विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 19 July 2020

## श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब ##







## श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब ##

p[ostsaambhar :Udaykumar Jagtap


वीरूबाई या छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्त्रीयांपैकी ऐक होत्या
,.बखरकार म्हणतो." औरंगजेब बादशहाने आपली लेक झुलपुकार बेगम साहेब हिचे लग्न करावयास लागले .
तो झुल्फिकार बेगम साहेब हिने औरंगजेब बादशहास अर्ज केला कि संभाजी महाराज यांनी मजवर निगा ठेवली तोच माझा खावद .
इतर पुरुष जितके पृथवीत आहेत तितके मजला औरंगजेब बादशहा समान .माझे लग्न तुम्ही करू नये
.इतीक्यावर तुम्ही जबरी केलियावर मी प्राणत्याग करिन.
असे बादशहास अर्ज केला. मग बादशहाने तिचे लग्न केले नाही .
आणि बादशहास आणखी अर्ज केला कि संभाजी महाराज याचा पुत्र शिवाजी महाराज हाच माझा पुत्र.
. मी याची मातुश्री.
मग बादशहाने तिचे लग्न केले नाही.
नंतर बादशहाच्या मनात आले कि बेगम साहेब यांच्या पुत्र आमचा नातू पोतरा. मग बादशहाच्या मनात आले कि शिवाजी महाराज यांचे लग्न करावे म्हणोन एक मोठा यवन सरदार होता .
त्याची कन्या नेमस्त केली .
ते समई झुल्फिकार बेगम व ज्योतजी केसरकर वकील या उभयतांनी बादशहास अर्ज केला कि हा क्षत्रिय राजा आहे .
. यास मुसलमान करू नये .
असा बादशहास अर्ज केल्यानंतर बादशहाने बेगम साहेब व ज्योत्याजी केसरकर याना सांगितले कि कोणी जातभाईशरीर संबंधी येथे हिंदू कोणी असतील त्याचा शोध घेऊन मुलगी चांगली बघून नेमस्त करावी.
मग रुस्तमराव जाधवराव सिंदखेडकर हे बादशहाच्या दिल्लीस होते त्यांची कन्या वधू तिचे नाव अंबिकाबाई हि पाहून नेमस्त केली
. नंतर बेगम साहेब व केसकर वकील यांनी औरंगजेब बादशहास खबर दिली . मग बादशहा दिवसेंदिवस शिवाजी महाराज यांचेवरमोठी कमाल मेहेरबानी करून
हा आपल्या लेकीचा लेक म्हणून त्याचे लग्न बादशहा यांनी आपण जातीने उभे राहून बहुत द्रव्य खर्च करून सात बिघ्याचा मांडव घालून लग्न उच्छव दिल्लीस मोठाशिवाजी महाराज याचा केला.
आणि जाधवराव यांनी आपले दासींची मुलगी" वीरूबाई "आंदण दिली
. पुढे लग्न समारंभ जाहल्या नंतर बादशहाचे भेटीस जाताना नवरा नवरी न्यावयाचे ती झुलपुकार बेगम साहेब व ज्योत्याजी केसरकर वकील यांनी मसलत करून खासी नवरी होती तीस महालात ठेवली आणि तिचे अलंकार वस्त्रे भूषणे "वीरूबाईचे" अंगावर घालून पदराशी गाठी देऊन हीच नवरी म्हणून कचेरीस नेली .
असा सिद्धांत केला जर करीत आम्ही खासी नवरीस कचेरीस नेली तर बादशहा यांनी आपले तोंडातील तांबूळ खातल्यास नवरी बाटेल.
असे मनात आणून मग शिवाजी महाराज व वीरूबाई या उभयतांस तळातुळन बादशहाचे भेटीस नेली . समागमे बेगम साहेब ज्योत्याजीराव केसरकर वकिल घेऊन गेले .
नंतर बादशहा यांनी दुरून पाहताच बादशहा हा खादाचा अवतार म्हणोन उभयताकडे पहाताच सांगितले कि शिवाजी महाराज हि तुमची दुलण नव्हे
