विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## कण्हेरखेडचे शिंदे ##





## कण्हेरखेडचे शिंदे ##
p[ostsaambhar :Udaykumar Jagtap

बाळाजी विश्वनाथ पेशवा याच्या जवळ एक मराठा वाई देशातील" कण्हेर खेड" गावाचा पाटील सरदारम्हणून होता.
त्याचे नाव राणोजी शिंदे .
राणोजींचे पूर्वज हे औरंगजेबाच्या पदरी सरदार होते. त्या सरदारास एक मुलगी होती .
तिचे लग्न शाहू महाराजांशी बादशहाने लावले होते .
शाहू महाराज दिल्लीत असतानाच ती वारली काही दिवसांनी तिचे वडील शिंदे सरदार वारले.
कण्हेर खेडचे चे शिंदे हे राजपूत वंशापैकी आहेत .
ज्योतिबा हा त्यांचा कुलस्वामी आहे .
बाळाजी विश्वनाथ पेशवे वारल्या नंतर त्याचा मुलगा बाजीराव पेशवा झाला . बाजीराव पेशवे यांनी राणोजी शिंदे यास " करोल "म्हणून नेमणूक केली.
"करोल "हि पदवी ज्यास घोड्यावर बसून निशाण मारता येते यास दिली जात असे
. बाजीराव पेशवा झाल्यानंतर तो खान्देश व माळव्यात स्वाऱ्या करू लागला . या वेळेस राणोजी शिंदे यांनी खूप मदत केली असे दिसते
. मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे यांनी मर्दुमकी गाजवून दिल्ली नजीक झिल्ल तालवानजीक बादशहाच्या फौजेबरोबर झालेल्या लढाईत विजय मिळऊन पेशव्याना भरपूर लूट मिळवून दिली
. निजामाच्या भोपाळ नजीक झालेल्या लढाईत निजामाची रसद चहोबाजूने बंद करून त्यास बेजार केले.
बाजीराव पेशव्यास माळवा ,नर्मदा आणि चंबळ यांचे मधील प्रांत मिळवून दिले . राणोजी पुढे माळव्यात फाजलपूर येथे १७४५ मध्ये मरण पावला त्या गावास "राणोगंज "असे संबोधले जाऊ लागले
. राणोजी आपले सारे आयुष्य मोगलांपासून स्वदेश सोडवण्यात खर्ची घातले. राणोजी आणि मल्हारराव होळकरांचा चांगला स्नेह होता .
हे दोघे पुरुष थोर दिलदार व महान कर्मे करणारे होते .
ते सर्व देशास आपले कुटुंब समजत .
राणोजीच्या बायकोचे नाव" मिनाबाई "होते तीस जयाजी ,दत्ताजी व ज्योतिबा असे तीन मुलगे होते
. दुसरी बायको राजपूत होती तिचे नाव" चिमाबाई "होते
.या पत्नीस तुकोजी व महादजी असे दोन मुलगे होते.
दिल्लीच्या वजिराने रोहिला खंडातील बंड मोडण्यासाठी होळकर व जयाजी शिंदे याना बोलावले. त्यांनी बंड मोडल्यामुळे बाजीराव पेशव्याने काही मुलुख जयाजी शिंदे ,होळकर याना दिला.
सुमारे पाऊण कोटी रुपयांचा मुलुख जयाजी शिंदे याना मिळाला.
जयाजी शिंदे याने हैद्राबादचा सुभेदार यास तळेगाव येथे रोखून मोठी लढाई केली त्यावेळेस प्रथम दत्ताजी उदयास आला .
जयाजी शिंदे वारल्यानंतर त्याचा कनिष्ठ भाऊ दत्ताजी त्यास त्याची सरदारकी आली.
रघुनाथराव पेशवा लाहोरकडे स्वारीस गेला त्यासमयी त्याचे बरोबर दत्ताजी ज्योत्याजी, महादजी आणि जयाजीचा मुलगा जनकोजी असे चौघेजण होते .दिल्ली नजीक रुधिर गावी झालेल्या लढाईत दत्ताजी पडला.
काम्बीर गावी ज्योत्याजी पडला .
महादजी व जनकोजी बचावले हि लढाई १७५९ मध्ये झाली वर्षांनी सोनपत पानिपत येथे झालेल्या लढाईत जनकोजी घायाळ झाला .
त्यास शत्रूने ठार मारले.
राणोजी शिंदे यांचा वंशात फक्त महादजी व केदारजी हेच हेच वंशज शिल्लक राहिले.
महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली
, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली.
मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान .
बनले.
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते.
इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले.
पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले.
पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.

कुळीचे नाव -----शिंदे
वंश ----शेषवंश
गोत्र ------कौण्डिल्य
गादी ------सलातन संकावती
निशाण-------लाल
देवक -------मर्यादा वेल
उपकुळे --------कुऱ्हाडे ,मुंगले खोकडे

शिंदीच्या झाडाखाली जन्मले म्हणून शिंदे आडनाव पडले.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...