विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 9 August 2020

📷,"शिवकन्या अंबिकाराजे" 📷

 

📷,"शिवकन्या अंबिकाराजे" 📷
POSTSAAMBHAR:" डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर "
अंबिकाबाई या शिवाजीराजे व सईबाई राणीसाहेब यांच्या तृतीय कन्या यांचा जन्म 1654 मध्ये झाला .सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर तब्बल पाच वर्षांनी शिवाजी महाराजांनी यांचे लग्न हरजी महाडीक तारळेकर यांच्याशी लावून दिले.हे लग्न राजगडावर जिजाऊ साहेब यांच्या उपस्थितीत इसवी सन 16 63 मध्ये पार पडले. तारळे या गावाने महाराष्ट्राच्या इतिहासात गौरवाचे स्थान प्राप्त केले आहे ते म्हणजे तेथील महाडिक घराण्यामुळे .हे घराणे प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्तानातून आलेल्या राजपूत क्षत्रिय घराण्यापैकी एक आहे .सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाडिक घराण्याचा विजापूरच्या बादशहाच्या सार्वभौमत्वा खाली बराच अंमल होता. आदिलशाहीमधे एक प्रमुख शौर्यशाली पराक्रमी सरदार म्हणून तारळ्याचे महाडिक कार्यरत होते ."प्रतापराव" "रायाणराव "अशा पदव्या ही त्यांना होत्या .इ.स.1648पासून शिवाजीराजे महाराष्ट्रत सक्रिय झाले तेव्हापासून या घराण्याने महाराजांच्या स्वराज्याला चांगलीच मदत केली .शहाजी राजांपासून हे घराणे आपल्या स्वराज्यात कार्यरत झाले होते. तेव्हापासूनच शिवाजीराजांचे घराण्यावर अत्यंत प्रेम जडले स्वराज्याच्या कामात त्यांनी राजांना मोलाचे साहाय्य केले .परसोजी महाडीक विजापूरचे सरदार होते तेव्हा अंतःस्थ ते शिवाजी महाराजांना मदत करतात असा त्यांच्यावर आरोप आला म्हणून विजापुरच्या बादशहाची त्यांच्यावर गैरमर्जी झाली तेव्हा ते कर्नाटकाचा शहाजी महाराजांच्या आश्रयाला गेले व तेथेच मृत्यू पावले. यांना सात पुत्र होते त्यापैकी सर्वात ज्येष्ठ पुत्र हरजीराजे हे अत्यंत पराक्रमी व शूर होते त्यांनी कर्नाटकात शहाजी राजे यांच्या सेवेत राहून खूप पराक्रम गाजवला व शहाजीराजांची मर्जी संपादन केली. ज्यावेळी इसवी सन 1662मध्ये शहाजीराजे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना भेटायला पुणे प्रांती आले त्यावेळी त्यांनी हरजी महाडिकांना आपल्याबरोबर आणले होते .शिवाजी राजे रत्नपारखी होते त्यांनी पराक्रमी हरजी राजांना आपली तृतीय कन्या अंबिकाबाई देऊन लग्न संबंध जोडले. तारळे हे गाव सातारा पासुन फक्त आठ किलोमीटर आहे.तारळ्याच्या महाडीकांचा हा वाडा तीनशे ते साडेतीनशे वर्षे जुना असून आजही तो ऐतिहासिक वारसा जपून आपल्या वाड्याची निगराणी करत आहेत. महाडिकांचे वारस आजही तारळ्यात
वास्तव्य करत आहेत.


No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...