विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी सत्तेवर आरूढ

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी
सत्तेवर आरूढ
संदर्भ: ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई- विनया खडपेकर
:मयुर हनुमंतराव सुळ

मालेरावांचा मृत्यू झाला.अहिल्याबाईंच्या कृपेने इंदुरातले जीवन. सुरळीत चालू होते.वाड्यातील दिनक्रम नित्याचा चालू होता.पण अहिल्याबाई अजुन खिन्न होत्या.त्यांच्यात नेहमीचा उत्साह,आणि झपाटा दिसत नव्हता.मात्र राजकारणात मुरलेल्या अहिल्याबाईंना जनतेच्या,सरदारांच्या मनात काय चालले होते,याचा अंदाज येत होता. वारसाचा प्रश्न कसा निकालात निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष होते.याची अहिल्याबाईंना जाणीव होती.परंतु त्यांनी स्वतःहुन कोणाशी काही बोलल्या नाहीत.इतर सरदारांच्या प्रतिक्रिया आजमावत,त्या पेशव्यांच्या निर्णयाची वाट पाहत होत्या.त्यांना दिसत होते शेजारच्या राज्यातले सगळे शिंदे धारातीर्थी पडले.एकटे महादजी लंगड्या पायाने परत आले.ते दासिपुत्र कारभार पाहत होते.अजुन त्यांना वारसाचा अधिकृत हक्क पेशव्यांकडून मिळाला नव्हता.अहिल्याबाईंना वाटत होते.आमच्या ही वारसाचा प्रश्न पेशवे असाच टांगत ठेवणार?हिंदुस्थानातील एकही पान होळकरांच्या मर्जीशिवाय पेशवे हलवू शकत नाहीत याची अहिल्याबाईंना पुरेपूर जाणीव होती.सुभेदार मल्हारराव यांच्या निधनानंतर खुद्द माधवराव पेशव्यांनी विठ्ठलराव शिवदेव यांना लिहले होते,"मात्तबर सरदार मोठे दाबाचे होते.ईश्वर इच्छा पुढे उपाय नाही. शिंद्यांची सरदारी मोडीस आली.होळकर तिकडे होते.तेनेकरून वचक होता". अहिल्याबाईंना काही चाललेलं आहे याची त्यांना सतत चाहूल लागत होती, काळ जरी अस्थिर असला तरी त्या नवीन निर्णय घेत होत्या,कामे पार पाडत होत्या.घराण्यातील तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाला होता.त्यांना आत्ता इंदूरला होळकर वाड्यात राहणे नकोसे वाटू लागले.म्हणून नवीन राजधानीचा शोध सुरू झाला. नर्मदेकाठचे महेश्वर हे गाव पाहताच त्या हरखून गेल्या.नर्मदा नदीचे केवढे रुंद पात्र! दाट झाडी!भुईकोट किल्ला! मल्हारराव यांनी काही वर्षांपूर्वी महेश्वर वसवले होते.ज्योतिषी,ब्राम्हण इत्यादींना विचारणा करून त्यांनी तेच स्थान राजधानीसाठी सुनिश्चित केले. प्राचीन साहित्यात महेश्वर चा उल्लेख महिष्माती म्हणून आहे.रामायण,महाभारत,पुराणे,बौद्ध धर्मग्रंथ आणि सुप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनात सर्वत्र या नगरीचा उल्लेख आहे.या नगरीचे महत्त्व जाणून घेऊन मल्हारराव यांनी 1745 मध्ये एक आज्ञा काढून महेश्वर नगरी उत्तम प्रकारे वसवण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करण्याची द्वही फिरवली. होळकरांच्या वारसाचा प्रश्न अजून निकालात निघालेला नव्हता.परंतु अहिल्याबाईंनी किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्याच्या आतमध्ये एक साधाच वाडा बांधला.अहिल्याबाई महेश्वर निवासिनी झाल्या. हे सर्व सुरळीत चालले असताना आणि आनंदित वातावरण होते.इकडे होळकरांचे दिवाण गांगोबतात्या यांच्या डोक्यात निराळीच चक्रे फिरू लागली.