विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## चतुरसिंग (छत्रसिंह?)राजे भोसले ##


## चतुरसिंग (छत्रसिंह?)राजे भोसले ##

चतुरसिंग राजे भोसले हा मालोजी व विठोजी या सुप्रसिद्ध भोसले बंधूंपैकी विठोजीचा वंश होय.
विठोजीचा आठ मुलांपैकी नागोजी म्हणून होता.
त्या नागोजीचा मुलगा रावजी हा वावी येथे राहू लागला.
रावजीस तीन मुलगे झाले.
विठोजी, परशुराम आणि चतुरसिंग.
पैकी वडील विठोजी हा सन 1777 मध्ये छत्रपती सातारकर रामराजा यास दत्तक होऊन,
" धाकटा शाहू" या नावाने सिहासनारूढ झाला .
चतुरसिंगही साताऱ्यात त्याचे बरोबर राहू लागला.
परशुरामाचा वंश हल्ली वावी मध्ये आहे .
माधवराव पेशव्याच्या मृत्यू नंतर पुण्यास नवनवीन बनाव झाले
व बेबंदशाही माजली.
तेव्हा शाहूंच्या मनात राज्याच्या भविताव्याचे विचार घोळू लागले .
शाहूची चवथी बायको शिर्के यांची होती .
तिचे नाव "आनंदीबाई" तिला "माईसाहेब "म्हणत .
नवऱ्याचे पशात प्रतापसिह लहान असता तिने साताऱ्याच्या कारभार उत्तम चालवला.
एका इंग्रज प्रवाशाने तिच्याबद्दल लिहून ठेवले आहे .
तो म्हणतो," ही राणी घोड्यावर बसण्यात प्रवीण आहे.
तिचा स्वभाव प्रेमळ व बोलका आहे.
हिंदू स्त्रिया मध्ये असणारा भित्रेपणा या राणीत नाही.
व्यवहार चातुर्य व प्रसंगावधान या गुणांमुळे तिची कर्तबगारी उठून दिसे.
शाहूची पहिली बायको "लक्ष्मीबाई" ही "नारायण मोहिते "यांची कन्या.
ईचीच बहीण" बबईसाहेब" शाहूने बंधू चतुरसिंगास करून26/11/1789 साताऱ्यास लग्न केले .
हिचे पोटी चतुरसिंगास पुढे 18/7/1798 मुलगा झाला.
त्याचे नाव" बळवंतराव".
यालाच पुढे राज्याचा सेनापती प्रतापसिंह महाराजांनी केला.
तो" बळवंत सेनापती" नावाने प्रसिद्धीस पावला..
आशा वातावरणात चतुरसिंग मोठा झाला .
प्रतापराव गुजरातचा नातू रघुनाथराव त्याच्या बरोबर होता..
छत्रपतींची अवस्था बघूनत्यास खूप दुःख होई .
चतुरसिंग हुशार धाडसी कल्पक होता.
तोच छत्रपतींच्या गादीस मालक झाला असता तर राज्याची घडी बसवू शकला असता .
माधवराव पेशवे यांच्या मृत्यू नंतर राज्याची घडी विस्कळीत झाली.. मराठेशाहीच्या पडत्या काळात चतुरसिंगच्या उद्योगास बंडखोरीची स्वरूप प्राप्त झाले.
हा दैवदुर्विपाक आहे.
ब्राम्हण, प्रभू ,मराठे सर्व जीवास जीव देणारे सहाय्यक त्याने पैदा केले .
व्यासराव गोपाळ डबीर ,बापू कान्हो ,फडणीस, मल्हार रामराव चिटणीस, मुंगीकर मालोजी भोसले ,भवानजी राजे शिर्के ,रघुनाथ गुजर समस्त लोक चतुरसिंग बरोबर होती.
सर्जेराव घाडगे याने बाजीराव पेशवे याची गाठ 1810 मध्ये पुण्यात घालून दिली .
परंतु हा बाजीराव त्यास उथळ वर्तनाचा वाटला.
त्यास कंटाळून तो विजापुरास गेला .
चतुरसिंग ज्या वेळेस बाहेर पडे त्यावेळेस त्याच्याबरोबर हजार पाचशे लोक असत.. यशवंतराव होळकरांनी पुण्यावर चाल केली.
त्यावेळेस बाजीराव वसईला इंग्रजांकडे पळून गेला .
आता वेळ गमावून उपयोग नाही हे समजून तो साताऱ्यास आला.
