विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

## भुत्यातेली ## शिखर शिंगणापूर ##



## भुत्यातेली ## शिखर शिंगणापूर ##

सातारा जिल्यातील माण तालुक्यात दहिवडीपासून २० की . मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसलेले आहे . या डोंगरालाच शंभू महादेवाचा डोंगर म्हणले जाते .
शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यात या क्षेत्राला विशेष स्थान असून मालोजीराजे भोसले यांनी या ठिकाणी १६३० सन एक तलाव बांधला त्याला "शिवतीर्थ तलाव" असे म्हणतात.
शहाजीराजे जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर सोडून जाताना दर्शनासाठी शिखर शिंगणापुरास आले . परमुलखात जाताना जिजाबाईंना एकटे सोडून जाताना चिंताग्रस्त असताना मंदिरात दृष्टांत झाला . सर्व काही ठीक होईल .
राजे निश्चिन्त मार्गस्थ झाले . या गोष्टीची आठवण म्हंणून त्यांनी जरी परक्या बरोबर भगवे निशाण लावण्यास सुरवात केली .
या ठिकाणी पार्वतीने रुसून बसलेल्या शंकरास हुडकून काढले व त्याच्याशी पुन्हा दुसऱ्यांदा विवाह केला म्हणून या क्षेत्राला" दक्षिण कैलास " असेही संबोधले जाते.
या मंदिरातील घंटा ह्या पोर्तुगीजांच्या आहेत . या बहुदा कोकणातील गोव्या जवळील प्रांतातून आणल्या असाव्यात त्या १७२० सन मधील आहेत.
मूळ हेमाडपंथी असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी बळवंतराव यांच्या करवी केलेला होता .
शिंगणापूर हे नाव देवगिरीच्या यादवांचा एक राजा" सिंघण "(१२१०-१२४७) याच्या नावावरून पडले आहे.
कोल्हापूरच्या भोज राज्याबरोबर लढताना सिंघण राजाने येथे आपला तळ ठोकला होता.
विजापूरहून बजाजी निबाळकर पुन्हा स्वराज्यात परतले सन १६५१ मध्ये व याच याच शिंगणापूरच्या साक्षीने जिजाबाईंनी बजाजी निंबाळकरांचे झालेले धर्मांतर दूर करून हिंदू धर्मात पुन्हा मानाने स्वीकार केला .
त्र्यंबकजी डेंगळे यांनी सन १८१७ मध्ये पेशवाईच्या अस्ताच्या काळात शिंगणापूर च्या गड वजा डोंगराचा आश्रय घेतला . आसपासचे १८०० मावळे जमा करून इंग्रजांच्या विरोधात लढाई करण्याची तयारी केली .
परंतु १८१८ मध्ये जनरल
स्मिथ ने शिंगणापूरचा कब्जा मिळवला .
चैत्र शुद्ध १२ दरवर्षी महादेवाची यात्रा भरते . महादेवाला धार घालण्यासाठी लांबून लोक कावड घेऊन या तीर्थक्षेत्री जमा होतात.
सासवडचे शंकराचे परम भक्त" श्री भुतोजी तेली "यांच्या कावडीचा प्रथम मान शिंगणापूरला आहे .
भुतोजी हा विशुद्ध मनाने भक्ती भावाने निःसंग होऊन वैराग्य वृत्तीने यात्रेस जात असे . सातारच्या आबासाहेब महाराजांनी २३ शेर वजनाचे अर्पिलेले वजनाचे १२ -१२ हांडे पाणी मावेल असे दोन तांब्याचे रांजण कावडीस दिलेले आहेत.
फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या राजवाड्यात बहुमानाने कावड नेली जात होती . राजघराण्यातील माणसांकरवी कवडीची पूजा होऊन ती मार्गस्थ होते .
शंभू महादेवाच्या बिकट मुंगी घाटातून कावड महादेवाच्या डोंगरावर पोहोचते . बुडत्या सूर्याच्या साक्षीने सासवडच्या कऱ्हा नदीच्या पाण्याने शिवलिंगास आभिषेक केला जातो. हि परंपरा पिढ्यान पिढ्या सुरु आहे .
भुतोजी यांची समाधी जुन्या सासवड -एखतपूर रस्त्यावर आहे. शंभू महादेवाचा महान भक्त भुतोजी यांच्या मुळे शिंगणापूर यात्रेतील कावडीच्या पहिला मान सासवडकराना पिढ्यान पिढ्या मिळतो आहे.
. भुतोजी यांच्या वंशातील विश्वनाथ कावडे, काशिनाथ कावडे कैलास उर्फ राजेंद्र कावडे अशी वंश परंपरा सासवड मध्ये अखंड सुरु असून शंभू महादेवाची सेवा श्रद्धापूर्वक पिढ्यानपिढ्या ठेवली आहे.
. धन्य ज्यांनी भुतोजी यांच्या वंशात घेतला ....... त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं .......


No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...