मोहीते घराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहाने "बाजी" हा किताब दिला होता.
रतोजी मोहित्यांना दोन पुत्र एकाचे नाव संभाजी आणि दुसर्याचे नाव तुकोजी.
तुकोजी मोहित्यांचे संभाजी आणि धारोजी हे दोन पुत्र व तुकाबाई हि एक कन्या .
यातील संभाजी मोहिते याचा विवाह घाटग्यांची कन्या गंगाबाई आणि धारोजीचा विवाह घोरपडे यांच्या कन्या सुन्नाबाई यांच्याशी झाला .
तर तुकाबाई यांचा विवाह शहाजी राजेंसोबत झाला.
धारोजी मोहित्यांना नेताजी आणि दीपाजी असे दोन पुत्र तर संभाजी
मोहित्यांना हरिफराव , हंबीरराव आणि शंकरजी हे पुत्र आणि सोयराबाई व
अण्णूबई या दोन कन्या होत्या.
रतोजी मोहीते यांना "बाजी" पदवी
मिळाल्याने त्यांचे वंशज बाजी मोहीते हेच आडनाव लावत असावेत त्यामुळे काही
ठिकाणी तुकाबाईंच्या भावाचे नाव बाजी मोहीते असे आले असावे.
या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध शहाजीराजेंशी येवून ते
शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले. संभाजी मोहिते व
धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी.
यातील संभाजी
मोहितेंचा मुलगा म्हणजे हंसाजी(हंबीरराव) मोहिते "हा मर्दमराठा"
शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे
शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले
मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती
घराण्यांशी नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव
मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह
लावून दिला.
याच घराण्यातील हंसाजी ‘हंबीरराव’ मोहिते – हंबीरराव
माणूस तसा रांगडा परंतु स्थिर बुद्धीचा.शंभूकालात जी मोगली वावटळ उठली
त्यात सगळ्यात महत्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंबीरराव
मोहित्यांनी.
सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला (राजाराम महाराज) छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो हे विशेष!
शिवाजी महाराजांच्या पश्चात हे संभाजी महाराजांच्या पक्षास येऊन मिळाले
होते . यांच्यामुळेच संभाजी महाराजांना ताबडतोब गादी मिळाली होती. यांनीच
मोरोपंत व अण्णाजी या सोयराबाईच्या बाजूच्या प्रमुख कटवाल्यांस संभाजी
महाराजांच्या स्वाधीन केलें
No comments:
Post a Comment