विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 8 August 2020

बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यात सामील होण्यापूर्वी कोणाकडे काम करत आहे?

 

बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यात सामील होण्यापूर्वी कोणाकडे काम करत आहे?Read Marathi Poem नरवीर बाजीप्रभू देशपांडे....!
_____________
उत्तर:-बाजीप्रभु देशपांडे स्वराज्यात सामील होण्यापूर्वी हिरडस मावळातील "कृष्णाजी बांदल" यांच्याकडे दिवाण म्हणून होते. पण कृष्णाजी बांदल हे आदिलशाहीस मानत आणि स्वराज्य कार्यात छञपती शिवाजी महाराजांना विरोध करत त्यामुळे शिवरायांनी बांदलांशी युद्ध केले त्या युद्धात कृष्णाजी बांदल मारले गेले परंतु बाजीप्रभुंचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व बांदल देशमुखांना स्वराज्य विचार सांगुन आपलंसं केलं. बाजीप्रभुंनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजीप्रभु देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. पुढे याच बांदल देशमुखांनी व बाजीप्रभुंनी स्वतःचे बलिदान देऊन शिवरायांना पन्हाळ्याच्या वेढ्यातुन सुखरुप बाहेर काढलं होतं.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...