विनोद जाधव एक संग्राहक

Monday 20 July 2020

## फलटणचे निंबाळकर ##






## फलटणचे निंबाळकर ##
postsaambhar :Udaykumar Jagtap

महाराष्ट्रातील अति प्राचीन घराण्यांपैकी हे घराणे असून अस्सल राजपूत घराणे आहे .ह्यांचे मूळ आडनाव पवार असून ह्यांचा मूळ पुरुष निंबराज पवार हा उत्तर हिंदुस्थानात धार नगरीमध्ये प्रसिद्ध होता . उत्तर हिंदुस्थानात मोगली आक्रमणामुळे ते दक्षिणेत आले असावेत असे वाटते . त्यानंतर त्यांनी कुतूहल पर्वतानजीक ११ वर्ष अरण्यात राहून देवीची तपश्चर्या केली . त्यांना देवीने प्रसन्न होऊन" तू व तुझे वंशज छत्रचामराधीश होतील" असा वर मिळवला . तेंव्हा पासून त्यांनी बरेच द्रव्य मिळवले . काही लोकांना जमवून त्यांनी एक गाव वसवले त्या गावास" निंबळक " असे संबोधण्यात येते . निम्बराज्यास दृष्टांत होऊन निंबवृक्षाखाली एक देवीची मूर्ती सापडली . ती त्यांनी उकरून काढली व तेथे देवालय बांधले त्यास हल्ली निबजाई मंदिर असे म्हणतात १२९१ मध्ये निंबराज पवार मृत्यू पावले . ह्यांचे वंशज निंबळक गावी राहत असत म्हणून त्यांना निंबाळकर असे उपनाव प्राप्त झाले . निंबराज यास पोदखला जगदेवराव उर्फ धारापतराव शूर व पराक्रमी पुत्र होते . ह्यांनी दक्षिणेत मोहीम करून भरपूर लूट मिळवली . यांची कीर्ती ऐकून मुहम्मद तुघलक बादशहाने त्यांना दिल्लीस नेले. आपल्या दरबारी सरदार म्हणून पदरी ठेवले . पुढे बादशहाचे दुराणी बरोबर युद्ध झाले . त्या युद्धात जगदेवराव धारातीर्थी पडले . त्यांच्या मृत्यूनंतर बादशहाने त्यांचा मुलगा निंबराज यास निबाळक गाव व त्या सभोवारच्या परिसर साडेतीन लक्षच मुलुख जहागिरी म्हणून दिला . निंबराज बादशहाने दिलेल्या बहुमानाचा स्वीकार करून त्यांचा निरोप घेऊन दक्षिणेत आले .निंबराज यांनी आपले मुळ चे गाव निंबळक हे राहण्याचे ठिकाण न करता बाणगंगा नदीच्या काठी ठाणपे ह्या नावाचे एक खेडे होते तेथे नवीन गाव वसवून ती आपली राजधानी केली . हे आपल्या वडिलांप्रमाणेच निंबळक देवीचे भक्त होते देवीच्या दर्शनास जात असत ते १३४९ ह्या वर्षी मृत्यू पावले . त्यांच्या मागे त्यांचा मुलगा वांगंभूपाळ नाईक हा जहागिरीचा उपभोग घेऊ लागला . वांगंभूपाळ कडे मोठी फौज होती वाट्याने कर्नाटकात स्वाऱ्या केल्या होत्या .त्याचा कामराज घाडगे यांच्या जयवंताबाई हिच्या बरोबर विवाह झाला होता १३७४ मध्ये त्याच्या हात खालील एका शिलेदाराने काही द्वेषावरून वध केला . वांगंभूपाळ ज्या वेळेस मारला गेला त्यावेळेस त्याचा मुलगा बंगनपाल हा अल्पवयी होता . त्यामुळे फलटण प्रांत एका प्रबळ शिलेदाराने घेतला . तेंव्हा त्याच्या भीतीस्तव बंगनपाल ह्याची आई जयवंताबाई आपल्या मुलासह इंदापूर प्रांतातील