## सेनापती दाभाडे ##
postsaambhar:डॉ. उदयकुमार जगताप
हे एक मराठेशाहीमध्ये उदयास आलेले नामवंत कूळ आहे .
यांचा मूळ पुरुष" येसाजी बिन बाज पाटील" दाभाडे
मोकदम मौजे तळेगाव
हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदरी होते .
त्यांचे चिरंजीव" खंडेराव"हे सरदार होते .
त्यांचेकडे पन्हाळगडाची व्यवस्था सांगितली होती. राजाराम महाराजांच्या
संकटकाळी या घराण्याने आपल्या जीवाची पर्वा न करता छत्रपतीची सेवा केली
आहे .
खंडेराव दाभाडे हे पराक्रमी निपजले .
त्यांना "सेनाखासखेल "हे पद देण्यात आले होते .
छत्रपती शाहू यांच्या वेळेस ताराराणी व शाहू यांच्यात समेट करून देण्यासंबंधी या घराण्याने खूप मेहनत घेतलेली दिसते.
पुढे बाळाजी विश्वनाथ यांचेकडे प्रधानकीची वस्त्रे आल्यानंतर छत्रपती
शाहू राज्यांनी" खंडेराव दाभाडे" यांना सेनापती पदाची वस्त्रे दिली.
यांच्या मृत्यू नंतर शाहूंनी सेनापती पदाची वस्त्रे "त्र्यम्बकराव दाभाडे
" यांच्याकडे सोपवली व "यशवंतराव दाभाडे "यांचेकडे "सेनाखासखेल "हे पद
देण्यात आले .
गुजरातचा बराच प्रदेश "त्र्यंबकराव दाभाडे" यांचेकडे
होता .बाजीराव पेशवे व दाभाडे यांच्यात गुजराथ प्रांतावरून वाद होऊन लढाई
झाली.
ही लढाई डभईवर झाली .
त्यात त्र्यंबकरराव मृत्युमुखी पडले.
त्यानंतर सेनापती पदाची वस्त्रे "यशवंतराव दाभाडे" यांच्याकडे आली.
व "सेनाखासखेल" या पदाची वस्त्रे बाबुराव दाभाडे यांच्याकडे आली.
बाबुराव दाभाडे या मर्द गड्याने अल्पावधीत आपल्या तलवारीची चमक सर्वाना दाखवून दिली.
सुरतेवर स्वारी करून त्यांनी तेथील नबाबाला आपल्या अल्प वयामध्ये जवळ फारसे मनुष्यबळ नसताना जेरीस आणले
आपला कार्यभाग साधला .. यांच्या या शौर्या बद्दल दाभाडे याना छत्रपतींनी पायात तोडा घालण्यास दिला व अब्दागिर दिली .
या नंतर गुजरातच्या स्वारीमध्ये "उमाबाई दाभाडे" याही बरोबर होत्या .
त्यावेळी या वीर स्त्रीने प्रतिज्ञा करून "अहमदाबाद" जिंकुन काबीज केले.
ही कामगिरी पाहताच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले,"उमाबाई बाईमाणुस असता, शिपाईगिरीची शर्थ केली
त्यापेक्षा इजला बक्षीस काय द्यावे?
गाव जहागिरी,पद पुरुषास दिलीच आहेत .
त्यापेक्षा यास जास्त काय द्यावे. ? "
असे उद्गारले
व उमाबाई याना सोन्याचे तोडे पायात घालावयास दिले .
गुजरातचा बंदोबस्त पिलाजी गायकवाड यांचेकडे सोपवला .
पिलाजी गायकवाड यांचे नंतर सेनापती दाभाडे यांनी दामाजी गायकवाड यांचेकडे सुभ्याची वस्त्रे दिली.
या उत्पन्नावरून पेशवे, गायकवाड ,दाभाडे यांच्यामध्ये वाद झाला .
या नंतर अनेक राजकारणे होऊन दाभाडे यांचा गुजराथवरील कब्जा निघून गेला .
1748 मध्ये निजाम स्वारी करणार असे उमाबाई दाभाडे याना समजलेवरून त्यांनी पेशव्यांचे साहाय्य मागितले.
त्यावर पेशवे म्हणाले ,"निमे गुजरात देतील तर सहाय्य करू "
उमाबाई दाभाडे साफ म्हणाल्या ,"पेशव्यांनी गुजरातची गोष्ट बोलू नये " 16
मे 1751 रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यास आणून होळकर
वाड्यात नजरबंदीत ठेवली.
तेथे त्यांचा मुक्काम चार महिने होता.
29 जुलैस पेशवे थेऊरला गेले त्यांच्या बरोबर उमाबाई होत्या.
पुढे 16 नोव्हेंबर मध्ये यशवंतराव व त्याचा भाऊ पुण्यातून निसटून जाण्यास यशस्वी झाले .
पेशवे यांनी उमाबाई व अंबिकाबाई याना सिहगडावर बंदोबस्तात ठेवले.
14 फेब्रुवारीस पुण्यात आणले.
उमाबाई पेशवे यांची भेट झाली .
दोन महिने वाटाघाटी झाल्या व त्यांच्यात तह होऊन वाद मिटला.
12 मे 1752 यशवंतराव दाभाडे यांचे लग्न पुण्यात शितोळे देशमुख यांच्या मुलीबरोबर झाले .
उमाबाई आता वृद्ध झाल्या होत्या
उपचारासाठी त्या पुण्यात आल्या.
"ओंकारेश्वर "नजिक "नडगेमोडी " जवळ डेरे देऊन राहिल्या.
तेथे त्यांचे देहावसान 18 नोव्हेंबर 1753 मध्ये झाले .
यशवंतराव दाभाडे जवळ होते .
पेशवे यांनी सेनापती दाभाडे याना कर्नाटक स्वारीसाठी बरोबर नेले .
परत येताना कृष्णा तीरी मिरजे जवळ 18 मे 1754 रोजी यशवंतराव मरण पावले.
यशवंतराव यांचा पुत्र त्रिंबकराव सेनापती बनला .
त्रिंबकराव दाभाडे वेरूळ मुक्कामी घृष्णेश्वर मंदिरानजीक 1766 मध्ये मरण पावला.
मराठे शाहीतील पराक्रमी स्त्रियांमध्ये जिजाबाई ताराबाई यांचे नंतर " उमाबाई दाभाडे "यांची गणना केली जाते.
No comments:
Post a Comment