postsaambhar :Avdhut Lalge
#
#अहिल्यादेवींनी अनेक हिंदू मंदिरे बांधली, असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला, धर्मशाळा, अन्नछत्र, घाट, रस्ते, विहिरी बांधल्या. बर ही सर्व कामे करताना त्यांनी फक्त स्वतःच्या होळकर संस्थान चा विचार केला नाही तर संपूर्ण हिंदुस्थान चा विचार केला, ज्या काळात संस्थानिक स्वतःच्या संस्थांचा विचार करत होती त्या काळात अहिल्यादेवींनी उभ्या हिंदुस्थानचा विचार केला. #दानत_लागते धर्मासाठी आणि लोककल्याणकारी कामे करण्यासाठी तिजोरी रिकामी करायला सुद्धा. मुस्लिम राजवटीने जर जर झालेल्या हिंदू मंदिरांना पुनरप्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानेे हिंदुस्थानातील हिंदूंचा आत्मविश्वास किती वाढला असेल याची कल्पना येत नाही. हिंदू मंदिरे आणि इतर कामे करताना हिंदूंनी नाही पण ज्या ठिकाणी #मुस्लिम_संस्थानिकानी त्यांना विरोध करताच त्यांनी #मराठ्यांच्या_बलाढ्य_लष्कराचा वापर करायला ही मागे पुढे पाहिले नाही, काही ठिकणी मुसद्दी पणाने त्यांनी जीर्णोद्धार करण्यासाठी मान्यता मिळवली. अहिल्यादेवी अत्यंत हळव्या, प्रेमळ अंत करणाच्या तसेच त्या वेळ प्रसंगी अत्यंत कठोर, निडर, तेजस्वी, मुसद्दी शासनकर्त्या होत्या याचा प्रत्यय त्यांच्या हितशत्रूंना लिहिलेल्या पत्रातून येतो त्या लिहतात की तुम्ही सांतावन करू पाहायला येता मग सोबत सैन्य कशाला, माज्या राज्याकडे दृष्ट नजरेने बघाल तर हत्ती च्या पायी साखळ दंडाणी स्वागत नाही केलं #तर_होळकरांची_सून_म्हणून_नाय_घेणार. आशा या थोर "#पुण्यश्लोक" म्हणवणाऱ्या मातेच्या कामाचा आढावा आपण थोडक्यात घेऊ :-
१) अकोले तालुका :- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर
२) अलमपूर (म.प्र.) :- हरिहरेश्वर, बुटुक, मल्हारी मार्तंड, सूर्य, रेणुका, राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायण, मारुती व नरसिंहाची मंदिरे, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक छत्री
३) अंबा गाव :- दिवे
४) आनंद कानन :- श्री विघ्नेश्वर मंदिर
५) अयोध्या(उ.प्र.) :- श्री रामाचे मंदिर, त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिध्दार्थ मंदिरे, शरयू घाट, विहीर, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा
६) बद्रीनारायण(उ.प्र.) :- श्री केदारेश्वर मंदिर, हरी मंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी,बिदरचाटी,व्यासंग, तंगनाथ,पावली), मन कुंड(गौरव कुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गाईंना चरणासाठी कुरणे
७) बीड (महाराष्ट्र) :- घाटाचा जीर्णोद्धार
८) बेल्लूर (कर्नाटक) :- गणपती,पांडुरंग,जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अंगी मंदिरे, कुंड
९) भानपुरा :- नऊ मंदिरे व धर्म शाळा
१०) भरतपूर :- मंदिर, धर्मशाळा आणि कुंड
११) भीमाशंकर (महाराष्ट) :- गरीबखाना
१२) भुसावळ (महाराष्ट्र) :- चांगदेव मंदिर
१३) बिठ्ठर :- ब्रह्मघाट
१४) बऱ्हाणपूर (म.प्र.) :- घाट व कुंड
१५) चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) :- विष्णू व रेणुकामाता मंदिर
१६) चौंडी :- चौडेश्वरी देवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिलेश्वर मंदिर, धर्म शाळा व घाट
१७) चित्रकूट (उ.प्र.) :- श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा
१८) चिखलदरा :- अनक्षेत्र
१९) द्वारका (गुजरात) :- मोहताजखाना, पुजागृह, व पुजाऱ्यांना काही गावे दान
२०) वेरूळ (महाराष्ट्र) :- लाल दगडाचे मंदिर
२१) गंगोत्री :- विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा
२२) गया (बिहार) :- विष्णू पद मंदिर
२३) गोकर्ण :- रावळेश्वर महादेव मंदिर, होळकरवाडा, बगीचा व गरीबखाना
२४) घृनेश्वर (वेरूळ-महाराष्ट्र) :- शिवालय तीर्थ
२५) हांडीया :- सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
२६) हरिद्वार (उ.प्र.) :- कुशावर्त घाट व म्होटी धर्मशाळा
२७) हृषीकेश :- अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
२८) इंदूर :- अनेक मंदिरे व घाट
