विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## सोयराबाई ##



## सोयराबाई ##

postsaambhar :डॉ . उदयकुमार जगताप

सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या.
या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम हे त्यांचे पुत्र होते.
दिलेरखानास बादशहाने हुकूम करून संभाजी राज्यांना घेऊन येणे हा हुकूम संभाजीराज्यांना कळताच ते पन्ह्याळाला आले
हे वर्तमान पुरंदरास शिवाजी महाराजांना कळताच पितापुत्रांची भेट पन्हाळ्यास झाली
. शिवाजी संभाजी एकचित्त झाले .
परंतु संभाजीचा दुःस्वभाव गेल्याची संशय निवृत्ती होईपर्यंत त्याला पन्हाळा किल्ल्यावर रहावयाची आज्ञा दिली .
शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काही दिवसातील संभाजी महाराजांच्या वर्तनातील खंत कृष्णाजी अनंत सभासद याने आपल्या बखरीत स्पष्ट मांडली आहे
. तो म्हणतो "मग काही दिवसांनी राज्याला ज्वराची बाधा झाली
. ग्रँड डफ म्हणतो" रायगडी असता गुडघी रोग झाला तो प्रतिदिवशी वृद्धिंगत होऊन मग त्याचाच प्राब्लये करून फार मोठा ज्वर आला
. तो सहा दिवस सोसून सातव्या दिवशी मृत्यू आला "
पुढे सभासद म्हणतो
" आयुष्याची मर्यादा झाली असे करून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य भले लोक बोलावून आणले .
त्यामध्ये १)निळोपंत २)प्रल्हादपंत ३)रामचंद्र नीलकंठ ४)रावजी सोमनाथ ५)आबाजी महादेव६) ज्योतिराव बाळप्रभू चिटणीस ७)हिरोजी फर्जत८) बाबाजी घाडगे ९)बाजी कदम १०)मुधोजी सरखवास ११)सूर्याजी मालुसरा १२)महादजी नाईक पानसंबळ
याना बोलावून त्यास सांगितले कि "आपली आयुष्याची अवधी झाली पन्हाळ्यास वडील पुत्र संभाजीस सांगितले कि ,तुम्ही दोघे पुत्र आपणास .
यास राज्य वाटून देतो .
उभयता सुखरूप राहणे
परंतु संभाजी राजे यांनी ऐकले नाही
संभाजीराजे वडील पुत्र परंतु बुद्धी फटकळ अल्पबुद्धी आहे
त्यास काय करावे
तुम्ही कारकून मराठे या राज्यातील आहात .
तुम्हास या गोष्टी कळल्या असाव्यात .
मज माघारे हे राज्य संरक्षण करणार ऐसा पुत्र दिसत नाही
कदाचित धाकटा राजाराम वाचला तर तो एक हे राज्य वृद्धीते पाववील
संभाजी कैफ खाईल
संभाजी शेवट दगा खाईल
संभाजी राज्य बुडविल
मग राजाराम राज्य करू लागेल
तेव्हा गमावले राज्य साधील
मजपेक्षा पराक्रम विशेष करील
प्रल्हादपंत निराजीपंतांचे पुत्र व रामचंद्र पंत निळोजीपंतांचे पुत्र निळोपंत यांचा पुत्र हे
व संताजी घोरपडे बहिर्जी घोरपडे व धनाजी जाधव हे तिघे मोठा पराक्रम करतील
मोडिले राज्य हे तिघे ब्राम्हण व तिघे मराठे सावरतील "

असे बोलिले
येणे प्रमाणे राजे बोलिले परम दुःख झाले
याउपरी राजे बोलिले "तुम्ही चुकून होऊ नका.
हा तो मृत्यूलोकाच आहे.
यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले
आता तुम्ही सुखरूप निर्मल बुद्धीने असणे
आता अवघेचि बाहेर बैसा
आपण श्रींचे स्मरण करितो राजियानी भागीरथीचे उदक आणवून स्नान केले भस्सम धारण करून रूद्राक्ष धारण केले
. . राजे यांनी प्राणप्रयाण

छत्रपतींनी बोलून दाखवलेली खंत व जवळ असणाऱ्या लोकांशी सल्ला मसलत करून राजाराम लहान असेपर्यंत
त्याच्या नावाने राज्य कारभार चालवावा .
पुतळाबाई या राज्याच्या मृत्यू नंतर दीड महिन्यांनी सती गेल्या
कारण शिवाजी महाराज निवर्तल्याचे संभाजी राज्यास कळवू नये
म्हणून हि गुप्तता पाळण्यात आली .
राज्यांचे दहन व उत्तरकार्य त्यांचा शहाजी भोसले नावाचा कोणी भाऊबंदांच्या हातून गुप्तपणे केले .

लिखित स्वरूपात असणाऱ्या या साधनांवरून . १६८०मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही कनिष्ठांच्या मदतीने सोयराबाईंचा दहा वर्षांचा मुलगा राजाराम रिक्त सिंहासनावर आला.
असे म्हणणे योग्य वाटत नाही
.संभाजी राजे रायगडी आले .
सोयराबाई याना संभाजी राज्यांनी समोर आणून तिला नानाप्रकारे अमर्याद बोलून असे ठरविले कि
हिने राज्यांना विष घालून मारले
त्यास आता हिचे हाल करून मारावी अशी आज्ञा केली तेणे करून ती मरण पावली सन १६८१.

इतिहासामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा व त्यावेळची परिस्थिती ,लोकांची मानसिकता आजरोजी न समजल्याने सोयराबाईसारख्या व्यक्तीवर विनाकारण अन्याय झाल्यासारखा वाटतो .
शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या समईची परिस्थिती व मानसिकता दर्शवणारे कुष्णाजी अनंत सभासद यांच्या बखरी शिवाय दुसरे साधन नाही . बखरकाराने शिवाजी महाराजांच्या मनाची अवस्था व संभाजी महाराजांबद्दलची खंत खरी असल्याचे अनेक दाखले इटालियन परदेशी प्रवासी
"निकोलाओ मनुचीने" आपल्या प्रवासी वर्णनात लिहून ठेवले आहेत त्यावरून शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांबद्दल व त्यांच्या वागण्याची खंत होती हे स्पष्ट होते .
सोयराबाई यांच्यावर इतिहासात अन्याय झाल्यासारखा वाटतो .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...