विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## मोहिते ##



## मोहिते ##
postsaambhar :Udaykumar Jagtap
मोहिते मुसलमानी अमदानीत उदय पाऊन मराठेशाहीत प्रख्यात झालेले असे प्राचीन हिंदू घराणे मोहिते हे एक होय फारसी तबारीख(खुलासत उल दिल्ली , बुसातीनेसलातीन ) यामध्ये या घराण्याचा उल्लेख आढळतो . मोहिते हे दिल्लीचे प्राचीन राजपूत चव्हाण राज्याचे वंशज होते असे दिसून येते . हिंदुस्थानात मुसलमानांच्या आक्रमणामुळे या घराण्याचे वंशज राजपुतान्यात हाडोती प्रांतात राहिले . म्हणून त्यांना हाडे हे नाव पडले . पुढे हाडे चव्हाण दिल्लीच्या मुसलमान बादशहाच्या कारकीर्दीस उदयास येउन आपल्या रणशौर्यानें बादशहास संतुष्ट करून बादशहाकडून मोठमोठ्या किताबीती व राजचिन्हे मिळवली . त्याच वेळेस त्यांना मोहिते हा 'किताब मिळाला."" मोहिते "हा अरबी शब्द असून त्याची उत्पत्ती हि मोहीम या शब्दापासून झाली आहे . मोहिते याचा अर्थ "रण जिंकणारा" "विजयी "असा आहे . हे घराणे पुढे उत्तरेतून दक्षिणेत आले . व दक्षिणेतील मुसलमानी रियासतीमध्ये नावलौकिकास चढले . या घराण्यातील रंगराव चव्हाण मोहिते नामक विजयनगरच्या रामराज्याशी झालेल्या तालिकोटच्या लढाईत १५६४ साली मुसलमानांच्या लढाईमध्ये लढत होता. असा उल्लेख सापडतो . विजापूर व अहमदनगर या दोन बादशाहांच्या अमलामध्ये ह्या घराण्यातील अनेक युवक स्वातंत्र्य व प्राबल्य अनुभवत होते. शहाजी भोसले यांनी मोहित्यांची कन्या तुकाईबाई हिचे बरोबर आपला दुसरा विवाह केला. तुकाईच्या वडिलांचे नाव बाजी मोहिते होते . १६४६ मध्ये बाजी मोहिते हा पुण्यातील सुपे महालाचा अधिकारी असून तो ३०० घोडेस्वार बाळगून शहाजीच्या वतीने विजापूरच्या बादशहाची एकनिष्ठ सेवा करीत होता . असा उल्लेख सापडतो . शिवाजी महाराजांनी सुपे प्रांत घेतला त्यावेळेस त्यांनी बाजी मोहिते याना आपलेसे करून घेण्याचा प्रयत्न केला .पण ते वश न झाल्याने त्यांना कैद करून कर्नाटकास पाठवून देण्यात आले. पुढे शिवाजी महाराजांनी त्यांना अनकूल करून घेतले . हंसाजी मोहिते हा मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष शिवाजीस साहाय्यास आलेला दिसतो त्याने आपले अप्रतिम कौशल्य दाखवून शिवाजी महाराजांना प्रसन्न केले . शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव हा 'किताब व सरनोबत हे सेनाधिपतीचे मुख्यपद अर्पण केले. मोहिते घराण्यास मराठ्यांच्या इतिहासात खूप मोठे स्थान प्राप्त झाले मोहिते घराण्याचे व शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष शरीर संबंध आला असल्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांबद्दल अगत्य व कळकळ उत्पन्न झाले असे दिसते . शिवाजी महाराजांची दुसरी बायको सोयराबाई हि मोहित्यांची मुलगी होती .

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...