## मिरकर सावंत उर्फ साळुंखे ##
postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप
कोकणातील मिऱ्या ,झाडगाव, रत्नागिरी, नाचणे ,शिवरे या चार गावात "सावंत साळुंखे" ह्या उपनावाचे मराठे आहेत.
ते "सोळंकी उर्फ साळुंखे" वंशाचे कल्याण येथे जे राजे झाले .
त्यांचे वंशज होत.
चालुक्य उर्फ सोळंकी वंशाचे कुळ गोत्र या साळुंखे या गोत्राचे आहे.
सातारा जिह्यातील पाटणचे "पाटणकर साळुंखे "हे याच वंशातील असून ते
या गावातील साळुंख्यांचे भाऊबंद आहेत .
यांचा मूळ पुरुष "सोरबाजी साळुंखे"" हे विजापूरच्या दरबारातून
कोल्हापूर प्रांतातील "शिरगाव" या गावी नेमणुकीवर होते .
त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र "तुकबाजी "व" रामराय" साळुंखे
याना बादशाहने बोलावून, कोकणात जे पठाण लोक रयतेस त्रास देत होते.
त्यांचा बंदोबस्त करण्यास रत्नागिरी येथे पाठवले.
त्या प्रमाणे त्यांनी रत्नागिरीस येऊन पठाणांबरोबर लढाई करून ,
त्यांना मोठ्या शौर्याने जिकले. किल्लेदार "अनंतसिंग उर्फ रातनसिंग" यास
कैद्यकरून बादशहासमोर उभे केले . बादशाहने त्यांना खुश होऊन "सामंत
(सावंत)"ही पदवी
देऊन मोठ्या सन्मानास चढवले
शिवाय रत्नागिरी येथील बंदोबस्ताचे काम त्यांच्यावर सोपवले .
त्यांना कायमचे कोकणात पाठवून दिले
त्यावेळी ते रत्नागिरी जवळील झाडगाव येथे राहिले.
त्यावेळी रत्नागिरी मुलुख त्यांच्या ताब्यात होता.
यांचे वंशज
मिऱ्या
झाडगाव
नाचणे
शिवरे
रत्नागिरी
येथे राहतात.
यांचे पुढे रत्नागिरी जवळील "शिरगाव" येथील सरदार पवार यांच्या मुलीशी विवाह झाल्याने शिरगाव आंदण मिळाला.
या कुळाची माहिती आणखी एक बखरीत मिळते.
ती या प्रमाणे,
विजापूरचे कल्याण सुभ्यातून प्रतापराव हैबतराव व जगपाळराव बिन तुकोजीराव साळुंखे
हे तिघे बंधूं सुमारे 5000 सैन्य घेऊन सातारा प्रांती आले
त्यांनी शौर्याने पाटण परगणा सर केला.
या सफरीमध्ये जगपाळराव हे अति थकव्या मुळे पाटण येथे राहिले
इतर दोघे प्रतापराव व हैबतराव हे कोकणात बंदोबस्त करीत
रत्नागिरी येथे तळ देऊन राहिले.
त्या ठिकाणी बंदोबस्त करीत असता चकमक झाली.
त्यात हैबतराव धारातीर्थी पडले .
प्रतापराव यांनी आपली कुलस्वामिनी "जोगेश्वरीच्या" देवीची स्थापना करून आपल्या भावाची मूर्ती तिच्या समोर बसवली.
आशा प्रकारे या पराक्रमी घराण्यातील आणखी एक पुरुष "छत्रपती प्रतापसिह" यांचे कारकिर्दीत उदयास आले
त्यांचे नाव "पुतळाजीराव बाबाजीराव साळुंखे"
त्यांना दुय्यम सेनापती व पालखीचा मान होता .
## साळुंखे उर्फ अनेराव ##
संगमेश्वर पासून 14 मैलावर "आंगवली "नावाचे एक गाव आहे
त्यापासून जवळच" निगुरवाडी "नावाचं गाव आहे.
तेथे "महिपतगड" नावाचा किल्ला आहे .
या गडावर अनेराव हे सरदार होते .
या गडाच्या जवळ मराठ्यांची वस्ती नसल्यामुळे त्यांना या गडाजवळ वस्ती साठी पाठवण्यात आले.
किल्ला त्यांच्याकडे सोपवण्यात आला .
हे अनेराव पाटण तालुक्यातील पाटणकर साळुंखे यांच्या शाखेतील आहेत .
त्यांच्याकडे" आंगवली सोनारवाडी सह बारा गाव होते ."
देवरुख पासून जवळ असलेले "मार्लेश्वर देवस्थान "हे त्यांच्या मालकीचे होते .
हे देवस्थान त्यांना "अकबर बादशाहने "इनाम दिलेले आहे.
देवरुख जवळ "मुरादपूर" नावाचे गाव आहे.
"मुरादखान "या सरदाराने स्वारी करून तेथील लोकांना बाटवण्याचा सपाटा लावला.
त्यावेळी "मालोजी" व "शिवाजी "अनेराव उर्फ साळुंखे हे महिपतगड यावर किल्लेदार होते.
त्यास ही हकीकत समजताच आपल्या सैन्यासह त्याच्यावर हल्ला चढवला.
घनघोर युद्ध झाले.
त्याचा पराभव केला .
सरदार मुरादखान यास पकडून त्यांनी ठार केले.
यास ज्या ठिकाणी पुरले त्या गावास "मुर्दापूर" हे नाव पडले .
"अनेराव "ही साळुंख्याची पदवी आहे .
परंतु हे लोक "अनेराव साळुंखे "असेच नाव लावतात .
## साळुंखे उर्फ इंदप ##
हे कुळ साळुंखे घराण्यांपैकी आहे .
यांचा मूळ पुरुष हा" इंदापुरीस "( जिल्हा पुणे) राहिल्यामुळे
मूळ "साळुंखे "हे आडनाव नाव नष्ट होऊन,
इंदापुरीचे" इंदप" हे आडनाव झाले.
"छत्रपती राजाराम महाराज" यांच्या करकीर्दीमध्ये या घराण्याचा एक पुरुष" साळशी महाल"
मधील "कोळोशी (कळशी)" या गावी जकात वसुलीसाठी आला होता .
त्यावेळी तो कोळोशी(कळशी) या गावी त्याचा एक भाऊ वस्ती करून राहिला .
काही दिवसांनी तोतयांचे बंड मोडून काढण्यासाठी इंदपानी इंदापुराहून फौज घेऊन त्यांचा वर हल्ला केला .
त्यांचा पुरता बिमोड केला.
त्यांनीही कोळोशी (कळशी)गावी मुक्काम केला.
हे घराणे कोळोशी( कळशी) येथे स्थायिक झाले.
ह्या घराण्यातील पुरुष सोलापूर मधील किल्ल्यावर किल्लेदार असल्याचे कागदोपत्री आढळून येते .
"साळुंखे" या ऐतिहासिक घराण्यातील काही घराण्यांची माहिती दिली आहे
👍
ReplyDeleteअप्रतिम माहीती....😊👌
ReplyDelete