२९) जगन्नाथ पुरी (ओरिसा) :-श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
३०) जळगाव :- राममंदिर
३१) जामघाट :- भूमीद्वार
३२) जांबगाव :- रामदास स्वामी मठासाठी दानधर्म
३३) जेजुरी :- मल्हार गौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव, होळकरवाडा, श्रीदत्त मंदिर
३४) कर्मनाशिणी नदी :- पूल
३५) काशी (बनारस) :- काशी विश्वनाथ, श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर आणि अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, माणिकर्णिका, दशस्वमेघ, जनाना, अहिल्याघाट, उत्तरकाशी, रामेश्वर, पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
३६) केदारनाथ :- धर्मशाळा व कुंड
३७) कोल्हापूर :- मंदिर पूजेसाठी साहाय्य
३८) कुंभेर :- विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक
३९) कुरुक्षेत्र (हरियाणा) :- शिव शंतनू महादेव मंदिरे आणि पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट
४०) महेश्वर :- शंभराव मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे
४१) मामलेश्वर महादेव :- दिवे
४२) मनसा :- सात मंदिरे
४३) मंडलेश्वर :- शिवमंदिर घाट
४४) मिरी (अहमदनगर) :- महादेव मंदिर
४५) नैेम्बार (म.प्र.) :- मंदिर
४६) नाथद्वार :- अहिल्या कुंड, मंदिर, विहीर
४७) नैमिषारण्या (उ.प्र.) :- महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड
४८) नीलकंठ महादेव :- शिवालय व गोमुख
४९) निमगाव (नाशिक) :- विहीर
५०) ओंकारेश्वर (म.प्र.) :- मामलेश्वर महादेव, आमलेश्वर, त्रंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, गौरी सोमनाथ मंदिर, धर्मशाळा विहीर.
५१) ओझर (अहमदनगर) :- दोन विहिरी कुंड
५२) पंचवटी (नाशिक) :- श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट, गोदावरी नदीवरील पुलाचा जीर्णोद्धार
५३) पंढरपूर :- श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभामंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
५४) पिंपळास (नाशिक) :- विहीर
५५) प्रयाग (अलाहाबाद) :- विष्णू मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा
५६) पुणे :- घाट
५७) पुंणतांबे (महाराष्ट्र) :- गीदावरी नदीवर घाट
५८) पुष्कर :- गणपती मंदिर, धर्मशाळा व बगीचा
५९) रामेश्वर (तामिळनाडू) :- श्री हनुमान, श्री राधाकृष्ण मंदिर, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
६०) रामपूरा :- चार मंदिरे, धर्मशाळा व घरे
६१) रावेर (महाराष्ट्र) :- केशव कुंड
६२) साखरगाव (महाराष्ट्र) :- विहीर
६३) संबळ :- लक्ष्मीनारायण मंदिर व दोन विहिरी
६४) संगमनेर (महाराष्ट्र) :- राम मंदिर
६५) सप्तश्रृंगी :- धर्मशाळा
६६) सरढाणा मिरत :- चंडीदेवीचे मंदिर
६७) सौराष्ट्र (गुजरात) :- सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा
६८) श्री नागनाथ (दारूकवन):- १७८४ मध्ये पूजा चालू केली
६९) श्री शैल्लमलिकार्जुन (कर्नूल, आ.प्र.) :- शिवाचे मंदिर
७०) श्री शंभू महादेव पर्वत, शिंगणापूर :- विहीर
७१) श्री विघ्नेश्वर :- दिवे
७२) सिंहपूर :- शिवमंदिर व घाट
७३) सुलपेश्वर :- महादेव मंदिर व अन्नछत्र
७४) सुल्तानपूर (खानदेश) :- मंदिर
७५) टेहारी (बुंदेलखंड) :- धर्मशाळा
७६) त्रंबकेश्वर :- कुशावर्त घाटावर पूल
७७) उज्जैन (म.प्र.) :- चिंतामणी गणपती, जनार्दन, श्री लीला पुरुषोत्तम, बालाजी तीलकेश्वर, रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर मंदीरे, १३ घाट, विहीर व अनेक धर्मशाळा इत्यादी.
७८) वृंदावन (मथुरा) :- चैनबिहारी मंदिर, कालीयदेह घाट, चीरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
७९) वाफेगाव (नाशिक) :- होळकर वाडा व विहीर
संदर्भ :- १) ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर
२) होळकरशाही भाग १
फोटो :- अहिल्याजन्मभूमी चौंडी येथील वाड्याचा
संकलन शब्दांकन :- अवधूत लाळगे.
#अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा
उत्सव_रयतेचा #उत्सव_आदर्श_राज्यकर्त्या_मातेचा #उत्सव_आदर्श_न्यायदेवतेचा #उत्सव_आपला #आनंदोत्सव_आपल्यासर्वांचा #अहिल्याजन्मोत्सव
No comments:
Post a Comment