postsaambhar :Prashant Babanrao Lavate-Patil
====================================
मल्हारपुत्र खंडेराव यांचा विवाह अहिल्यादेवींशी झाला. कुंभेरीच्या लढ्यात खंडेरावांचा अपघाती मृत्यू झाला आणि तत्कालीन प्रथेनुसार अहिल्यादेवींनी सती जाण्याची तयारी सुरू केली. पण मल्हारबांनी त्यांना रोखले. होळकर कैफियतीत म्हणले आहे की, "खंडेराव महाराज कुंभेरीस कामास आले, ते समयी सहगमनाचा निर्धार, परंतु सुभेदारांनी (म्हणजे मल्हारबांनी) बहुतच ग्लानी केली... तेव्हा बाहेसाहेबांस संकोच प्राप्त होऊन (त्यांनी सती जाण्याची) मनेच्छा रहित केली."
यानंतर मल्हारबा गेले आणि अहिल्यादेवी एकट्या पडल्या. पुत्र मालेराव म्हणावे तसे कर्तृत्ववान निघाले नाहीत त्यांना घडवण्याचा खूप प्रयत्न अहिल्यादेवींनी केला परंतु त्यात यश मिळाले नाही. अहिल्यादेवींनी एकुलती एक कन्या म्हणजे "मुक्ताबाई". त्या काळात त्यांनी त्यांचा विवाह स्वयंवर पद्धतीने घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि जो कोणी राज्यातून चोर-दरोडेखोर यांचा नाश करेल त्याच्याशी मी माझया एकुलत्या एक कन्येचा विवाह लावून देईन असे जाहीर केले. जात-पात, उच-नीच असले कसलेही भेदभाव न पाहता निव्वळ कर्तृत्ववान पुरुषाशी मुलीचा विवाह लावून देण्याचा निर्णय त्यांनी त्याकाळी केला. यशवंतराव फणसे या तरुणाने ते आव्हान स्वीकारले आणि त्यामध्ये यश प्राप्ती करून मुक्तबाईंच्या गळ्यात वरमाला घातली.
पण दुर्दैव इथे कुठे थांबते, मुक्ताबाईंचा मृत्यू लहानशा वयातच आजाराने झाला आणि त्यानंतर तीन वर्षात यशवंतराव सुद्धा गेले. पण जीवनातील अशा अनेक प्रसंगांना अहिल्यादेवींनी निडरपणे तोंड दिले.
अहिल्यादेवींबद्दल नाना फडणवीस म्हणतात "पुरुषार्थ, दुरदृष्टीपणा व म्हणता यामध्ये अहिल्याबाई अद्वितीय आहेत .... या गोष्टींत त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही."
आहिल्यादेवींचे पुत्र मालेराव निपुत्रिक वारल्याने "गंगाधर यशवंत चंद्रचूड" होळकरांचे कारभारी यांनी दत्तकाचा प्रश्न उभा केला. राघोबादादांच्या मदतीने अहिल्यादेवींना राजकारणातून बाहेर करायचे असा चंद्रचूड यांचा प्रयत्न होता. राघोबादादा यांनी या परिस्थितीचा फायदा घेत तातडीने सैन्याची जमवाजमव केली आणि उत्तरेकडे धाव घेतली. ही खबर आहिल्यादेवींना लागताच त्यांनी हा कट हाणून पाडायचे ठरवले आणि दत्तकाची मागणी फेटाळून सर्व सत्ता स्वतःच्या हाती घेतली.
"मी एक अबला आहे, असह्य आहे, या भ्रमात कोणी राहू नये. मी भाला घेऊन उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील."
याचवेळी त्यांनी सर्व सरदारांना आव्हान केले व स्त्रियांची एक स्वतंत्र पलटन उभी केली. त्यांचा पुतण्या तुकोजीराव होळकर यांनी सैन्याची जमवाजमव करून नेतृत्व केले.
राघोबादादांना अहिल्याबाईंचा निर्वाणीचा खलिता मिळाला.
"माझे राज्य हिरावून घ्यायला आपण सैन्य घेऊन आला आहात .... पण मी कोणत्या प्रकारची अबला आहे हे तुम्हाला रणांगणातच कळेल ... माझ्या अधिपत्याखाली स्त्रियांची फौज तुमच्याशी समर करेल. मी हरले तर मला कोणी हसणार नाही; पण आपण हरलात तर जगात तोंड काढायला जागा राहणार नाही."
राघोबादादा परत फिरले.
=======================================
अहिल्यादेवींबद्दल मुंबईचा गव्हर्नर माल्कम म्हणतो "आहिल्याबाईंचे चरित्र निर्मळ आणि राज्य कारभार अत्यंत वाखाणण्याजोगा होता. परमेश्वरावर निष्ठा ठेवून कर्तव्यपरायण राहिल्याने माणसाला किती फायदा होतो हे बाईंच्या जीवणावरून स्पष्ट होते.
=======================================
जोआना बेली नामक ब्रिटिश कवयित्रीने १८४९ साली अहिल्यादेवींवरची ही कविता पहा,
"For thirty years her reign of peace,
The land in blessing did increase;
And ahe was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young.
Yea, even the children at their mothers feet
Are taught auch homely rhyming to repeat
In latter days from Brahma came,
To rule our land, a Nobel Dame,
Kind was her heart, and tight her frame,
And Ahlya was her honoured name."
#जागर_इतिहासाचा
#अहिल्यापर्व
No comments:
Post a Comment