विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

अहिल्यादेवी होळकर यांचे सांस्कृतिक योगदान

अहिल्यादेवी होळकर यांचे सांस्कृतिक योगदान
postsaambhar :परमेश्वर पवार-पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
अहिल्यादेवी होळकर यांचे सांस्कृतिक योगदान महत्वपुर्ण आहे . संस्कृती , धर्म यांची स्थुलमानाने ओळख ही प्रार्थनास्थळे , तिर्थस्थळे , पवित्र नद्या , नद्यांची उगमस्थाने भक्तिचा जागर याच पवित्र प्रार्थनास्थातील घंटानादाने , पवित्र जलांच्या अभिषेकांनी , घाटावरील संध्याआरतींनी ..
अहिल्यादेवींनी गंगा नदीच्या उगमापासुन ते सागारात विलिन होता पर्यंतच्या गंगेच्या खोर्यात अनंत मंदीरांची , घाटांची बांधनी , जिर्नोद्धार केला .अहिल्यादेवी म्हणजे मंदिरांच्या आश्रयदात्या . गंगा , यमुना , शरयु , गोदावरी , तापी नर्मदा आजही या कर्मयोगीनींच्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक पाऊलखुणा मिरवत आहेत . घाट - मंदिरे म्हणजे नद्यांची आभुषने .
सोमनाथ मंदीरापासुन सुरु होणारा हा अहिल्यापर्वाचा सांस्कृतिक ठेवा जगन्नाथपुरी पर्यंत विस्तारलेला आहे . मराठा साम्राज्याने शिवछत्रपतिंनी रायगडावर जगदिश्वराच्या पायरीपासुन सुरु झालेला हा सांस्कृतिक प्रवास काशी विश्वेश्वरापावेतो रुंदावलाय . ज्योतिर्लिंगे , पवित्र धाम या सर्व स्थळांना झळाली मिळाली ती अहिल्यापर्वात ...!!! इंदुर खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. ( इंदौर या शहराला काही दिवसापुर्वी भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणुन दर्जा मिळाला आहे . ) महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर यांना अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवी यांनी आश्रय दिला.
काशीविश्वराचे मंदिर असो किंवा प्रसिद्ध दशास्वमेघ घाट , रामेश्वरम मधील मंदिराचे बांधकाम या सर्व तिर्थक्षेत्रांना अहिल्यादेवींनी सढळ हाताने मदत केली . रयतेसाठी अनंत विहीरी , तलाव , धर्मशाळांची ऊभारणी ऊभ्या हिंदुस्थानात सम्राट अशोकानंतर अहिल्यादेवींचे नाव येते .
त्यांच्या या सांस्कृतिक कार्याचा वटवृक्ष पश्चिमेकडील गुजरात प्रांतापासुन ते पुर्वेकडील ओरिसापर्यंत . आणि ऊत्तरेतील जम्मुपासून दक्षिन दिशेला रामेश्वरम पर्यंत पसरलेला आहे .
अहिल्यादेवी होळकरांनी हिंदुस्थानात केलेल्या कार्याचा मागोवा .... भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे गंगोत्री येथे विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
केदारनाथमध्ये धर्मशाळा व कुंड.
बद्रिनारायन मध्ये श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री).
देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
हरिद्वारमध्ये कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
हांडिया – सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा हृषीकेशमध्ये अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर.
गया मध्ये विष्णुपद मंदीरांचे बांधकाम . जगन्नाथपुरी येथे श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा निर्माण केला.
कुरुक्षेत्रमध्ये शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
जामघाट – भूमिद्वार.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
अकोले तालुक्यात विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर. अंबा दिवे .
ओझर येथे दोन विहिरी व कुंड.
कोल्हापूरात मंदिर-पूजेसाठी साहाय्य. घृष्णेश्वराचे शिवालय तीर्थाचे बांधकाम.
विष्णु व रेणुकेचे मंदिराची ऊभारणी चांदवड वाफेगावमध्ये केली .
चिखलदर्यात अन्नछत्र सुरु केले.
जेजुरी तिर्थक्षेत्रात सन १७७० मध्ये सुभेदार मल्हाराव होळकर यांची छत्री असलेले मल्हार गौतमेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर , मार्तंड मंदिरे , जनाई महादेव तलाव व मल्हार या नावाचे तलाव बांधला. तलावातून मोटेद्वारे पाणी उपसण्यासाठी दोन थारोळींचे बांधकाम . पुजेसाठी फुलबागदेखील फुलवली. तसेच चिंचेची झाडांची बाग वसवली .
जळगांवमध्ये राम मंदिराची बांधनी .
जालना जिल्ह्यात जांब जन्मगाव रामदासस्वामी मठासाठी दान .
त्र्यंबकेश्वर कुशावर्त घाटावर पूल ऊभारणी .
