स्वराज्याच्या "रायरेश्वरा" वरील शपथी पासून शिवाजी महाराजांना साथ
देणाऱ्या मोजक्या सुरवातीच्या लोकांमध्ये" सूर्यराव काकडे" यांचे नाव
घ्यावे लागेल .
शिवाजी
महाराजांनी स्वराज्य निर्मिती साठी सुरवातीच्या काळात भोर खोरे , हिरडस
,कऱ्हे पठार ,मावळ, मुळशी खोऱ्यातील पुणे परिसराच्या जवळचेच मावळे गोळा
केलेले दिसतात .
सूर्यराव
काकडे यांच्या बद्दल बखरकार म्हणतो " सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा
नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिभेचा " यावरून आपल्याला
सूर्यराव काकडे यांची कल्पना येते
. सूर्यराव काकडे सासवड पासून जवळच पांगारे गावाचा
.तालुका -पुरंदर ,जिल्हा पुणे . स्वराज्याच्या रायरेश्वर वर हजर असणाऱ्या
तान्हाजी मालुसरे ,सूर्याजी मालुसरे ,येसाजी कंक, बाजी जेधे सोनोपंत
डबीरांचा मुलगा त्र्यंबक,बापूजी मुगदल नारोबा देशपांडे,चिमणाजी
देशपांडे,बाळाजी देशपांडे दादाजी गुप्ते बाजी पासलकर यांच्या मध्ये
पुरंदरचा सूर्यराव काकडेही हजर होता
. स्वराज्यामध्ये भोर जवळील रोहिडा किल्ला समाविष्ट करण्यात
सूर्यराव काकडे यांचा मोठा वाट दिसून येतो
. रोहिडा किल्ला हा मोगलांकडे होता. या
किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर
असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे
अनुमान निघते.
या
शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल
देशमुखांकडून घेतला . किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी
हातघाईची लढाई करावी लागली.
शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोरे चा पाडाव करण्यासाठी त्यांच्या
प्रमुख सरदारांपैकी एक सूर्यराव काकडे यांची निवड केलेली होती.
बखरकार म्हणतो " याउपर चंद्रराव
मोरे व शिवाजी महाराजांचा थोर आकस पडला .शिवाजी महाराजांचे सुरराव
(सूर्यराव )काकडे दोनहजार हशम जवळीस रवाना केले .महाबळेश्वरचा निसणीचा
घाटआणि दर्या उतरून जवळीस वेढा घातला. जावळीचा अवघड वाट ,जाळ्या कळकीच्या
दाट तेथे महिनाभर झुंज जाहले "
.या लढाईमुळे कृष्णाजी बाजी मोरे याना जावळी सोडावी लागली
व रायगडास जावे लागले .
सूर्यराव काकडे यांचा उल्लेख व पराक्रम साल्हेर
लढाईमध्येआढळून येतो. साल्हेरचे युद्ध इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी
महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.
त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी
मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.
तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना
पाठवले.
इख्लासखान हा
मुघल सेनेचा अधिपती होता. बखरकाराने या युद्धाचे यतार्थ वर्णन केलेले आहे
ते असे "‘एक तर्फेने लष्करांनी
घोडी घातली. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे युद्ध
जाहले.अशी धुंदी कधी उडाली न्हवती. पृथ्वीचा धुराळा असा उडाला कि तीन कोश
औरस चौरस कोणास आपले व परके माणूस दिसत न्हवते
. हत्ती रणास आले .दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा
जाहले . घोडे ,उंट,हत्ती ,आराबा यास गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले
रक्ताचे चिखल जाहले . त्यामध्ये पाय रुतो लागले.
असा कर्दम जाहला. मोगलांची फौज लाखाच्या
आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे पन्नास हजार इतकीच होती. मोगल,
पठाण, रजपूत, तोफची, हत्ती, उंट, आराबा घालून युद्ध जाहले.
जिवंत सापडले ते सहा हजार घोडे
राजांकडे गणतीस आले. सवाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडली. मालमत्ता,
खजिना, जडजवाहीर, कापड अगणित बिछाइत हातास लागली. बेवीस वजीर नामांकित
धरिले.
खासा इख्लासखान पाडाव झाला. हजार-दोन हजार सडे, सडे पळाले, असे युद्ध जाहले.’
प्रतापराव सरनौबत
,आनंदराव,व्यंकोजी दत्तो,रुपाजी भोसले सूर्यराव काकडे ,विसाजी बल्लाळ मोरो
नागनाथ,मुकुंद बल्लाळ वरकड बाजे वजीर उमराव ऐसे याणी शिकस्त केली .
तसेच मावळे लोक याणी व
सरदारांनी कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत या उभयतांनी
आंगीजणी केली .
आणि
युद्ध करिता सूर्यराव काकडे पंचहजारी ,मोठा धारकरी ,याणे युद्ध थोर केले.
ते समयी जंबुरीयाचा गोळा लागून (सूर्यराव )पडिला . वरकड ही नामांकित शूर
पडले असे युद्ध होऊन (मराठ्यांची )फत्ते जाहली "
शिवाजी महाराज म्हणाले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.'
साल्हेरच्या युद्धाचा
मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. ते शिवाजी अजिंक्य आहे असे मानू
लागले.सूर्यराव काकडे यांच्या शिवाय" रामजी काकडे" हा सरदार शिवाजी
महाराजांच्या पदरी चाकरी करीत होता
. "बाजी काकडे "या सरदाराने छत्रपती राजाराम महाराज यांची
इमाने इतबारे सेवा केली. सुंदररओ काकडे व त्याचा भाऊ पानिपतच्या
युद्धामध्ये मराठयांकडून लढताना धारातीर्थ पडले आहेत .
या पुरंदर तालुक्यातील
अनेक सरदारांनी आपल्या प्राणांची आहुती स्वराज्यासाठी दिलेली आहे .काकडे
घराण्यातील अनेक सरदारांनी आपले रक्त या स्वराज्यासाठी सांडले आहे.
म्हणूनच या कऱ्हे पठारावर माझे नितांत प्रेम आहे.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 21 July 2020
## सूर्यराव काकडे ##
## सूर्यराव काकडे ##
Subscribe to:
Post Comments (Atom)
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment