विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

#ऐतिहासिक_राजे_सलगर_राजघराणे

#ऐतिहासिक_राजे_सलगर_राजघराणे
माणदेशातील खरसुंडीच्या भागातील करगणी, गोमेवाडी, हिवतड इत्यादी गावाचे वतनदार सलगर होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात पराक्रम गाजविलेले सरदार विठोजी सलगर, सरदार अंगाजी सलगर, बहिर्जी सलगर हे याच घराण्यातील मात्तबर वीरपुरुष होत.
सलगर घराण्याच्या संबंधाने समकालीन मोगल इतिहासकार शहानवाज खान म्हणतो कि, " सलगर घराणे हे धनगर असून यांचे पूर्वज तुंगभद्रेच्या तीरावरील 'अनेगोंदी' येथील आहेत, याच गावाला पूर्वी राजगादी होती. पुढे याच घराण्यातील वंशज विजापूरला येऊन नेमाजीराजे सिंदे यांच्या सैन्यात प्रमुख बनले आणि पुढे चालून मुघलांनी बहिर्जीला सात हजारांची मनसब देऊन 'राजा वीर बहादूर' हि पदवी दिली होती. हा बहिर्जी फक्त योद्धा नसून एक साहित्यिक सुद्धा आहे, तो फारसी आणि उत्तरेतील दोआब (मैथिली किंवा भोजपुरी असावी) मधील भाषेत काव्य करतो."
* संदर्भ- सरंजामी मरहट्टे (लेखक- संतोष ग. पिंगळे) पोस्ट साभार:सुमित लोखंडे

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...