लाकडी निंबोडी येथे राहू लागली . बंगनपाल मोठा झाल्यावर त्याने फौज जमवून फलटण प्रांतावर चालून गेला . त्याने त्या शिलेदाराचा बिमोड करून स्वतःची जहागिरी त्याच्या पासून पुन्हा मिळवली . हा फार शूर योध्या होता त्याने सातपुडा पर्वतापर्यंत स्वाऱ्या करून भिल्ल लोकांच्या टोळ्या फोडल्या सन १३९६ ह्या वर्षी दुष्काळ पडला लाखो लोकांची प्राणहानी झाली १४०० मध्ये बंगनपालचा अंत झाला त्या नंतर वनगोजीराव (१४००-१४२०)पहिले बाजी साहेब (१४३५-१४६५)पोवाररओ नाईक (१४६५-१४८०) दुसरे बाजी साहेब हे पुरुष त्यांच्या गाडीचे अधिपती झाले . १४८९ मध्ये अबुल मुझफर युसुफ याने विजापूरयेथे स्वतंत्र राज्य संस्थापित केले. त्यानंतर फलटण जहागिरीचाउदय झाला असे दिसते युसुफ याने फलटणचे प्राचीन जहागीरदार बाजीसाहेब नाईक याना अनुकूल करून घेतले व महंमद तुघलकाच्या सनदें सारखी जाहगिरीची दुमाल्यासह दुसरी नवीन सनद करवून दिली . सन १५१२ मध्ये बाजीसाहेब मृत्यू पावले . त्यांचे मागून त्यांचा पुत्र मुधोजी नाईक हे संस्थांचे अधिकारी झाले . फलटण जहागिरीचा उपभोग घेत असताना किल्ले ताथवडा उर्फ संतोषगड येथे काजीपणाचे मानापमानाबद्दल तंटा उपस्थित झाला त्या तंट्याचा निकाल करावयास गेले असता कोणी बदमाशाने त्यांचा वध केला. हि गोष्ट १७२७ मध्ये घडली . त्यांचा नंतर बाजी धारराव (१५२७-१५६०)दुसरे मालोजीराव (१५६०-१५७०)असे फलटणचे सत्ताधिकारी झाले . मालोजीराव निवर्तल्यानंतर जगपाळराव फलटणचे अधिकारी झाले कर्तृत्ववान असल्याने मोगल दरबारात वजीर त्यांना वचकून असत . याना वंगणपाळ या नावानेही ओळखत होते त्याच्या वचकामुळे "राव वनगपाळ बारा वजिरांचा काळ "अशी म्हण पडली . ह्यांच्या आश्रयाने मालोजी व विठोजी भोसले हे नावारूपास आले शिंगणापूर येथे मालोजी व विठोजी आपल्या मातोश्री बरोबर राहत होते . . दोघेजण जगपाळराव याना भेटले व बाराशे होनाची तैनात मान्य करून १५७७ मध्ये जगपाळराव यांच्या पदरी नोकरीस राहिले . दोन्ही बंधूंचे शौर्य पाहुन त्यांच्यावर खुश होऊन जगपाळराव यांनी आपली बहीण दिपाबाई मालोजी राज्याना देऊन त्यांचे लग्न केले. जगपाळराव नाईक निंबाळकर ह्यांना मालोजीराजे ह्यांच्या बद्दल अभिमान व अगत्य असल्याने त्यास वेळोवेळी साहाय्य केले . दौलताबादचे प्रख्यात मनसबदार लखुजी जाधवराव ह्यांची कन्या जिजाबाई हीच विवाह शहाजी राजे ह्यांच्याशी करण्यामध्ये व सिद्धीस नेण्यास जगपाळराव हेच कारण झाले . जगपाळराव याना युद्धाचा व शिकारीचा नाद होता . त्यामुळे त्यांची समशेर सदैव सज्य असे . त्यांचा देहही रणांगणातच१६६० मध्ये पतन पावला . त्यांच्या नंतर मुधोजी नाईक निंबाळकर हे फलटणचे अधिपती झाले शहाजीराजे यांनी त्यांचे जुने