विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## ढवळचे राजे पवार ##



## ढवळचे राजे पवार ##
postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप

इ. स. 1300 सालानंतर "आबु "येथील पवार घराण्यातील एक पुरुष दक्षिणेत आला. त्याचे नाव "राजा रणधवल "हे होते. त्याने "ढवळ "हा गाव वसवले. ह्या राज्याच्या वंशाजस ढवळचे पवार म्हणतात. त्याने फलटण व ढवळ येथे काही मंदिरे बांधली . तसेच ढवळ गावी वाडा बांधला . त्याला" राजाचा वाडा" म्हणतात . यावरून ढवळच्या पवारांचे घराणे खूप पूर्वीपासून प्रसिद्धीस पावले व पराक्रमी होते. असे दिसून येते दक्षिणेत दुर्गादेवींचा दुष्काळ पडला व तो सतत 12 वर्ष चालला. त्यामुळे पवारांची जहागिरी नष्ट झाली व ती गेल्याने पवारांची वाताहत झाली . त्यावेळी पवार कुटुंबापैकी एक मूल शिल्लक राहिले. त्याचे नाव "चांगोबा "त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी ढवळ गाव सोडला.
तिकडे बरीच वर्षे काढल्यानंतर त्या जहागिरीचा भोक्ता दुसराच इसम झाला. तो ढवळ गावापासून जवळ असलेल्या" पांगरी" गावचा होता . त्याचे नाव "लोखंडे" होते. गुरे चरण्यासाठी लोखंडे ढवळ येथे येत असत ह्या पांगरी गावची पाटीलकी लोखंडयांकडे होती.ढवळ गावचे पवार घराण्यातील पुरुष लोक शूर होते. त्यांना आपल्या गावी परत जाण्यास व लक्ष घालण्यास वेळ मिळाला नाही . काही दिवसांनी आपले वतन बळकवल्याचे त्यांच्या लक्षात आले . तेव्हा त्यांनी 1629 मध्ये विजापुरी दरबारी त्याविरुद्ध दाद मागितली . न्याय निवड किल्ले तथावडा येथे झाला पवार घराण्याचे" झिंगोजी पवार "यांचा हक्क शाबीत झाला त्यांना 1629 मध्ये ढवळची पाटीलकी मिळाली पवार पाटीलकी करू लागले . सन 1644 मध्ये मुधोजी नाईक निंबाळकर यांनी बंड करून विजापूर दरबाराशी युद्ध केल्याने या घराण्यास ढवळ गाव सोडून दुसरीकडे वसाहत केली. ते "नांदवळ" येथे येऊन राहू लागले . त्यावेळेपासून पवार यांचे वंशज नांदवळ येथे राहू लागले. महाराजांच्या पूर्वी पवार यांचे वाडे, जमिनी व बागा लोखंडे यांच्या ताब्यात गेल्या. पवार यांनी एका डोंगराचे माथ्यावर सोईस्कर जागा पाहून वसाहत केली. या जमिनी करांजखोप व सोनके गावच्या धुमाळ यांच्या होत्या पवार व धुमाळ यांच्यात तंटा झाला. "धायगुडे "यांनी पवार यांना मदत केली "वसना नदीकाठी" पवार यांनी तळ दिला . त्या ठिकाणी "नांदूरकीचे" झाड होते . तेथे पवार यांनी वस्ती केली. त्या ठिकाणास" नांदवळ" हे नाव प्राप्त झाले . ते गाव पवार यांच्या वेतनाचे झाले 16व्या शतकापासून ढवळच्या पवार घराण्याचे पुरुष फलटणच्या निंबाळकरांकडे होते. नंतर शहाजी राजे यांच्या पदरी राहिले. पवार घराण्याने स्वराज्याची पुष्कळ पिढ्या सेवा केलेली दिसते . त्यावरून भोसले यांनी बारा गावची बक्षीसी दिल्याचे कागदोपत्री आढळते आहे. अक्कलकोटकर भोसले यांच्याकडे सरदार असलेले तुळजाजी व सुल्तानजी पवार याच घराण्यातील होत. अक्कलकोट कर" शहाजी भोसले "निवर्तल्यानंतर "फत्तेसिंग भोसले" गादीवर बसले. त्या वेळेसही पवार त्यांच्याकडे असल्याचे कागदपत्रांवरून समजते. नांदवळ गावामध्ये पवार यांचे वास्तव्य गेली 350 -400 वर्षा पासून आहे हे कागदोपत्री पहावयास मिळते . वाई देशात जे पवार गेले ते "व "वाघ पवार "होत . "वाघेश्वर "हे पवार यांचे कुलदैवत होते. ढवळ सोडल्यावर ते सुटले. वाघेश्वराचे भक्त म्हणून वाघ पवार झाले. नांदवळ च्या पवार घराण्यांपैकी सक्रोजी, महिमाजी , पवार हे सातारच्या गादीकडे सरदारकी करीत होते. त्या नंतर निंबाजी व हैबतराव . नंतर विठोबा हे सातारच्या गादीची सेवा करताना दिसून येतात .हैबतराव यांचे चिरंजीव" सागो अप्पा" होते. ते बाजीराव पेशवे यांचे बरोबर होते व त्यांची नेमणूक मानकऱ्यांमध्ये केलेली दिसून येते. आशा प्रकारे नांदवळ येथील पवार घराण्याने स्वराज्याची अखंडपणे सेवा केलेली दिसून येते. आपल्या परीने पवार घराण्यातील पुरुषांनी घराण्यास यश,कीर्ती,संपत्ती, संतती ,बल व ऐश्वर्य प्राप्त केले आहे.
## कुत्रीची छत्री ##
पवार नांदवळ गावी वास्तव्य करीत असता त्याच्या वंशजांपैकी आबाजी व निंबाजी हे शिरगाव खिंडीने बहिणीकडे गेले असता त्यांना करांजखोपकर यांनी जुन्या वादातून एकटे गाठून मारेकरी घालून ठार मारले . या वेळेस पवार यांचे बरोबर त्यांची इमानी कुत्री होती. ती नांदवळ मुक्कामी पळून आली . धन्यास एकटी सोडून कुत्री एकटी येणार नाही. हे समजून सर्वजण कुत्रीच्या मागे मागे जाऊ लागले . ती जिकडे जाईल त्या दिशेला जाऊ लागले. तिने सर्वाना खिंडीत शवाजवळ नेले व प्रेताजवळ उभी राहिली . त्या ठिकाणी प्रेतावर प्रेतसंस्कार केले. त्या ठिकाणी कुत्रीनेही प्राण सोडला . ही तिची स्वामी निष्ठा पाहून सर्वाना आश्चर्य वाटले. त्या ठिकाणी तिची "छत्री' बांधण्यात आली .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...