विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## नाना फडणवीस ##






## नाना फडणवीस ##

POSTSAAMBHAR:डॉ उदयकुमार जगताप

नानांचा जन्म सातारा येथे 12/2/1742 मध्ये झाला.
त्यांचे पूर्ण नाव बाळाजी जनार्दन भानू .
मृत्यू पुणे येथे 13/3/1800 मध्ये झाला .
त्यांची हयात 58 वर्षांची होती.
त्यांचे वडील बाबा फडणवीस रघुनाथराव यांच्याबरोबर युद्धावर गेले असता ,
नर्मदापार केल्यावर त्यांचा मृत्यू झाला .
त्यांचे नंतर 29/11/1756 रोजी नानांना फडनविसीची वस्त्रे मिळाली.
नानांनी नऊ लग्ने केली.

यशोदाबाई(सदाशिव रघुनाथ गद्रे यांची मुलगी खुन्या मुरलीधराचे मालक दादा गद्रे यांची बहीण)
अन्नपूर्णा(वाईचे सावकार गाडगीळ यांची मुलगी)
राधाबाई (पुण्याचे सावकार बीडार)
आनंदीबाई (वैद्य)
यशोदाबाई( पेंडसे)
अन्नपूर्णा(विजयदुर्गचे परांजपे)
बगाबाई ( रत्नागिरीचे सुतार)
जिउबाई (मुरुडचे गोपाळभट वैशंपायन यांची मुलगी)

जिउबाई खेरीज सर्व स्त्रिया नानाचे हयातीत वारल्या .
नांनास दोन मुली व एक मुलगा अशी अपत्ये झाली.
पण ती लहानपणीच वारली .

नानाची प्रकृती अशक्त व नाजूक होती .
त्याचा उभार बांधा सडपातळ होता.
वर्ण किंचित काळसर व मुद्रा गंभीर,
डोळे तीक्ष्ण चपळ व चंचल होते .
राहणी नियमित होती .

त्याला बापासारखा पोटशूळचा आजार जडला.
होता.
थट्टेत देखील नानाला खोटे बोलणे खपत नसे.
हसणे चेष्टा मस्करी त्याला आवडत नसे.
नांनास तपकीर ओढण्याची सवय होती .
तोंडली हा त्याचा आवडता पदार्थ होता.
पानिपत च्या लढाईत केवळ नशीब बलवत्तर म्हणून नाना वाचला .
व चालत चालत मराठी राज्यात आला .
पानिपताहून आल्यावर विरक्तावस्थेत कायमचे काशीस निघून जावे असे वाटत असे .
नानाने काशीस "कर्मनाशी" नदीवर पूल इंग्रज इंजिनिअर "बेकर "याचे मार्फत बांधला .
पुरंदरे यांनी सासवड मध्ये उत्तरेकडील चित्रांचा फार चांगला संग्रह केला होता.. त्यापैकी काही चित्रे आपल्याला मिळावीत म्हणून नानाने विशेष प्रयत्न केले.
होते .
काही लोकांनी ती चित्रे लांबवली .
नानाने नाना प्रकारची फळे फुलझाडे पैदा करून बागेत लावली होती ..त्यावेळेस त्यांनी लीचीची कलमे 16/10/1799 मध्ये आणल्याचा उल्लेख सापडतो..
नवीन पेठ बसवल्या ,पूल बांधले, तलाव, धरणे बांधावुन घेतली ..
अनेक पेठा वसवून पाण्याचे हौद करून पुण्याची भरभराट केली.
पेशव्यांच्या शनिवारवाड्यात फेरफार केले.
शनिवरवाड्यास लागून नानाने वाडा बांधला.. आता तेथे "न्यू इंग्लिश स्कूल "भरते.1789 मध्ये नानाने गणेशपेठ वसवली.
कोकणातील वेळास येथे कालभैरव मंदिर ,खोपोलिस तलाव ,
देवालय, धर्मशाळा बांधल्या.
भीमाशंकरच्या मंदिराचे काम नानाने सुरू केले व ते जिउबाई हिने पूर्ण केले .
गोदतीरी घाट ,वाडे नानाने बांधले .
मेणवलीचा घाट व वाडा बांधला .
नानाच्या कामाचा व्याप प्रचंड होता .
अनेकांच्या कागदपत्रातून "नानांची गाठ पडत नाही" असे उल्लेख आढळतात .1774 पासून ते 1791-92पर्यंत सर्व कारभाराची सूत्रे नानाकडे होती.
लेखी कारभाराच्या बाबतीत नानाची बरोबरी करणारा दुसरा इतिहासात कोणी नाही .
लेखन व्याप प्रचंड होता.
नियमित कारभाराची रेखीव पद्धत नानाशिवाय दुसऱ्या कोणात आढळत नाही.
पत्रे वाचून उत्तरे देणे.
राज्याची कामे उरकणे.
इत्यादी कामे व व्याप नाना कसा करीत असेल? हे कोडे त्यांचे कागद वाचल्यावर पडते.
नानाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही . नाना स्वभावाचा एकलकोंडा होता .
मात्र तो वाचनाचा दृढ व बोलल्याप्रमाणे वागणारा होता .
त्र्यम्बक महिपत पुरंदरे लिहितात "नानाचे वचन पक्के घ्यावे ते वचनास बहुत प्रामाणिक ,अभिमान धरावा व तो शेवटास न्यावा असे आहे "
परंतु द्रवयोत्पादनांचे बाबतीत अनेकांनी नानाला दोष दिला आहे.
त्याने आपली खाजगी संपत्ती वाढवली ..
नानांचा द्रव्य संचय किती होता हे सांगणे कठीण आहे.
परंतु तो कित्येक कोटींनी मोजण्याजोगता होता हे निश्चित .

नाना वारल्यानंतर अरबांनी तलबे करता हंगामा केला..
त्याचे शव अडवून धरले.
तेव्हा पेशव्याने वाड्यावर तोफांचा मारा केला त्यांचा पगार चुकता केला व शव वाड्याबाहेर जाऊ दिले.
होळकरांनी जिउबाईस लोहगडावर नानांचा विश्वासू धोंडो बल्लाळ निजसुरे होता त्याच्याकडे ठेवले.
नानांचा सर्व खजिना लोहगडावर होता .
नानाने त्यांचा हयातीत1/12/1794मध्ये दत्तक दामोदर बळवंत घेतला होता..
पण तोही लवकरच वारला.
मराठी राज्य संपल्यावर इंग्रजांनी 12 हजार रुपये नक्त नेमणूक मेणवली गाव,पुण्यातील बेलबागेच्या खर्चा करता 5000 रुपये तिला मिळू लागले ..
तिने रामकृष्णपंत भानू यांचा मुलगा गंगाधरपंत यास दत्तक घेतले व नाव महादजीपंत रावसाहेब ठेवले अशाप्रकारे प्रचंड घडा मोडी व अवस्थांतरे पाहून मार्च1854 मध्ये मरण पावली..
तिने आपल्या जगविख्यात पतीचे नाव निष्कलंक राखले.
कोलब्रूक म्हणतो" राज्य कारभार चालवण्याचे शहाणपण नांनास चांगले होते .
छत्रपती व पेशवे या दोन पदांची संपूर्ण सत्ता त्याच्या हाती होती ..
परंतु लष्करी कामात तो सर्वथैव लंगडा असल्यामुळे त्याच्या कारभारास यश आले नाही .
लष्करी कौशल्य नानाच्या अंगीअसते तर तो आपलाच स्वतंत्र राजवंश स्थापू शकला असता

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...