शिवरायानंतर गेल्या साडे तीनशे वर्षात जगभरात अत्यंत स्वाभिमानाच्या अस्तित्वासाठी जेवढ्या लढाया झाल्या त्यात सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दनीतीचाच अवलंब केला आहे. त्यात नेपोलियन बोनापार्ट, अँडाँल्फ हिटलर, मसोलिनी, फी डेल कँस्ट्रो, माओ-त्से-तुंग, हो चिमिन्ह, एलटीटीईचे प्रभाकरन, नेताजी सुभाषचंद्र बोस, इस्त्रायल, लेनिन, ट्राँटस्की, डाँ. चे गव्हेरा, विनोद महातो अशा अनेकांचा समावेश आहे.
शिवरायांचे मुलभूत युध्दतंत्रातील तत्वे अत्यंत प्रभावी आहेत.शत्रूवर जरब बसवणे, शत्रू बलाढ्य असल्यास त्यास जेरीस आणणे, प्रत्यक्ष सामान्य सैनिकांचे नुकसान न करता त्यांचा प्रमुख सेनापती यावरच हल्ला करुन सैनिकांना मानसिक दडपणात ठेवणे, कोणत्याही हल्ल्यात आपले शुन्य अथवा अत्यल्प नुकसान होईल याची काळजी घेणे, अत्यंत प्रभावी व कार्यक्षम हेरखाते, सुक्ष्म परंतु कृतिशील नियोजन, युध्दभुमी शत्रुची निवडणे, शत्रु खिँडीत पकडणे, स्वत; च्या प्रत्येक सैन्यास आपलीच प्रतीमा वाटावी एवढे साहस व विश्वास देणे.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी अनेक लढाया कराव्या लागल्या ;
परंतु सर्वच लढायात त्यांनी विजय मिळविला.विजयानंतर शरण आलेल्या व मृत
झालेल्या शत्रू सैन्याची कधीच विटंबना केली नाही.तसेच एका लढाईत वापरलेले
युध्दतंत्र पुन्हा कधीच वापरले नाही.त्यामुळे शत्रूला सावरताचा आलेले
नाही.सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराज स्वत; जीवावर बेतणा-या अनेक निर्णायक
लढायतात केवळ सामीलच होत नसत ;
तर सर्वात पुढे असत.गेल्या पाचशे वर्षात जगभर झालेल्या विषम लढ्यांपैकी शंभर लढ्यांची यादी इंग्रजानी तयार केली आहे. विषम म्हणजे एका बाजुकडे अल्प सैन्य व ताकद; तर दुस-या बाजुकडे प्रचंड सैन्य, युध्दसामग्री, पैसा, सत्ता अशी मोठी ताकद. यामध्ये शिवरायांच्या तीन लढायांची नोँद असून क्रमांक एक वर छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान भेटी प्रसंगीचा लढा आहे.
या शिवाय कोकणातील खंदेरी
खिँडीतील मोगल सरदार सावित्री उदाराम देशमुख व करतलबखान यांचा लढा आहे,
तिसरा प्रसंग आहे लाल महालातील लाखभर फौजेच्या गराड्यात लालमहालात घुसून
मोगल सरदार शाहिस्तेखानाची बोटे छाटणे...
ह्या तिन्ही प्रसंगात स्वत: महाराजच प्रमुख होते म्हणुन अनेक योद्ध्यांचे प्रेरणास्थान जगभर छत्रपती शिवाजी महाराजच आहेत.
साभार- sambhaji_maharaj
@संकलित
चित्र:- @dishant7159
No comments:
Post a Comment