेड्या बादशहाच्या मुलीच्या (झीन्नत उन्निसा बेगम )आगळ्यावेगळ्या प्रेमाच्या कहाणी बद्दल इतिहासात फारशी दाखल घेतली नाही याचे वाईट वाटते . झीनत उन्निसा बेगम हिने छत्रपती शाहू महाराजांवर खूप प्रेम केले . शाहू महाराजांचे धर्मांतरासाठीही तिने औरंगजेब बादशहास विरोध केला . शाहू महाराजांचे लग्न लावून दिले स्वतःच्या वडिलांवर तिचा विश्वास न्हवता . म्हणून तिने लग्नानंतर शाहू महाराजांच्या पत्नीस आपले वडील औरंगजेब बाटवतील म्हणून खूप काळजी घेतली होती . महाराष्ट्राच्या इतिहासास वेगळे वळण लागले असते. आपल्या पोटच्या मुलाइतके प्रेम झीनत उन्निसा बेगम हिने छत्रपती शाहुंवर केले हि गोष्ट नाकारता येणार नाही . झीनत उन्निसा बेगम हिचे प्रेम व्यक्त करताना बखरकार म्हणतो "औरंगजेब बादशहास सांगून ७ बिघ्याचा मांडव घालोन पातशहा याणी आपण जातीने हजर राहून बहुत द्रव्य खर्चून लग्न उच्छाह दिलीस मोठा शिवाजी महाराज (शाहू ) याचा केला. जाधवराव यांनी आपले दासींची मुलगी हिरुबाई आंदण दिली . पुढे लग्न समारंभ जाहल्यानंतर पातशाहाचे भेटीस नवरा नवरी न्यायावयाची ती बेगम व ज्योत्याजीराव केसरकर वकील याणी मसलत करून खासी नवरी होती तीस महालात ठेवली. आणी त्याचे अळंकार वस्त्र भूषणे हिरुबाईचे अंगावर घालोन पदराशी गाठी देऊन हीच नवरी म्हणोन कचेरीस नेली. असा सिद्धांत केला जर करीत आम्ही खासी नवरीस कचेरीस नेली तर पातशाह याणी आपले तोंडातील तांबूल खातल्यास नवरी बाटेल .असे मनात आणोन मग शाहू राजे व हिरुबाई या उभयतांस तुळातुळण पातशाहाचे भेटीस नेली. समागमे बेगम साहेब (झीनत उन्निसा बेगम ) व केसरकर वकील हे घेऊन गेले . नंतर पातशाह याने दुरून पाहताच उभयतांकडे पाहताच सांगितले कि शाहू महाराज हि तुमची दुलंण न्हवे . हे तुम्ही कृत्रिम केले. बरे असो . म्हणोन जवळ बोलावून उजवे मांडीवर शाहू राज्यास यास बसवले डावे मांडीवर हिरुबाई हिस बसविलीं . आणी उभयतांस दुवा दिल्हा. असा अंतःकरणापासून दुवा देऊन वस्त्रे भूषणे अलंकार देऊन आपले मकानास रवानगी करून दिल्ही . "

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...