विनोद जाधव एक संग्राहक

Monday 20 July 2020

# रघुनाथ बल्लाळ अत्रे ## उर्फ राघो बल्लाळ ##


# रघुनाथ बल्लाळ अत्रे ## उर्फ राघो बल्लाळ ##

postsaambhar:Udaykumar Jagtap

सासवड मधील राघो बल्लाळ अत्रे हे अत्रे घराण्याचे मूळ संस्थापक. आत्रि गोत्र, ऋग्वेदी, देशस्थ ब्राह्मण .
१६५४ मध्ये घोडदळाचे प्रमुख म्हणून शिवाजी महाराजांनी राघोबा बल्लाळ यांची निवड केलेली होती.
विजापूरच्या दरबाराचे ७०० पठाण तेथील नोकरी सोडून छत्रपती शिवाजी महाराजांकडे नोकरी मागण्यासाठी आल्या नंतर महाराजांनी त्यांना गोमाजी नाईक पानसंबळ यांच्या सांगण्यावरून राघोबा बल्लाळ अत्रे यांच्या तैनातीत ठेवले व राघोबा बल्लाळ याना " पठाणी तुकडीचे" अधिपती नेमले .
१६६० मध्ये शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून सुखरुप विशाळगडला पाठवून सिद्दी जोहरच्या वेढ्यातून त्यांची सुटका केली
मागे पन्हाळगडचे रक्षण राघोबा बल्लाळ यांनी मोठ्या शिताफीने शौर्याने व हिमतीने केले. सिद्दी जोहरने त्याचा मुलगा फाजलखान यास राघोबा बल्लाळ यांच्याकडे पाठवले
फाजलखान राघोबास विजापूरच्या दरबारात मोठ्या हुद्द्याच्या नोकरीचे व जहागिरीचे देऊ लागला राघोबा बल्लाळ यांनी "प्राण गेला तरी मी शिवाजी महाराजांशी बेईमान होणार नाही . " असे उत्तर दिले .
पन्हाळगड शेवटपर्यंत शत्रूच्या हाती पडला नाही. या राघोबा बल्लाळ यास शिवाजी महाराजांनी पन्हाळगडचे सुभेदार नेमले. लष्कराप्रमाणेच मुलकी क्षेत्रात राघो बल्लाळ यांनी आपल्या बुद्धिमत्तेची व कर्तृत्वाची चमक दाखवून महसुलाबाबत सुधारणा केल्या .
जंजिऱ्याच्या सिद्दीने कोकणात त्रास द्यायला सुरवात केली . महाराज अतिशय संतापले त्यांनी मोरो त्र्यंबक पिंगळे व राघो बल्लाळ यांच्या सेनापतीत्वाखाली प्रचंड सैन्य दिले व सिद्दीवर स्वारी करण्यास सांगितले .
राघो बल्लाळ यांनी पराक्रमाची शर्थ केली . जंजिऱ्याच्या सिद्दीचा सपशेल पराभव झाला. दांडा व राजपुरी बंदरे सिद्दीकडून जिकून त्याला शरण आणले . सिद्दीने राघो बल्लाळ यांचे शौर्य बघून त्यांना मौल्यवान वस्त्रे व शृंगारलेला एक सुंदर घोडा नजराणा म्हणून दिला .
कोकणातील मोहीम फत्ते करून मोठ्या वैभवाने राघो बल्लाळ परतले तेंव्हापासून त्यांना "दांडा -राजपूरचे वीर " म्हणून संबोधले जाऊ लागले .
त्यानंतर अफजलखानाबरोबर शिवाजी महाराजांचा मुकाबला झाला त्यावेळेस महाराजांच्या परिवारातील एक विश्वासू सल्लागार मंडळींमध्ये राघो बल्लाळ यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. .
एक दिवस शिवाजी महाराजांच्या स्वप्नात तुळजा भवानीचे दर्शन झाले व त्याना आशीर्वाद दिला . महाराज अत्यंत हर्षभरित मनस्थितीत जागे झाले .
आई साहेबांस ,नेताजीस मोरोपंत निळोपंत रघुनाथ अत्रे याना आपल्या जवळ बोलावून महाराज म्हणाले. "श्री प्रसन्न जहाली ! आता अफजल खानास मारून गर्दीस मिळवतो " . सिद्दीस गेले म्हणजे बरे नाही तरी कसे होईल. ?म्हणोन विचार पडला मग राजे बोलले कि" सला केलियाने प्राणनाश होईल . युद्ध केलियाने जय जाहलियास उत्तम. प्राण गेलियाने कीर्ती आहे . असा नीती मध्ये विचार सांगितला आहे
,त्याजकरिता युद्ध करावे हे खरे ."
महाराजांनी अफजल खानाचा वध १० नोव्हेम्बर १६५९ रोजी केला .
त्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग बखरकाराने असा वर्णन केला आहे
राजे बोलिले "आता एक तजवीज करावी .संभाजीराजे पुत्र व मातोश्री आहेत ही राजगडी ठेवावी . जर अफजल मारून जय जाहला तरी माझा मीच आहे . एखादे समई युध्दी प्राणनाश जाहला तरी संभाजीराजे आहेत त्यास राज्य देऊन यांचे आज्ञेत तुम्ही राहणे " अशी निर्वानुक करून सर्वास सांगून पायावरी डोकी ठेवून निरोप घेतला
. मातुश्रींनी आशीर्वाद दिला कि "शिवबा ! विजयी होशील " असा आशीर्वाद घेऊन मग राजे निघोन प्रतापगडास गेले.नेताजी पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वरघाटावरी येणे म्हणोन सांगितले .
आणि राजे म्हणाले " अफजलखानास जवळीस बोलावितो, सला करून भेटतो ,विश्वास लावून जवळ आणितो, ते समई तुम्ही घाटमाथा घेऊन मार्ग धरणे " असे सांगितले
त्याजबरोबर रघुनाथ बल्लाळ सबनीस दिले मोरोपंत पेशवे व शामराव नीलकंठ व त्र्यंबक भास्कर त्यासही समागमे घेऊन तेही कोकणातून यावे असे केले .
अफजलखानाच्या वधानंतर थोड्या दिवसा नंतर राघो बल्लाळ अत्रे मरण पावले .
"युद्धात लढता लढता ते मारिले गेले " .अत्रे घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशवाई संपेपर्यंत स्वराज्यासाठी रक्त सांडले आहे व आपल्या पिढ्यानपिढ्या खर्ची घातल्या आहेत.
पिलाजी नीलकंठ अत्रे ,विठ्ठल पिलदेव अत्रे ,निळोराम अत्रे ,शंकराजी अत्रे वरील सरदार आपापल्या परीने स्वराज्यासाठी खपले आहेत .
ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कऱ्हेच्या काठी मी जन्माला आलो तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलो
मोठा झालो उशाला शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा देत आहे . तर सोपानदेवांची भक्तिविणा शेजारी सदैव वाजत आहे .
शक्तीचे आणि भक्तीचे" पावनतीर्थ सासवड" हे माझे गाव. संतांच्या आणि वीरांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कण न कण पुनीत झाला आहे .
सासवडच्या रस्त्यातून जाऊ लागले कि उंचच उंच वाड्याच्या पडक्या भिंतीवरून दोनतीनशे वर्षांचा इतिहास तुमच्या कानातून कुजबुजू लागतो आणि आपण भारावून जातो . . . . . . . . .

No comments:

Post a Comment

कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?

  कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ? फार पूर्वीपासून सामान्य लोक आपले नांव लिहिताना स्वतःचे नांव, वडिलांचे नांव व आडनाव या क्रम...