मल्हाररावांचा उजवा हात तुकोजी होळकर दूर उदेपुरच्या आसपास होते.राघोबादादा अजुन मुलुखगीरी करीत,कर्ज निवाळण्याच्या चिंतेत माळव्यात हिंडत होते. गंगोबातात्यानी राघोबादादा ना लिहले," बाईसाहेब शोकार्णवात.दौलत बेवारस झालं.आपण सुभेदारांचे चिरंजीव मानले जात होतास,हे सर्वांना माहीत.आपण दरमजल येऊन दौलतीचा कारभार समेटावा.येथे सर्वच दुःखात आहेत.आपले सत्वर येणे समायोजित आहे". गंगोबातात्यांचा हिशोब होता,दादासाहेबांना आता पैश्याची गरज होती,शिवाय ते पेशव्यांचे थेट काकाच,त्यांनी मनात आणलं तर बेवारस झालेले होळकरांचे राज्य ते ताब्यात घेऊ शकतात,काका पुतण्या अटीतटीला आलेले आहेतच,ह्यांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. अहिल्याबाई ही काही कमी नव्हत्या,त्यांची गुप्तहेर यंत्रणा ही तेवढीच तत्पर होती, गांगोबतात्याचा निरोप राघोबादादा ला गेला आणि राघोबादादा महेश्वर ला निघाले आहेत याची बातमी लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचली.आधीपासून सावध असलेल्या अहिल्याबाई यांनी वेगाने पाऊले उचलायला सुरुवात केली. मल्हाररावांच्या विश्वासातले तुकोजीराव होळकर उदयपुर जवळपास होते त्यांनी त्यांना निरोप धाडला," फौज जेथील तेथे कायम ठेऊन,तुम्ही जेवित असल्यास पाणी प्यावयास येथे अम्हापाशी यावे" त्यांना माहीत होते सध्या माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात संबंध चांगले नाहीत त्यांनी ही वार्ता लगेच माधवराव पेशव्यांना कळविली. अहिल्याबाईंनी स्वतः कारभार करण्यासाठी अधिकार सूचकपणे मागितला होता.तुकोजीसाठी सरकारी चाकरी करण्याचा थेट अधिकार मागितला होता. राघोबादादा उज्जौनला येऊन पोहोचले, गंगोबातात्यानी आपला बेत एकवला."गंगाजल निर्मळ मातोश्री अहिल्याबाई यांचे कर्तृत्व डोंगराएवढे पण बाई सुभेदार तर होऊ शकत नाहीत.तस्मात् दत्तक आवश्यक आहे.दत्तकाच्या वतीने आम्ही कारभार पाहण्यास हाजिर आहोत."त्यांना हा मनसुबा राघोबादादाला भलताच पसंद पडला त्यांचा घोडा अकस्मात उडू लागला.त्यांना वाटले,बाई करून करून काय करू शकते?थोडा आक्रमक पवित्रा घेतला.बाई हतबल होईल संमती देईल. तिकडे मातोश्री यांची पत्रे मराठे सरदारांना पोहचल्यावर हलचल सुरू झाली.दरबारातील होळकरांचे वजन आणि अलोट संपत्ती सर्वांच्याच डोळ्यात खुपत होती,पण हे प्रकरण विचार करण्यासारखे होते कारण ही वेळ उद्या आपल्यावरती येऊ शकते.सर्वांनी अहिल्याबाईंची तळी उचलून धरली.मुळात ठाम असलेल्या अहिल्याबाई यांना अजुन बळ मिळाले. दिवाण गंगोबतात्या खुशितच अहिल्याबाईंकडे पोहोचले,त्यांनी बोलायला सुरुवात केली. "गंगाजल निर्मळ मातोश्री दुःखरनवी आहेत.दौलातीचा व्याप चोहो दिशांनी पसरला आहे.तो समेटण्यास खावंद मुद्दाम आले आहेत.कैलासवासी सुभेदारांना दादासाहेब पुत्राच्या ठिकाणी होते.हे सर्वश्रुत आहे. दादासाहेबांचां सलाह एसा जे मातोश्री नीं दत्तकास अनुमती द्यावी.दादासाहेब सर्व पाहण्यास समर्थ आहेत.रितीप्रमाने दादासाहेबांना नजराणा देणे घडेलच, मातोश्रींची निवासाची,देवधर्माची सर्व व्यवस्था अनुकूल होईल.काही कमी पडू नये ऐसे खावंद पाहतील.