प्रतापराव गुजरांचे खंडोजी व जगजीवन हे पुत्र व राजाराम महाराजांचे मेहुणे
औरंगझेबाने शाहुराजावर धर्मांतराची सख्ती केली होती परंतु राजेंकडुन विरोध झाला तेव्हा तुमच्या जागी कोणाला तरी धर्मांतरीत व्हावे लागेल असे फर्मावले म्हणुनच स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या दोन्ही पुत्रांना मुसलमान करावे लागले. पुढे औरंगझेब मेल्यावर कधीतरी एका मुलगा पुन्हा हिंदु धर्मात आला परंतु दूसरा अाजही इनामदार या आडनावाने जीवनयापण करत आहे.
प्रतापराव गुजरांचे खंडोजी व जगजीवन हे पुत्र व राजाराम महाराजांचे मेहुणे होय. छत्रपती शाहू महाराजांच्या ऐवजी खंडोजी व जनजीवन हे आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाले. १६ मे १७०३ रोजी मोहरम च्या दिवशी त्यांचे धर्मांतर करुन त्यांची अब्दुर्रहीम व अब्दुर्रहमान अशी नावे ठेवण्यात आली. त्यांनी असें धर्मांतर केल्यामुळें छत्रपती शाहू महाराजांच्या वरील हा प्रसंग टळला. पुढें छत्रपती शाहूमहाराज गादीवर बसल्यानंतर त्यांनीं खंडोजीस या त्याच्या कृत्यासाठीं, परळ खोर्यांतील साठ गांवांचें देशमुखी वतन इनाम करून दिलें. हें वतन त्यापूर्वी सुभानजी लांवघऱें याला, त्यानें सातारचा किल्ला फितूर होऊन औरंगझेबास दिल्यामुळें त्यांच्याकडून इनाम मिळालें होतें. तें त्याच्याकडून जप्त करून छत्रपती शाहूमहाराजांनी खंडोजीस दिले. या खंडोजीचा मुसुलमानी वंश हल्लीं परळी (सातारा)नजीक कामथी येथें राहात असून त्यांतील लोकांनां या गोष्टीची सर्व माहिती आहे. यांचीं नांवें मुसुलमानी नसून हिंदूंचींच असतात. नवरात्रादि सर्व हिंदू सण हे पाळतात. खंडोजीस हिंदू धर्मांत परत घेण्यास त्यावेळीं मंडळी तयार झाली होती. परंतु त्याचें मुसुलमान बायकोवर फार प्रेम असल्यानें तिच्यासह मला पावन करून घ्या असा त्याचा आग्रह पडल्यावरून ती गोष्ट तशीच राहिली.
खंडोजींची एक बायको मुसलमान होती तिला धर्मात घेण्यास विरोध झाला म्हणुन तेव्हा धर्मांतर होऊ शकले नाही.
. तेव्हापासुन त्यांनी इनामदार हे आडनाव लावले.
No comments:
Post a Comment