नाथद्वार पैठणमध्ये अहिल्या कुंड, मंदिर, विहीर बांधणी .
निमगावमध्ये (नाशिक ) विहीर बांधणी.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
पंचवटी नाशिकमध्ये श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपुरात श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास नाशिकमध्ये विहीर .
पुणतांबे येथे गोदावरी नदीवर घाट.
पुण्यात घाटाचे बांधकाम ( नावाचा ऊल्लेख नाही . )
बीड मध्ये घाटाचा जीर्णोद्धार.
भिमाशंकरमध्ये गरीबखाना.
भुसावळात चांगदेव मंदिर ऊभारणी.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर)– सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रावेरमध्ये केशव कुंड बांधले.
वाफेगाव – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वेरुळमध्ये लाल दगडांचे मंदिर बांधले.
श्री वैजनाथ (परळी )– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
शिंगणापुर श्री शंभु महादेव पर्वत येथे विहीर पुर्ण.
संगमनेरमध्ये राम मंदिराचे बांधकाम केले.
सप्तश्रृंगीमध्ये धर्मशाळा बांधली.
साखरगावात विहीर खोदली.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार.
सुलतानपूर (खानदेश) – मंदिरांचे बांधकाम .
सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
नैमिषआरण्य ऊत्तरप्रदेशात – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
चित्रकूटमध्ये श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
अयोध्या येथे श्री रामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
काशी येथे काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाटांची ऊभारणी.
प्रयाग येथे विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
चौंडी येथे चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा.
गोकर्णमध्ये रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
अमरकंटक मध्ये श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड.
अलमपूरमध्ये हरीहरेश्वर मंदिर , बटुक मंदिर , मल्हारीमार्तंड मंदिर , सूर्य मंदिर , रेणुका मंदिर , राम मंदिर , हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायण मंदिर , मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक.
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
नैम्बार मध्यप्रदेशात मंदिर बांधले . उज्जैनमध्ये चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
इंदूर – अनेक मंदिरे व घाटांची ऊभारणी.
ओंकारेश्वर येथे मामलेश्वर महादेव.
कर्मनाशिनी नदी – पूल.
बर्हाणपूरमध्ये घाट व कुंडांचे बांधकाम .
बिठ्ठूरमध्ये ब्रह्मघाट बांधला .
कुम्हेर मध्ये विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
भरतपूरमध्ये मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरामध्ये नऊ मंदिरे व धर्मशाळा.
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर शंभरपेक्षा जास्त मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरांची ऊभारणी .
वृंदावनमध्ये चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
द्वारका येथे मोहताजखाना, पूजागृह व पुजार्यांना काही गावे दान.
संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
सिंहपूर – शिव मंदिर व घाट
पुष्करमध्ये गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
सौराष्टात सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा. धर्मशाळा, विहिरी.
श्री शैलम मल्लिकार्जुन येथे शिवाचे मंदिर.
बेल्लूर कर्नाटकमध्ये गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
रामेश्वर तामिळनाडुमध्ये हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
१८ व्या शतकातल्या सांस्कृतिक योगदानामध्ये छत्रपति थोरले शाहू महाराज आणि अहिल्यादेवी होळकर या दोन व्यक्तिंवर सांस्कृतिक कार्य या विषयांवर शोधप्रबंध होईल इतके भव्य कार्य या दोन महाराष्ट्रीयन माणसांनी करुन ठेवले आहे .
संदर्भ - ज्ञात अज्ञात अहिल्या लेखिका - विनया खडपेकर . विकीपीडीया _______________________ ___________
फोटो - अहिल्यादेवी पुतळा , महाराष्ट्र सदन दिल्ली .
#अहिल्यापर्व #जागर_इतिहासाचा
📷

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...