विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 20 July 2020

छत्रपती शाहू

छत्रपती शाहू

छत्रपती शाहू महाराजांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे राष्ट्रात हजारो कर्तबगार माणसे निर्माण केली. व त्यांचा राष्ट्रकार्यास व प्रशासनात योग्य ठिकाणी वापर केला. त्यांचे हे कृत्य चिरस्मरणीय राहीले. सर्व जातीतील सर्व वर्गातील हजारो कुटुंबे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे पुढे आली. थोडक्यात सांगायचे तर त्यांच्या कर्तबगारीने मराठ्यांचा आजचा ईतिहास घडला आहे. कोणत्या ना कोणत्या रूपाने ही कुटुंबे आजही पूर्वजांच्या ऊद्योगाचे फळ ऊपभोगीत आहेत. विद्यमान मराठी राज्ये, सरदार घराणी, ईनामे मिळालेली देवस्थाने वगैरे बहुतेक छत्रपती शाहू कालीन आहेत. ऊदा. धनाजी व पिलाजी जाधव, संताजी घोरपडे व त्यांची कुटुंबे, नागपूरकर भोसले,चिटणीस घराणे; दाभाडे, ईचलकरंजीकर, बारामतीकर, व पटवर्धन मंडळी असे कित्येक मंडळी आहेत त्यांची नावानिशी यादी देणे शक्य नाही. शिंदे, होळकर, पवार व गायकवाड यांची राज्ये आजही आपल्या समोर आहेत. यावरून छत्रपती शाहू महाराज हे ऊत्तम "मनुष्य पारखी" होते. त्यांच्या या गुणामुळेच हजारो कर्तबगार माणसे मराठी राज्यासाठी मिळाली व मराठी राज्याचे साम्राज्यात रूपांतर होऊन त्याचे आयुष्यमान वाढले. छत्रपती शाहू महाराजांच्या कारभाराचा स्मरणीय गुण म्हणजे परहीतासाठी झटणे हा होय. शत्रुसही दया दाखविणारे अनेक संस्थाने, मंदिरे, दर्ग्यास, साधु संतास दानधर्म करणारे छत्रपती शाहू महाराज हे "पुण्यश्लोक" व "अजातशत्रू" या संज्ञानी सुशोभित होतात हेच त्यांचे महत्व. जवळ जवळ ४२ वर्षांच्या आपल्या राजकीय जीवनात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप महाराष्ट्राच्या किंबहुना हिंदुस्तानाच्या ईतिहास वर कोरली ईतके नव्हे तर या कालखंडात आपल्या प्रशासकीय व राजकीय धोरणाने मराठी सत्तेचा ऊत्कर्ष बिंदू घाटला. छत्रपती शाहूंच्या राजमुद्रेतील वाक्य त्यांची सामान्य भावना व्यक्त करणारे आहे... । श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...