विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

“स्वराज्याचा देव्हारा #मेघडंबरी इतिहास”...🙏🚩

“स्वराज्याचा देव्हारा #मेघडंबरी इतिहास”...🙏🚩

साडे तीनशे वर्षांपूर्वी याच किल्ल्यावरून तीनशे पेक्षाही अधिक किल्ल्यांचा कारभार हाकला जात होता इथेच आमचा राजा एक अभिषिक्त राज्यकर्ता बनला इथेच असंख्य मावळ्यांनी आपली निष्ठा वाहीली या स्वराज्य उभारणीसाठी झटलेल्या हरेक जीवाची तगमग म्हणजे हा रायगड..

रायगड वरील असंख्य पवित्र स्थळांपैकी सर्वाधिक पवित्र स्थळ “राजदरबार” याच दरबारात असलेल्या सिंहासन चौथऱ्यावर तब्बल ३२ मण वजनाच्या सोन्याचं सिंहासन होतं ज्यावर बसून आपल्या राजाने स्वतःला राज्याभिषेक करवला त्याच्या छत्रछायेचं अभयदान या महाराष्ट्राच्या रयतेला दिलं या सिंहासनावर अष्टखांबी सुघड़ घडनीचं मेघडंबरीचं छत्र होत शिवराय म्हणजे आपल्याकरता साक्षात देवतुल्य व्यक्तिमत्व मग या देवाचा देव्हारा म्हणजे ही मेघडंबरी आपल्यासाठी तितकिच पवित्र आहे सिंहासन चौथऱ्यावर विराजलेली दिमाखदार मेघडंबरी म्हणजे स्वराज्याचं हृदयच जणू..

महाराष्ट्राचा मानदंड असलेल्या रायगडावर अखेर एक अतिशय सुंदर आणि नक्षीदार अशी मेघडंबरी बसवन्यात आली १९८० साली सुरु झालेली ही धडपड १९ एप्रिल १९८५ रोजी पूर्ण झाली स्वराज्याच्या राजधानीवर ओका-बोका पडलेल्या सिंहासन चौथऱ्यावर मानाचा टिळा लावला गेला त्याचा मळवट भरला गेला साडेतीनशे वर्षापासून त्याने सोसलेला विरह पूर्ण नाही पण काहीसा कमी झाला इतिहासात स्वराज्याच्या या देवघरातला देव उठला होता त्याबरोबरच देव्हारा सुद्धा नष्ट झाले आणि उरले फ़क्त देवतत्व.. ज्या देव्हाऱ्यापुढे इंद्राची देवसेना सुद्धा आदराने मुजरे झाडायची जिथुन साक्षात रयतेचं राज्य चालायचं त्या देव्हाऱ्याच्या अष्टाखांबात शक्ति होती अष्टादिशेला आपल्या स्वामीची कीर्ति पसरवन्याची हो याचे हे अष्टखांब म्हणजे न्याय नीती, साम, दाम, दंड, भेद, वात्सल्य, अन निष्ठेचे प्रतीक होते, याचा आकाशाला गवसनी घालणारा कळस जणू सांगत आहे की “होय, हे शिवराज्य असेच दिगंतापासून अनंतापर्यंत चालेल या यावनी सत्तेच्या नाकावर आम्ही टीच्यून राज्य केले आहे” हे अष्टखांबी शिल्प तर दिल्लीश्वराच्या महीरपी कमानदार तख्तापेक्षाही अधिक बलवान होतं.

याच ठिकाणी सोन्याचे सिंहासन होते आजुबाजुला छत्र चामरं ढाळणारे स्वराज्याचे मंत्री होते, राजयज्ञी होत्या, राजकुमारहोते, राजकुमारी होत्या, सेवक होते, दास-दासी होत्या, अहो, याठिकानी एक “शिवतत्व” होते त्याच ठिकाणी आज सोन्याची नसेना का पण एक अतिशय सुंदर अशी मेघडंबरी आहे देव नसलेला स्वराज्याचा देव्हारा जागेवर बसवला गेला हा देव्हाराच पुढे समस्त धारकऱ्यांना शक्ती-भक्ती चा संगम शिकवनार होता या देव्हाऱ्यापुढेच लाखो वारकरी अन धारकरी आपले ईमान ढाळणार होते शिवशक्तीचा हा पोत असाच पजळवत ठेवणार होते हो, हे शिल्प म्हणजे आपल्यासाठी उर्जेचा अखंड स्त्रोत बनणार होते..


✍🏼 प्र.के.घाणेकर (दुर्गदुर्गेश्वर रायगड)...

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...