खातरजमा असावी." अशी प्रस्तावना केली. अहिल्याबाई काही क्षण शांत होत्या.पण गंभीर होत्या.मग सिंहगर्जनेच्या ठाम स्वरात शब्द उमटले,"आम्हाला हे बिलकुल मंजूर नाही.कैलासवासी सुभेदारांच्या वारसातल्या एकाची नी पत्नी आहे आणि दुसऱ्याची माता आहे.दत्तक वारस निवडायचाच तर तो आमचा अधिकार आहे.खुद्द पेशव्यांनी त्यात ढवळाढवळ करणे नाही.मग खावंदाना नजराणा कशासाठी? हे शब्द एकूण त्यांच्या तोंडून शब्दाचं उमटले नाहीत,सिंहगर्जना एकु आली की कोल्ह्याला कुई कुईं करणेही सुचत नाही.ते आल्या पावली माघारी फिरले. पेशव्या घराण्यातील बड्या असामीचा घोर अपमान झाला. सर्व मराठे सरदार विरोधात होते.महादजी सांगत होते "खावंदाणी मातोश्रींच्या वाटेला जाऊ नये" बाकीचे सरदार त्यांची री ओढू लागले.तरी राघोबादादा पाय मागे घेत नव्हते.ते हवा तापवतच होते.वार्ता येत होत्या राघोबादादा चढाई करून येणार. अहिल्याबाई ही खमक्या होत्या.आपल्या पाठीशी असलेल्या मराठा सरदारांची शक्ती त्या जोखून होत्या.त्यांनी राघोबादादा ची खोडकी मोडायला एक बेत आखला.त्यांनी राघोबादादा ला भेटायला जायचे ठरवले.त्यांचा आवडता हत्ती सजू लागला,सगळ्या तयाऱ्या झाल्या. त्या हत्तीवर स्वार झाल्या स्वारी निघाली महेश्वर वरून उज्जैन कडे.राघोबादादाची माणसे रस्त्यात पेरली होती.हत्तीवरून निघालेल्या आपल्या ह्या राणीला जनता कौतुकाने पाहत होती. गावगावचे पाटील ,कुलकर्णी,देशमुख,पोतदार,चौगुले,सर्वजण सामोरे येत होते.मुजरे करत होते.मातोश्रींच्या नावाचा जयघोष होत होता.फुले उधळली जात होती.नारळ ओवाळून टाकले हात होते.राघोबादादाच्या चमूने ही अगतस्वागतची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली.त्यांच्या आजूबाजूची माणसे अजुन पण माघार घेण्याचा सल्ला देऊ लागली.परिस्थिती आपल्याला अनुकूल नाही,हे राघोबादादा नी ताडले.आपले पुतणे माधवराव पेशवे आपल्याला साथ देणे शक्य नाही याचाही त्यांना अंदाज आला.मग त्यांचा पवित्रा बदलला. अहिल्याबाईंचा हत्ती मुक्कामी पोहोचला.राघोबादादा सामोरे आले.भोवती इतर मराठे सरदार जमले.दोघे अमोरेसामोरे बसले. "गंगाजलनिर्मळ मातोश्रींचा पुत्र गेला. दुःखरणवी आहात.ईश्वरइच्छा ऐसी ! प्राबंध" असे दुखाट्याचे सत्वनाचे,बरेच बोलत राघोबादादा नी माघार सूचित केली.अहिल्याबाई सर्व काही समजून उमजून गप्प राहिल्या.त्यांनी अधिक शोभा केली नाही.पुढे विषय न वाढवता अहिल्याबाई मिरवत मिरवत विजयाने परत महेश्वरी आल्या. जॉन माल्कम या प्रसंगाला अनुलक्षून म्हणतात,"बाईंनी हा एक मस्त पॉलिटिकल स्टंट केला".पेशवे थोरले माधवराव यांचेकडून पत्र आले.मग डाव अहिल्याबाईंना पूर्णपणे अनुकूल झाला.माधवरावांनी काकांना सांगितले होते,तुमचे उद्योग थांबवावेत. खंडेरावांच्या विधवा पत्नीला कारभार पाहण्याचा अधिकार आहे.ह्यात वाद घालण्याचे कारण नाही. राघोबादादा पराभूत होऊन अहिल्याबाई विजयी झाल्या. अश्याप्रकारे अहिल्याबाई होळकरांच्या सत्तेवर आरूढ झाल्या. कित्तेक कोटींच्या धनाची मालकीण असलेल्या अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ महेश्वर येथून झाला.

#अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...