छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत स्वराज्यात पाय ठेवण्याची हिम्मत औरंगजेब झाली न्हवती इतका दरारा शिवरायांचा होता. महाराजांच्या मृत्यू नंतर स्वराज्यावर नख लावून हा प्रदेश सहज जिंकता येईल अशा भ्रमात औरंगजेब होता.
परंतु स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती नी औरंगजेबाच हे स्वप्न सहजासहजी पूर्ण होऊन दिलं नाही. म्हणून चिडलेल्या औरंगजेबाने कपटाने ११ मार्च १६८९ रोजी जाणीवपूर्वक छत्रपती शंभुराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर १६९० मध्ये औरंगजेबाने येसूबाई राणीसाहेब, शंभुराजेंचे पुत्र आणि थोरल्या बहीण शाहू महाराज आणि राणूबाईसाहेब यांना कैद करून नेले.
येसूबाईंना ऐन उमेदीच्या काळात तब्बलं २९ वर्षे मुघलांच्या कैदेत राहावे लागले तर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना देखील २९ वर्षातील १७ वर्षे औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील छावणीत नजरकैदेत राहावे लागले.
मोठ्या शर्थीने १७१९ मध्ये मराठ्यांनी राणीसाहेबांना सोडवून घेतले. या सगळ्या धामधुमीत छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या मुघली शेख निजाम उर्फ मुकर्रबखान सरदाराने अटक केली. त्याला बंदोबस्त करणे करजेचे होते. संभाजी महाराजांच्या हत्येला मुख्य कारणीभूत ठरलेला मुकर्रबखानाला शूर सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांनी यमसदनी धाडलं.
मावळ्यांचे नीतीधैर्य वाढावे, मुघलांना एक दणका देऊन स्वराज्याची निष्ठा आणि सह्याद्रीची ताकद काय आहे हे दाखवायचे होते. येसूबाईंच्या कैदेचा बदला घ्यावा, शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपले वडील म्हाळोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्या वेळचे स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांनी एक मोहीम आखली आणि आपल्या भरावश्याच्या गुप्तहेरांमार्फत शक्य ती माहिती मिळवली.
रामचंद्र पंत आमात्य यांनी दुर्ग आणि त्यांचं महत्व किती आहे ते निश्चित जाणलं होतं. आणि म्हणून आमात्य, शंकराजी नारायण, धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गडकिल्ले स्वराज्यात आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली आणि एक एक करत स्वराज्याचं वैभव पुन्हा स्वराज्यात येत होतं. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोघलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर जिथे शंभुराजांना कैद झाली तो प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात आणणे हा होता.
संगमेश्वरवर हल्ला केल्यावर याच ठिकाणी शंभूराज्यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याच्यावर संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हल्ला करण्यात आला ज्यात त्यांना साथ मिळाली ती शंकराजी नारायण यांची. अचानक झालेला हा हल्ला इतका जोरदार होता की मुकर्रबखान काहीच करू शकला नाही.
जखमी मुकर्रबखान जिवाच्या आकांताने पळत होता आणि संताजी घोरपडे त्याचा घोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व नारायण यांनी इतकी मारहाण केली की तो तडफडून मेला. शेवटी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जवाबदार असणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत झाला.
No comments:
Post a Comment