पूर्वसंबंधी निंबाळकर यांच्या सईबाई हीचा विवाह शिवाजी महाराजांबरोबर केला. मुधोजीन नंतर साबाजीराव जगदेवराव व बजाजीराव यापैकी बजाजी याना बादशहाने बंडखोर सरदार समजून देहान्त शिक्षेचा हुकूम केला . बादशहाने बजाजी निंबाळकरास बोलावून त्यास विचारले कि" जर तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारली तर तुम्हास जिवंत सोडून तुमची जहागिरी मोकळी करून देऊ" बजाजी यांनी उत्तर दिले कि" जर तुम्ही आपल्या मुलीचे लग्न मजबरॊबर करीत असाल तर मी मुसलमान धर्म स्वीकारतो" हे बाणेदार उत्तर ऐकून बादशहास राग आला त्याने आपली मुलगी देण्याचे मान्य केले . त्यांच्या बरोबर मोठ्या थाटाने लग्न लावून दिले बजाजी हे स्वरुपाने फार देखणे व सुंदर होते . ४-५ वर्षे विजापूरला राहिल्या नंतर ते पुन्हा फलटण येथे जहागिरीचा उपभोग घेण्यासाठी आले शाहजादी विजापुरातच राहिली . ती काही काळाने मृत्यू पावली . मातुश्री जिजाबाई यांनी पुन्हा शिंगणापूर येथे महादेवी नेवून शुद्ध करून जातीत घेतले . बजाजी यांनी नंतर दोन लग्ने केली . मराठा सरदारांनी त्यांना मुली दिल्या.ह्या स्त्रियांपासून त्यांना गोरखोजी ,महादजी,वाणगोजी , मुधोजी असे चार पुत्र झाले . खुद्द शिवाजी महाराजांनी आपली कन्या सखुबाई हीच विवाह बजाजीरावांचे दुसरे पुत्र महादजी यांच्या बरोबर केला . बजाजीराव १६७६ साली मृत्यू पावले . त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र वाणगोजी हे अधिपती झाले . महादजी हे नेहमी शिवाजी महाराजांच्या स्वारीत हजर असत .शिवाजी महाराजां नंतर संभाजी महाराजांचा वध झाल्यानंतर मराठ्यांच्या पाडाव करण्याच्या प्रयत्न केला गेला . त्यात महादजी निंबाळकर सापडले त्यांना ग्वालेरच्या किल्यात कैदेत ठेवले तेथे त्यांचा मृत्यू झाला . त्याची पत्नी सती गेली . तुकोजी निंबाळकर यांनी राजाराम महाराजांना चांगली मदत केली महाराष्ट्र धर्म राहावा म्हणून स्वामींच्या पायाशी चदी मुक्कामी व देशात एकनिष्ठेने सेवा केली . ह्या पुरुषाचे वंशज सोलापूर जिल्ह्यातील दहिगाव अद्याप आहेत . १६९३ साली वणगोजी नाईक निंबाळकर वारल्यापासून फलाटांची जहागिरी अद्याप चालत आहे त्यांचे जहागीरदार हे मुधोजीराव नाईक निंबाळकर हे होत . ह्यांच्या विषयी साऱ्या महाराष्ट्रात पूज्य भाव आहे .
कुळीचे नाव -----पवार वंश -----सूर्यवंश गोत्र ----अगस्ती गादी ----- धार निशाण ---------लाल ध्वजावर हनुमंत देवक--------धार उपकुळे ---------वाघ ,वानखेडे ,निंबाळकर ,धाईराव ,इंगळे ,घुमरे ,पाड ,भर ,कोरेकर ,वाघचौरे ,वाघमारे ,तोडरमल ,परमंड,गुगुळगोडे ,हारने,वाग धुबडे ,पिंगळे , ढोर , इत्यादी

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...