विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी आरंभ



#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी
आरंभ
लेखक:- ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई - विनया खडपेकर
मयुर हनुमंतराव सुळ

उत्तरेच्या मोहिमेवर निघालेल्या 19 वर्षाच्या राघोबादादानी नर्मदा पार केली.खंडणी गोळा करत सुरजमल जाटाच्या मुलुखात पोहचले.संगती मल्हारराव होळकर,जयाजी शिंदे,अंताजी माणकेश्वर,गोविंदपंत बुंदेले,यशवंतराव पवार वगैरे मोठं मोठे उमराव, तेसेच आणखी काही लहानथोर सरदार पाऊण लक्ष सैनेनिशी होते. जाटाचे वकील राघोबादादा ला भेटायला आले बोलणी सुरू झाली, "चाळीस लक्ष देतो" वकील म्हणाले "एक करोड रुपये" राघोबादादाची मागणी , पुनः पुनः तीच बोलणी तडजोड होईना. वकिलांनी सुरजमल्ल जाटाला सांगितले पेशवे एकत नाहीत एक करोड रुपयांपासून हटत नाहीत, सुरजमल ही सगळ्या बाजूने ताकतवान होता त्याने भरतपूर, डिग,रामगड या किल्ल्यावरती बंदोबस्त केला आणि स्वतः कुंभेरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला,कुंभेरीचा किल्ला भला मजबूत सभोवताली रेतीच रेती जाटाला वाटले शत्रूला हा दुर्ग जिंकणे शक्य नाही, त्याने राघोबादादा यांना निरोप पाठवला चाळीस लक्ष घ्या नाहीतर युद्धाला सामोरे जा. त्यांचा संताप अनावर झाला फौज त्यांनी कुंभेरीच्या दिशेने रोखली 20 जानेवारी 1754.मराठ्यांचा वेढा कुंभेरीला पडला,मोर्चे लावले गेले,आतमधून सुरजमल ही सज्ज होता धुमचक्री सुरू झाली तोफा आग ओकू लागल्या,हा परिसर मराठ्यांना तसा नवीनच होता. दीड महिना लोटला तरीही परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता दोन्हीही बाजी तुल्यबळ होत्या. 17 मार्च 1754 .वेळ दुपारची खंडेराव होळकर भोजन करून आपल्या डेऱ्याच्या बाहेर पडले रनात असावे तसे सावधचित्त नव्हते,चालत मोर्चाच्या निषण्यापाशी आले आणि अचानक फिरत्या तोफेतून गोळा आला...आला...! त्याने खंडेरावाचा वेध घेतला.त्यांचे डोळे पांढरे झाले ते जागीच कोसळले.गतप्राण झाला. एकच हलकल्लोळ झाला. डेऱ्यातील मल्हारराव होळकरांपर्यंत वर्तमान पोहचले ते जागीच थिजले एकुलता एक पुत्र अवघ्या तिशितला गेला विजच अंगावर कोसळली सगळे लहानथोर सरदार भोवताली जमले मल्हारराव उर बडवून घेऊ लागले राघोबादादानी येऊन सात्वन केले मल्हाररावांना शोक आवरत नव्हता जाटाच्या नावाने दातओठ खात होते तेवढ्यात बातमी आली अहील्याबाई सती जायच्या तयारी करत आहेत. ताडकन उठले सून म्हणजे डावा हात तनातना करत त्यांच्या डेऱ्यात दाखल झाले."बाई, माज्या आयुष्यात आणिक उन्हाळा करतेस काय? माझी सारी दौलत,राज्याचा कारभार तूच माझा खंडू समजून मी तुझ्यावर घालत आहे.तू माझ्या पाठीवर आहेस,तर अहिल्या मेली खंडू जिवंत आहे हा मला भरवसा. माझं भाग्य कायम ठेवण तुझ्या हाती आहे.ह्या म्हाताऱ्याची तुला कीव येऊ दे." एक एक क्षण असा असतो की तो व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देतो.हा क्षण असाच होता.पोथ्यापुरानाने प्रभावित झालेल्या अहिल्याबाई सतीच्याच मार्गाने जावयाच्या.पण मल्हाररावांच्या विनवणीने त्या एकदम गलबलून गेल्या होत्या.अहिल्याबाईच्या मनात वादळ उठले पोथ्यापुराणांचे संस्कार सांगत होते,संसराचे मिथ्या मायाजाळ!सतीचे पुण्य-स्वर्गाचे दार! महापराक्रमी सासरा पुढे बसलेला. पदरात दोन लेकर दोन सवती सती चाललेल्या.काही क्षण त्या बदिर झाल्या.स्वर्गलोकी जावे का इहलोकी राहावे?मनामनात मुरलेल्या पोथ्यापुराणांनीच आतून आवाज दिला सवतीच्या पोटी संतान नाही. होळकरांच्या वंशाच्या दिव्याला तू जन्म दिला आहे. तूच त्याला वाढवायचं आहे. त्या क्षणी अहिल्याबाई उठल्या सासऱ्याची पायधूळ मस्तकी लावली.वंदन करून म्हणाल्या,"मी आपली मर्यादा उल्लंघन करणार नाही.जसे कुरुक्षेत्रावरती भगवान कृष्णाचे शब्द अर्जुनाला तसे आपले शब्द मजला!" सूर्य अस्ताला गेला करकरीत तिन्हीसांज झाली चीता रचली गेली प्रचंड जनसमुदाय जमला खंडेरावांच्या इतर दोन पत्नी सती गेल्या त्यात त्यांची आवडती कुत्री गुलबदन हिनेही चितेत उडी घेतली. खंडेरावांची उत्तरक्रिया झाली प्रचंड दानधर्म करून कुंभेरी येथे त्यांची छत्री उभारण्यात आली. परंतु मल्हाररावांनी मनात विषद होताच,त्यांनी त्वषाने प्रतिद्या केली, "सुरजमल जाटाचा शिरच्छेद करीन आणि कुंभेरीची माती यमुनेत टाकीन.तरच जन्मास आल्याचे सार्थक.नाहीतर प्राण त्याग करेन." ही बातमी जाटाच्या कानी पोहचली जाट घाबरला आणि शिंद्याना शरण गेला, राघोबादादानी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि जयाजी शिंदे यांच्या डेऱ्यात आले त्यांच्या हाती साठ लक्ष देऊन जाटाशी सलोखा केला. मग राघोबादादा दक्षिणेस देशी निघाले, जयाजी शिंदे मारवाड ला गेले.ह्या सर्व गोष्टी अहिल्याबाई पुढे घडत होत्या त्यांना ह्यातून खूप काही शिकायला मिळतं होते. मल्हारराव इंदूर ला परत आले त्यांच्याबरोबर अहिल्याबाई ही इंदुरी परतल्या.......

#अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...