विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

★ तेजस्विनी रणरागिणी...

★ तेजस्विनी रणरागिणी...
postsaambhar :Varsha Mishra
अहिल्याबाईचा स्वाभिमानी बाणा,करारीपणा, मुत्सद्देगिरी आणि निर्णय क्षमता, व्यवहार चातुर्य हे त्यांच्या तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांवरून दिसून येतो... जेव्हा राघोबादादा नी अहिल्याबाईनां पत्र लिहिलं की, सैन्य तुकडीच्या खर्चासाठी आम्हाला तीस लक्ष रुपये त्वरित पाठवावे अन्यथा.... यावर अहिल्याबाईनी राघोबादादास पत्र लिहिले की,'"आमच्या पुर्वाजांनी कुणाची खुशमस्करी करून हे राज्य कमावले नाही तर रक्ताचे पाणी केले आहे. मी एक अबला,असहाय स्त्री आहे या भ्रमात कोणी राहू नये. मी खांद्यावर भाले घेऊन समोर ऊभे राहिले तर सगळे मनसुबे जागच्या जागी वीरतील. माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहिले तर आमचीही तलवार चालेल, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमचेकडेही फितुरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी? दुखात बुडालेल्यास अधिक बुडवावे? हा दुष्ट हेतू आपला. आता आपली गाठ रणांगणातच पडेल.माझ्याबरोबर युध्द कलेत पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल .मी हरले तरी किर्ती करून जाईन, पण आपण स्त्रियांकडुन हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा ऊरणार नाही. आपण जिथं आहात तिथून माघारी फिरावे. त्यातच आपले हित आहे'". अहिल्या बाईच्या याच कणखर, मुत्सद्दीपणा मुळे त्याच्या राज्यावर आलेल्या कित्येक संकटात ही त्या डगमगल्या नाहीत त्यांच्या ठायी असणारी राजकीय परीपक्वता व ऊच्चकोटीचा राजकीय दुष्टीकोन, त्यामुळे च ही 'तेजस्विनी' लोककल्याणकारी राज्य करणारी रणरागिणी ठरली......
#अहिल्यापर्व
#जागर इतिहासाचा
संदर्भ- महाराष्ट्र ाची शिल्पकार तेजस्विनी अहिल्या होळकर- विजया जहागीरदार

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....