विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 8 August 2020

⚔️ !! दोद्देरीची लढाई !!⚔️

 🚩।। सर्वात मोठा यशस्वी गनिमी कावा ।।🚩

    

     ⚔️ !! दोद्देरीची लढाई !!⚔️

औरंगजेबने संताजी घोरपडे  आणि धनाजी जाधवांचा  एवढा धसका घेतला होता कि त्यांच्या बंदोबस्तासाठी कासिम खानला ६०,००० लष्कर घेवून पाठवले ज्या बेफिकरीत अफजल खान आला होता त्या बेफिकरीत कासिम खान आला

संताजीला असा चिरडतो कि त्याच्या सात पुस्त्या मला विसरणार नाहीत असे त्याने बादशाहाला सांगितले...

" जान कि बाजी लगा दे कासिम तोड दे काफरो के होसले , तू मोघल सल्तनत कि शान है।बादशहा कासिम खानला " म्हणाला सोबत त्याने सफशिकन खानला दीले...

त्याने संताजींना जिंजीला पोहचु द्यायचे नाही त्याला चित्रदुर्गलाच अडवायचं असे मनाशी ठरवून तो पस्तीस कोसांचे अंतर कापून बेल्लाली मार्गे तालाकुला आला संताजींना त्यांचे हेर या साऱ्या बातम्या देत होते कासिम खानच्या सुस्त फौजेला गुंगारा देवून पुढे जाणे संताजींना अवघड नव्हते...

पण संताजींचा विचार वेगळा होता
" दाजी काय करायचे ठरवले आहे तुम्ही "
संताजींना हसतांना पाहून हणमंतराव म्हणाले

" गनिमाला गाडून पुढे जाऊ "संताजी म्हणाले काय वेड लागले आहे त्याचे सैन्य तरी पहा ६०,००० ची फौज बुडवणे शक्य आहे का? " हणमंत राव कपाळाला आट्या पडत म्हणाले

त्याशिवाय उपाय नाही नाईक यांना टाळून पुढे गेलो तर पुढून जुल्फिकरखान आणि मागून कासिम खान चटनी करतील आपली " संताजी

" मग मागे फिरून जाऊ या " हणमंत राव "नाही नाईक ,महाराज जिंजीला आपली चातका प्रमाणे वाट पाहत आहेत आपण जर गेलो नाही तर ते मोघलांच्या तावडीत सापडतील

संताजींच्या डोक्यात गनिमी काव्याची चक्रे वेगाने फिरू लागली कासिम खानाचे सैन्य तालाकुला ला  एकवटले संताजींची छावणी तेथून सहा कोसाच्या अंतरावर होती...

शिकार मोठी आहे गफलत अजिबात चालणार नव्हती हे लक्षात ठेवा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे कामे ठरल्या वेळी बिन बोभाट पार पडायला पाहिजे  पलभराचा उशीर आपला सर्वनाश करेल...

लढाई सुरु झाली कि आम्ही सैन्याच्या खोल वर घुसून त्याला दोतर्फा करणार आहोत त्यासाठी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या आम्ही करू

पहिल्या तुकडीने पेश्खाण्यावर हल्ला करायचा शिपायाला मारा पण बुनग्याला सोडा सारे लुटा आणि जे लुटता येणार नाही ते जाळून टाका मागे काही सुटता काम नये संताजी थांबले तसे हणमंत राव म्हणाले बुनग्यांना का सोडायचे दाजी ?

बुणगे निउपद्रवी त्यांना मारण्यात कसली आली आहे मर्दानगी आणि हे बुणगेच आपला पुढचा डाव यशस्वी करणार आहेत ते बोंब ठोकत मुख्य छावणीकडे जातील आणि साखरझोपेत असणाऱ्या कासिम खानाला वर्दी देतील

खान आपल्यावर चालून येईल मग छावणीत उरणार कोण फक्त बुणगे मग आपली दुसरी तुकडी खानाला अंगावर घेईल तिच्या मदतीला पहिली तुकडी येईल आणि तिसरी तुकडी खानाची छावणी लुटेल...