छत्रपतींजवळ आपली पत्नी व मुलास ठेवून म्हणाला
" सेवा करून यश मिळवू, अथवा मरून जाऊ."
असे सांगून छत्रपतींचा निरोप घेतला
.बऱ्हाणपूर ला शिंद्यांना भेटण्यास जाताना त्याने सिंदखेडराजा ला "जगदेवराव जाधवांची "भेट घेतली.
तेथून अजिंठ्याच्या घाटात सर्जेराव घाडगे यांची भेट घेतली.
10/8/1803आईसअडगाव वगैरे युद्धात त्याने प्रत्यक्ष सहभाग घेऊन इंग्रजांचा पराभव करण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली.
परंतु त्याचा पराभव झाला .
मोठमोठ्या सरदारांचा पाडाव झाला.
शिंदे होळकरांच्या फौजा मोठ्या असूनही ते आपापसात भांडतात याचे त्याला खूप वाईट वाटे. त्यामुळे अल्पसंख्यांक इंग्रजांना जय मिळतो .
हे पाहुन मराठी राज्य वाचवण्याचे उद्योगास तो लागला .
तो रघुजी भोसले नागपूरकर यांच्याकडे गेला ..
तो तेथून दोन हजाराची फौज घेऊन जबलपूर -चंबळ नदीकाठी दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर याना भेटला .
तेथे कारीमखान,अमिरखान या सरदारांनाही चर्चेला बोलावले .
भरातपुरास जाऊन जाठाची गाठ घेतली .
जोधपूरकर "राजा मानसिंग" याला भेटला .
जयपूरच्या" जगतसिंग" याला भेटून इंग्रजांना या देशातून बाहेर काढण्याविषयी बोलणी केली .
उज्जैनमध्ये आल्यावर त्याला समजले की छत्रपती शाहू कैलासवासी झाले
आपला पुत्र व पत्नी यास बाजीरावाने कैदेत ठेवले.
" ज्याच्या जीवावर आपण एव्हडा वनवास पत्करला तो छत्रपती गेल्याने त्याचा आधार तुटला".
सर्व मंडळी फिरून थकली शेवटी आपल्या राज्यात जावे असे वाटू लागले.
त्र्यम्बकजी डेंगळे यांनी चतुरसिंगास अभिवचन दिले.
बेल भंडारा इमान मालेगावस झाला .10/2/1811 रोजी भेटीचा दिवस ठरला" गिरणे काठी" चतुरसिंगचा तळ होता.
त्यास आकरा असामिनीं एकाएकी घेर घालून कैद केले.
त्यास बेड्या घालून रायगडास पाठवले.. चतुरसिंग रायगड जवळील "कांगोरी" किल्यावर15/4/1818 रोजी मरण पावला.
आशा रीतीने छत्रपतींच्या वंशातील अशा अप्रसिद्ध व्यक्तीचा शेवट झाला.
चतुरसिंग याने राज्यासाठी कष्ट मेहनत घेऊन फार लढाया केल्या.
त्याचा पुत्र "बळवंत सेनापती" यानेही चाकरी करून निमक अदा केले.
आपले इमान कायम राखले .
असे दुसरे कोणी कामास आले नाहीत".
चतुरसिंग सारखे किती पुरुष राष्ट्राकरिता देह कष्टवून झिजले असतील .
ज्यांना यश मिळते त्यांचा तेव्हढा बोलबाला होतो .
यशवंतराव होळकर ( याना नंतर अति विचाराने वेड लागले),
विठोजी होळकर,
अमिरखान,
सर्जेराव घाडगे,
धोंडजी वाघ
चतुरसिंग वगैरे बहुत पुरुषांची कर्तबगारी राष्ट्राचे उपयोगास न येता वाया गेली . चतुरसिंग याने कितीही संकटे आली तरीही इंग्रजांना सामील होऊंन राष्ट्रद्रोहाचे पातक जोडले नाही.
" छत्रपतींची सेवा करून कीर्ती संपादावी अथवा स्वामीकार्यावर मरून जावे.
" हा मनाचा निर्धार त्याने कायम ठेवला .

डॉ. उदयकुमार जगताप

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...