. हे तुम्ही कृत्रिम केले
. बरे असो .म्हणोन जवळ बोलावून उजवे मांडीवर शिवाजी महाराज याना बसवले .डावे मांडीवर" वीरूबाईस" बसवले .
आणि उभयतांस दुवा दिल्हा कि हीच तुमची राणी.
तुम्ही उभयतांनी राज्य करावे .
असा अंत:करणापासून दुवा देऊन वस्त्रे भूषणे अलंकार देऊन वस्त्रे अलंकार भूषणे देऊन उभयतांस आपले मकणास रवानगी करून दिली
"मग औरंगजेबावरंजेब बादशहा याचे वरप्रदाने करून त्या वीरूबाईंनी राज्यकारभार ३३ वर्ष केला. ""
या वीरूबाईं छत्रपती शाहू महाराजांबरोबर सातारा येथे येत असताना पारध म्हणोन गाव सातपुड्याच्या बारीच्या तोंडी आहे.
तेथे शाहू महाराज मुक्काम करून राहिले त्या गावात लष्कराची कईभ राहावयास गेली .
तेथे लोखंडे याने गढीतून गोळी वाजवली आणि लढू लागले महाराज पालखीत बसून आले गढीची एक बाजू पाडली त्या गढीतून एक लोखंडे बाई एका मुलास कडेस घेऊनमहाराजां जवळ आली तो मुलगा शाहू महाराजांच्या पालखीत पायावर ठेवला .
राज्यांनी नाव फत्तेसिंग ठेवले
. या वीरूबाईने सातारा जवळील लिंब गोवे येथे वास्तव्य केले शाहू महाराजांनी सन १७१९ ते १७२३ या कालावधीत देशातील विविध आंब्याच्या जाती जमा करून सुमारे ३५०० आंब्याची झाडे या परिसरात लावली होती .
वीरूबाई यांच्या देखरेखीखाली या आंब्यांची जोपासना झाली.
या आंब्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून वीरूबाई यांनी एका वेळी १५ मोट चालतील इतकी मोठी विहीर बांधली .
त्यापैकी १२ मोट एका वेळेस चालत म्हणून १२ मोटेची विहीर म्हणून प्रसिद्धीस पावली.
वीरूबाई याना मुलबाळ झाले नाही.
परंतु या विहिरीवर त्यांचे शिलालेखात नाव वाचले म्हणून त्याची पार्श्वभूमी लिहिली आहे
. त्यांचा मृत्यू २४ डिसेंबर १७४९ मध्ये सातारा येथे झाला.
त्यांच्या बद्दल इतिहासात खूप कमी माहिती आहे .तिचा वाडा विहिरी जवळ होता तो जमीनदोस्त झाला आहे .
वीरूबाईने परळी किल्यावर रामदास स्वामींच्या संमुख एक तुळशी वृदावन आपल्या नावाचे बांधले .
शंभू महादेव समोर एक दीपमाळ बांधली त्यावर आपले नाव घातले.
वीरूबाई हि वाणी समाजाची होती.
परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या सानिध्याने तिच्या जन्माचा उद्धार झाला
. वीरूबाईचे दहन संगम माहुली येथे केले
. व तिची पाषाणाची मूर्ती करून शाहू महाराजांच्या साळोखे शेजारी बसवली
.तिचे उत्तर कार्य हे फत्तेसिंग भोसले (लोखंडे ) याने केले
.त्यास वीरूबाई यांनी दत्तक घेतला होता .
फतेसिंग महाराज अक्कलकोटकर यांनी वीरूबाईच्या नावाची सोन्याची मूर्ती करू देव्हाऱ्यावर बसवली .
शंभू महादेवाच्या शिखराच्या उजव्याबाजूस सोपा आहे तेथे वीरूबाईच्या नावाची लिंग प्रतिमा साळोखा करून फतेसिंग महाराजांनी ठेवलेली आहे
.फतेसिंग महाराजांनी तिच्या नावे खूप दानधर्म केला .
अक्कलकोटकर फत्तेसिंग भोसले घराण्याच्या देव्हाऱ्यावर वीरूबाईची सोन्याची मूर्ती पुजली जाते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...