लावंघरे देशमुख यांना परळी खोऱ्यातील 64 गावाची देशमुखी होती. शाहू महाराज यांनी 32 गावची जहागिरी काढून घेऊन ती गुजर देशमुख यांना दिली पण त्याचे कारण सुभानजी लावंघरे यांची फितुरी नाही. मुळात मराठ्यांनी हा किल्ला 8 महिने लढवला होता, त्यावेळी सुभानजी हे किल्लेदार तर प्रग्याजी प्रभू फणसे हे हवालदार होते. जो पर्यंत भांडू शकतो तो पर्यंत किल्ला लढवायचा आणि किल्ल्यातील शिबंदी संपल्यावर पैसे आणि सुरक्षिततेची हमी घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यायचा हे मराठ्यांचे तत्कालीन धोरण होते आणि सातारा किल्याबाबतीत हि हेच घडले त्यामुळे फितुरी चा आरोप होऊ शकत नाही
इतिहासात अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतील , जवळच सांगायचे म्हटले तर मसूर च्या जगदाळे यांची दहा गावे काढून ती गिरगोजी यादव देशमुख यांना दिली होती
No comments:
Post a Comment