विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 19 July 2020

## पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ##






## पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ##

postsaambhar:Udaykumar Jagtap

होळकरांचे घराणे जातीचे धनगर .

जितकी काही खंडोबाची महास्थाने आहेत ,त्याठिकाणी पूजा धनगराची असते.

शिवलिंगास पूजा गुरवसमाजाची ,

देवीस भोप्याची .

खंडोबाचे स्थान नदीचे काठी "जेजुरीस "असून या नदीचे काठी "होळ "नावाचे गाव आहे .

ह्या गावाचा मूळपुरुष हा होळकर घराण्याचा मूळपुरुष होता .

म्हणून होळकर नाव या घराण्याला मिळाले .

होळकर घराण्याचा मूळपुरुष" मल्हारराव होळकर" हा बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याकडे फौजेमध्ये होता .

त्यांनी पुढे त्यांच्या मामाची मुलगी" गोतमाबाई " हिच्याशी लग्न केले.

.बाजीराव पेशव्यांचे एक सरदार उदाजी पवार आणि बाजीराव पेशवे यांचे वैमनस्य आल्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या करावी त्याचा बिमोड केला गेला.

तेव्हापासून होळकरांचे प्रस्थ वाढलं गेले. .अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.

त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते

. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते

अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या(कुंभेरी ) लढाईत धारातीर्थी पडले.

मल्हारराव उदास झाले .

आपली सून सती जाणार, म्हणून ते उद्गारले "बाई तू माझ्या पाठीवर आहेस,

तर अहिल्या मेली.

खंडू आहे,

हा मला भरवसा "

म्हणून अहिल्याबाईने सती जाण्याचा बेत रहित केला.

मल्हारराव यांनी मुलखीं व्यवस्था अहिल्याबाईंवर टाकली.

. अहिल्याबाईस एक मुलगा होता.

त्याचे नाव" मालेराव" मुलगी" मुक्ताबाई "

१२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले.

मल्हारराव वारल्यानंतर मुलखाचे सगळे सूत्र अहिल्याबाईच्या हाती आले.

तिचा मुलगा" मालेराव" हाही वाराला .

अहिल्याबाईंचा धर्माचा लौकिक होता .

मुलगा वारल्यानंतर पूर्वीपेक्षा धर्माकडे अधिक लक्ष देण्याचा व तुकोजी नावाच्या गोत्रजांवर कारभार सोपवण्याचा निश्चय केला

.परंतु त्या दरम्यान एक घटना घडली .

"गंगाधर यशवंत" बरेच दिवस मल्हारराव होळकरांच्या पदरी होता.

त्याने मल्हारराव होळकरांचा बराचसा मुलुख पेशव्यांना जोडण्यासाठी राघोबादादास पत्रव्यवहार केला व हालचाली सुरु केल्या .

अहिल्याबाईस हे समजताच तिच्या पदरी असलेल्या "शिवबा बाजी" व "राजाराम अंताजी" याना बोलावणे पाठवले.

व भाषण केले.

"मी बाई म्हणून असेम्हणू नका.

खांद्यावर बासंद टाकून उभी राहीन

.तेंव्हा श्रीमंतांच्या दौलतीस अवघड पडेल.!

आमचे वाडवडिलांनी भाडभवई करून दौलत मिळवली नाही.

तर तरवारीच्या अनुमाने शरीर खर्ची घेतले आहे

. आम्ही शिलेदार,

वडिलांच्या चाकरीप्रमाणे ,चाकरी घेतल्यास हजर आहे"

भोसले, गायकवाड ,दाभाडे वगैरे मराठी मंडळींना गुप्त पत्रे पाठवून सांडणी स्वार हजर करावे. असे निरोप पाठवले.

" तुकोजी यास मजपाशी आणावे .

हि कामे करावी .

मंत्रभेद ने होण्याविषयी जपावे ."

या वरून अहिल्याबाई यांची" समयसूचकता" व " वीरश्री "हे गूण किती भरले होते अनुमान करता येते .

तुकोजी होळकर उदेपुरास होता.

तो सहावे दिवशी तृतीय प्रहरी येऊन दाखल झाला.

त्याच दिवशी हजार स्वार हुजुरात दाखल झाले.

१५०० सरंजामापैकी ५०० बाणांची,

कैची सातशे,

जंबुरीयाचे उंट इतकी जमियत उभी केली .

भोसले यांच्या फौजेकडून सांडणीस्वार आला

.गायकवाडांची २०००० फौज आली .

