विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

#जागर_इतिहासाचा #अहिल्यापर्व


#जागर_इतिहासाचा
#अहिल्यापर्व
POSTSAAMBHAR :Malati Bandgar
ज्या समाजरचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्त्रियांना ऊपलब्ध नसताना,त्या काळी या महान कर्तुत्वशालिनीने रणारागिणीने 'पती' बरोबर 'सती' न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला!! ही प्रजावत्सल महाराणी जनसामान्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी 'लोकमंगल माता' झाली!!!
संपूर्ण भारतात त्यांचे नाव श्रद्धेने गौरवले गेले आहे.अत्यंत समृद्ध अशा राज्याची स्वामींनी असूनही आपली सर्व संपत्ती लोककल्याणार्थ खर्च केली..मंदिरे,तिर्थस्थाने याना सौरक्षण दिले.
भारतीय शिल्प ,कला,साहित्य,संस्कृती याची सेवा केली.भारताच्या राज्य प्रशासनात त्यांच्याकार्याचे स्थान अढळ आहे.
या सगळ्यामध्ये आश्चर्याने थक्क करते ते त्यांचं अपार शहाणपण, मुत्सद्दीपण, ज्ञानलालसा, असामान्य तडप, हिशोबातील समूळ परंगतातता, तेज, झुंज घेण्याचा खंबीरपणा!! प्रजावत्सलता,अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रण कौशल्य , सुरक्षाव्यवस्था,गुप्तहेर खाते, राज्यकारभाराची जाण, आणि माणुसकीशी असणार घट्ट नातं!!!त्यांना खऱ्या अर्थाने "लोकमाता"आणि "पुण्यश्लोक"बनवून गेले.
जिद्द, बाणेदारवृत्ती, साधी राहणी, कल्याणकारी विचारसरणी या अनेक सद्गुणांचे,तेजस्वी वागण्याचे,पुरावे इतिहासाच्या पानोपानी आहेत. एकूण पाच जीवलगांचे मृत्यू आणि अठरा सतीच्या किंकाळ्या ज्यांनी ऐकल्या त्यांच्या वेदनांचा दुःखाचा वर्णन अशक्यच.....!तरीही ही बाणेदार स्त्री शेवटपर्यंत कुणालाही शरण न जाता कठोर कर्मयोग आचारात राहिली.त्यांच्या कर्तव्याकर्मचा पट मोठा आहे...आणि सामर्थ्य थोर आहे....
महाराष्ट्राच्या सामाजिक ,धार्मिक,जीवनावर आहिल्याबाईंचा फार मोठा ठसा आपल्याला दिसतो..आज दोनशे वर्षांनंतर ही "लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर "त्यांचे नाव ताजेतवाने आहे,,हेच त्यांच्या कर्तृत्वाचे फार मोठे गमक आहे.
अशा या सर्वगुणसंपन्न महाराणींना मानाचा मुजरा!!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...