विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 20 July 2020

# छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर शाहू महाराज ##


# छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर शाहू महाराज ##

औरंगजेब बादशहाने १७०३ पासूनच मराठयांशी तडजोडीची बोलणी सुरु केली होती . त्यासाठी कामबक्ष औरंगजेबाजाचा मुलगा याच्या मध्यस्थीने अंतस्थ प्रयत्न चालू केले.
तडजोडीची व्यंकोजी भोसले यांचा मुलगा रायभानजी आणि दुसरा दाऊदखानच्या मार्फत आलेला शंकराजी मल्हार .मराठ्यांच्या मागण्या होत्या (1)शाहुराज्याना सोडून देणे .(2) स्वराज्य मराठ्यांच्या ताब्यात द्यावे .(3)मराठ्यांचा चौथाईचा अधिकार मान्य करावा. बोलणी फिस्कटली
औरंगजेबास वाटू लागले कि शाहूला पुढे आणणे सर्वच दृष्टीने आवश्यक आहे." तुमचाच राजा आहे . आम्ही त्याला फक्त मदत करीत आहोत "असे मराठयांना सांगायचे व कामबक्ष याच्या मदतीने दक्षिणेत त्याला स्थिर राज्याचे करायचे त्यास शाहुराज्याचे सहकार्य मिळवायचे .
अशी व्यवस्था करावयाची असा विचार त्याच्या मनात घोळू लागला . मराठयांच्या तुकड्या बादशहाच्या छावणी भोवती घिरट्या घालू लागल्या .
औरंगजेबाने शाहू राज्यांचे धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला . ९ मे १७०३ बादशहाने हमीदोद्दीन खान यास म्हणले "तुम्ही शाहूकडे जा ,त्याला म्हणावे तू मुसलमान हो "त्या प्रमाणे हमीदोद्दीन शाहूकडे गेला
त्याने शाहूला बादशहाचा निरोप सांगितलं . शाहूने त्या सूचनेला निर्धाराने नकार दिला . परत येऊन हमीदोद्दीन खानाने शाहूंचा नकार बादशहास कळवला .
. हे ऐकून बादशाह इतकेच म्हणाला "शाहूवर कडक नजर ठेवा " हि बातमी मोगल दरबाराच्या अखबारामध्ये सहज नोंदवली गेली आहे.
पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्य साधारण महत्व आहे . शाहू महाराजांना तू मुसलमान हो असे म्हणल्याचा लेखी पुरावा अखबारामध्ये मिळतो .
पण या गोष्टीचा महाराष्ट्राच्या इतिहासात उल्लेखही नाही . शाहू महाराजांनी धर्मांतराला नकार दिल्यामुळे महाराष्ट्रावरील केव्हढे मोठे संकट टाळले आहे .
शाहू महाराजांना असा ठाम निर्णय घेण्याची क्षमता व शक्ती कोठून आली असावी . त्याचा विचार करता आपले लक्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांच्याकडे जाते .
मोगलांचा छावणीत सगळे संस्कार हे मुस्लिम धर्माला पोषक असतानाही असे घडले नाही. बादशहाच्या सानिध्यात व ,निर्बंधात राहत असताना शाहू राजांच्या संस्कारक्षम वयात त्यांचा मनावर धर्मांतर करण्यास अनकूल असे परिणाम होणे काही अशक्य न्हवते .
. पण असे घडले नाही. याला मोठे कारण म्हणजे येसूबाई यांची सतत असणारी नजर हेच होय . सतत १८ वर्ष शाहू महाराज मोगलांच्या निर्बंधात होता.
त्या काळात येसूबाई सतत सावलीसारखी त्यांचा मागे होती . छत्रपती शाहूंचे रक्षण येसूबाईने महाराष्ट्राच्या जगदंबेने केले .
धर्मांतर झालेला राजा मराठयानी स्वीकारला नसता. पुढील काळात शाहू व पेशवे यांचे पराक्रम व मराठी राज्याचा विस्तार या गोष्टी घडल्या नसत्या.
शाहू नाहीत तर पेशवे नाहीत . पेशवे नाहीत तर शिंदे- होळकर नाहीत .या थोर राज्याचा हा पैलू महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी लिहिला नाही कि त्याला महत्व दिले नाही .
महाराणी येसूबाईच्या या हिंदू धर्म रक्षणाच्या कार्याचे मराठ्यांच्या इतिहासात कोठेही गंभीर नोंद घेतली गेली नाही व त्याबद्दल कोणी जास्त लिहिले नाही .
छत्रपती शाहू महाराजांनी हिंदू धर्म रक्षिला ,मोठा केला . धर्मवीर शाहू महाराजांना मनाचा मुजरा . ....

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...