संताजींनी साऱ्या सहकाऱ्यांकडे पाहिले सारे समाधानी दिसत होते एका हणमंत निंबाळकरांच्या मनात काही शंका होत्या शत्रू आणि आपले सैन्य पकडून पाऊन लाखाचे सैन्य एक चूक झाली तरी युद्धभूमी मराठ्यांची मसणवाट ठरणार होती....

पण सारे सरदार संताजींच्या मागे जायला तयार होते मग आपण शंका काढून अपशकून करू नये म्हणून तो गप्प बसला " क्या खबर है संताजी की ? इस वक्त वो कहा है।"कासिम खान खान्जाद खानाला म्हणाला "हमसे बस थोडी दुरी पर है!

आपण त्याच्या वाटेत तळ ठोकल्याने मोठ्या पंचायतीत आहे " खान्जाद खान म्हणाला" शहाणा असेल तर जाईल निघून नाहीतर मार खाईल कुठे आपली ६०,००० ची फौज, आणि कुठे त्याची १५००० ची फौज आणि भामत्याकडे तोफा हि नाहीत " कासिम खान असे म्हणताच सारे हसू लागले...

मध्यरात्र उलटली सकाळचा पहार सुरु झाला मराठ्यांनी मोघलांचा पेशखाना काही तासात लुटला बुणगे मुख्य छावणीकडे जाऊन खानाला वर्दी दिली आणि खान संताजींचा बंदोबस्त करायला निघाला सारे मनासारखे झाले....

तिसऱ्या टोळीने खानाचा मुख्य तळ लुटला आणि पहिल्या आणि दुसऱ्या टोळीच्या मदतीला आली आता खान मागे हि जावू शकत नव्हता तिन्ही बाजूने मराठ्यांनी त्याला वेधले होते संताजींनी खानाला भाताच्या खेचाराकडे पिटाळले...

भाताच्या खेचारात खानाची घोडी खोळंबली हत्ती रुतले काय करावे खानाला समजत नव्हते कासिम खानाने दोन कोसावर असणाऱ्या दोद्देरीच्या गढीचा आश्रय घेतला पण गढीच्या ठाणेदाराने गढीचे दरवाजे अगोदरच बंद केले

खानाच्या फौजेने गढीचा आधार घेतला ६०००० सैन्यातले २०००० सैन्य सुधा शिल्लक राहिले नव्हते दोन दिवसाच्या लढाईने उपासमार झाली होती मराठ्यांनी १२ दिवस हल्ला केला नाही खानाच्या सैन्याला उपासमार करून आणि रात्र रात्र जागवून मारू लागले...

१३व्या दिवशी कासिम खानाने आत्महत्या केल्याची बातमी मिळाली मराठ्यांना बुडवायला आलेल्या खानाला मराठ्यांनी बुडवले आणि दोद्देरीची लढाई संताजींनी निव्वळ १५००० सैन्यानिशी जिंकली....

दीड कोटीची लुट मराठ्यांना मिळाली जल्लाद कासिम खानाला दोद्देरीच्या मातीत मिळवले गनिमी कावा काय असतो हे साऱ्या मोघलांना दाखवून दिले...

पुढे संताजी घोरपडे  नावाची दहशत मोघलांमध्ये अशी वाढली कि संताजींच्या विरोधात मोहिमेवर जाण्यासाठी मोघल सरदार तयार होईनात आणि जे तयार होत त्यांना दोन महिन्याचा पगार आपल्या लष्कराला अगोदर द्यायला लागत असे...

कारण संताजींच्या विरुद्धच्या लढाईत जिवंत परत येवु कि नाही याची हमी नसे म्हणून मोघल सैन्य अगोदरच पगार घेवून आपल्या घरातल्यांचा तरी उद्धार होईल असे वाटत असे....

संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा.....🙏🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...