विनोद जाधव एक संग्राहक

Friday 14 August 2020

सरदार बळवंतराव बर्गे

 

सरदार बळवंतराव बर्गे 
पानिपतावरील लढाई ही मराठी माणसाच्या भावविश्वातील अत्यंत महत्त्वाची घटना. तेथे झालेल्या महासंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांविषयी आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे . कारण, पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी जो पराक्रम केला, जे भोग भोगले, हौतात्म्य पत्करले, त्याची आठवण म्हणून चौदा जानेवारीला "पानिपत दिवस' पाळला जातो. सातारा भागातील अनेक मराठा सरदार घराणी यात सामील झाली होती. त्या पैकी (सातारा येथील) कोरेगाव येथील बर्गे घराणे मधील अनेक सरदार ही सामील झाले होते. बर्गे घराण्यातील अनेक पराक्रमी सरदारांनी सातारा छत्रपती तर्फे बर्याच लढाया मध्ये मोठा पराक्रम गाजवला होता. सातारा छत्रपती महाराजांचे विश्वासू आणि शूर लढवय्ये म्हणून या घराण्यातील मराठा सरदारांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. सन १७११ मध्ये वाई येथील पांडवगड च्या लढाईत बर्गे सरदारांनी मोठा पराक्रम केला म्हणून पहिले शाहू महाराज यांनी या पाचही बर्गे सरदाराना त्यांचे कोरेगाव हेच वतन म्हणून इनामात दिले. याच पराक्रमी घराण्यात बळवंतराव बर्गे चा उल्लेख करावा लागतो. त्याचा वडील आनंदराव बर्गे हा ही मोठा पराक्रमी सरदार होऊन गेला. त्याने डिसेम्बर १७५६ मध्ये कुलाबाच्या आंग्रे सरदारांना जेरीस आणले. बळवंतराव हाही मोठा लढवय्या निघाला. १७६१ मधील पानिपत युद्धात बळवंतराव बर्गे सामील झाला होता. पानिपत वर शत्रूला निसटता विजय मिळाला. पानिपत मध्ये बरेच लढाऊ लोकांनी आपले प्राण अर्पण केले. इतर लोकाप्रमाणे पळून जाणे पेक्षा बळवंतरावने लढून मरणे पसंत केले. दीड लाखाच्यावर सैनिक धारातीर्थी पडले. त्या वेळी महाराष्ट्रात असे एकही घर नव्हते, की ज्या घरातला कर्ता पुरुष पानिपतावर कामी आला नाही. मराठी समुदायावर असा प्रचंड प्रहार कधी झाला नव्हता. पण त्याला तोंड देताना मराठी वीरांनी जो अतुलनीय पराक्रम दाखवला त्याला तोड नाही. बळवंतरावच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी ठकाबाई या कोरेगाव मध्ये सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ आनंदरावने सतीची समाधी/घुमटा बांधला. उत्कृष्ट असे कोरीव कामाचा हा एक चांगला नमुना आहे .त्याचे जीर्नोधाराचे काम त्याचे वंशज बर्गे -इनामदार मंडळी यांनी चालू केले आहे.व आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
शब्दांकन- विशाल बर्गे इनामदार
Copy right with \ माहिती द्वारा- पांडुरंग काका सुतार (इतिहास अभ्यासक )

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...