"होळकरांचा उपकार नाही असा कोण आहे ?प्रसंगास आपले जवळचे समजावे" असे निरोप आले

. राघोबादादा यांचे हे वागणे माधवराव पेशवे याना रुचले नाही .

राघोबादादा व गंगाधर यशवंत ५०००० फौज घेऊन आले .

अशाप्रकारे अहिल्या.बाईने राघोबादादास प्रतिउत्तरदेण्यासाठी तयारी केली .

तुकोजी होळकर याने सांडणी स्वार पाठवून," शिप्रा उतरला असता,

आमची तरवार चालेल

.असा विचार करून पाऊल टाकणे".

असा निरोप पाठवला .

अहिल्याबाई होळकरांच्या पुढे राघोबादादा यांची वीरश्री बरीच गार पडली .

तुकोजीने राघोबादादास इंदूर येथे आहिल्याबाई यांच्याकडे नेले .

राघोबादादा महिनाभर इंदूर मध्ये राहिले.

" अहिल्याबाई साधारण बाई न्हवती.

मल्हारराव याने पैसे उत्पन्न करून त्याची व्यवस्था व चार माणसांचे रक्षण अहिल्याबाईने करावे .असा ओघ चालत आला होता ".

पदरच्याने कोणी आज्ञाभंग केला कि अहिल्याबाईंचा तिळपापड होई. व पायाची आग मस्तकात जाई .

"शिवबा बाजी "नावाचा एक तुकोजी होळकरांची आज्ञा घेऊन परस्पर माधवराव पेशवे यांच्याकडे गेल्यामुळे संतापलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या पदरी असलेल्या तुकोजी होळकर याची चांगलीच खरडपट्टी काढली.

शेवटी तुकोजीने झालेल्या चुकीबद्दल स्वतःच्या तोंडात मारून घेतली व म्हणाले "

" माझे सुभेदार व मातोश्री आपणच आहेत

. साक्षात आपला मार्तंड येऊन बोलिला असता आपले पायाशी अंतर होणार नाही .

मग प्राण जावो कि राहो "

अहिल्याबाई होळकर यांनी त्यांची राजधानी इंदूरहून "माहेश्वरी "नर्मदातीरी हलवली .

अहिल्याबाईस नवऱ्यापासून फारसे सुख मिळाले नाही .

मालेराव एकुलता एक मुलगा तोही लहानपणीच वाराला.

एकुलती एक मुलगी मुक्ताबाई तीही सती गेली.

अशा प्रकारे दुःखाचे डोंगर एका मागून एक कोसळले.

परंतु अहिल्याबाई यत्किंचितही डगमगल्या नाहीत .

आलीय भोगासी असावे सादर ।

देवावरी भार घालोनिया।।

या सुरेख महासिद्धांताचे पूर्णपणे अनुसरण त्यांनी केले.

अहिल्याबाईने सासरे मल्हारराव होळकरयांची आयुष्यभर सेवा केली .

तसेच कडक अश्या सासुचीही सेवा त्यांनी मनापासून केली .

या सासऱ्याचे व सासूचे आशीर्वादही त्यांनी घेतले .

राज्याचा कारभार उत्तम रीतींने सांभाळून जो वेळ राही तो पुण्य श्रवण करण्यात व देवाचे चिंतन करण्यात घालावी.

म्हणून जेव्हडी म्हणून पुण्यक्षेत्र आहेत

. तितक्यामध्ये घाट बांधलेमुळे व अन्नछत्रे घातल्यामुळे किंवा दुसऱ्या कोणत्यातरी प्रकाराने अठरापगड जातीच्या यात्रेकरूंचे व गोरगरिबांचे कल्याण केल्यामुळे सर्वांचे एकसारखे आशीर्वाद अहिल्याबाईस व होळकर घराण्यास मिळालेले आहेत .

या प्रमाणे अहिल्याबाई होळकरांचे नाव अजरामर झाले.

यवश्चन्द्रदिवाकर या साधवीच्या नावाचा लोप होणे केवळ अशक्य आहे

.अहिल्याबाई या स्त्रीजन्मास येऊन जशी उभीं कुळाची दीपक झाली तशी लोकदिपक व देशदीपकही झाली .

महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस अहिल्याबाई होळकरांचा अभिमान आहे.

प्रपंच साधूंनी परमार्थाचा लाहो ज्याने केला ।

तो नर भला भला भला ।।

हे अहिल्याबाई होळकरांना लागू होते यात शंकाच नाही .

पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली

.एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.

(इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जात.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

.वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.१३ ऑगस्ट १७९५................................

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...