विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

महाराणी येसूबाई भोसले (भाग क्रमांक:- १)

 

महाराणी येसूबाई भोसले (भाग क्रमांक:- १)
महाराणी येसूबाईंबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराणी येसूबाई यांची माहिती इतिहासकारांना मिळाली नाही हे दुर्दैव आपले की इतिहासाचे? पण जी माहिती उपलबद्ध आहे. ती माहिती मराठी लोकांपर्यंत पोहचवू शकलो नाही हे मात्र मराठी माणसाचे दुर्दैव आहे.
"श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई", छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी आणि स्वराज्याच्या कुलमूकत्यार.
सामर्थ्यावाचून शौर्य नाही, शौर्यावाचून पराक्रम नाही, पराक्रमावाचून वैभव नाही, तसच येसूबाईंशीवाय संभाजीराजे नाही.
पूर्ण नाव:- येसूबाई संभाजीराजे भोसले.
वडील:- पिलाजीराव शिर्के.
आई:- मणिबाई शिर्के.
जन्म:- उपलबद्ध नाही.
जन्मस्थान:- दाभोळ, कोकण.
बंधु:- गणोजी शिर्के.
पती:- छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
पुत्र व सुना:- शाहूराजे संभाजीराजे भोसले.
अंबिकाबाई, सावित्रीबाई.
कन्या व जावई:- भवानीबाई – शंकराजीराजे महाडीक (हरजीराजे महाडीक यांचे पुत्र).
मृत्यू:- १७३०, सातारा.
समाधीस्थळ:- क्षेत्र माहुली सातारा. (इतिहासकरांमध्ये समाधीस्थळविषयी दुमत आहे.)
महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन काढावे लागले.
पण येसूबाईंनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले, त्याला इतिहासात तोड नाही.
महत्वाचे प्रसंग:-
विधवेचे सोंग:-
येसूबाईंचा विवाह वयाच्या ७ व्या ८ व्या वर्षी संभाजीराजेंबरोबर झाला. पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी संभाजीरराजेंना दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले!
स्वराज्याची जवाबदारी:-
छत्रपती शिवरायांनी येसूबाईंना कुलमूकत्यार या पदाची जवाबदारी दिली होती. छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल. ह्या हेतूने शत्रूंनी स्वराज्यावर आक्रमण सुरू केले होते. मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि अंतर्गत शत्रू. स्वत: औरंगजेब दक्षीनेत आला होता.
छत्रपती संभाजीराजे मोहिमेत व्यस्त असताना. महाराणी येसूबाई स्वराज्याची दोर सक्षमपणे सांभाळत होत्या. यामध्ये न्यायनिवाडा, राजकरणातील सहभाग, रयतेच्या विषयासंबंदी जागृती आणि कौटुंबिक काळजी याबद्दल अनेक पत्र उपलब्द असताना त्याविषयी लिहले गेले नाही. त्या पैकीच काही पत्रांची माहिती खलीलप्रमाणे....
• पाचवड येथील राज मंदिर बांधण्या संबंदीचे पत्र:-
महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजीराजेंनी पाचवड येथील काम पाहून संतोष वाटल्यामुळे बक्षिशी दिली. बांधकामाच्या लोकस ३००० होन अरजोजी यादव यांना ५००० होन दिले. महाराणी येसूबाईंची वास्तु संबंधीची आवड या पत्राद्वारे दिसून येते.
• तुळजापूरच्या देवीस वार्षिक नेमणूक करून दिल्याचे संस्कृत पत्र:-
हे पत्र संस्कृत भाषेमध्ये आहे. यावरून महाराणी येसूबाई यांची संस्कृतविषयी आवड व योग्यता स्पष्ट होते. पत्राअखेरीस व्यतिमुद्रा मध्ये छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई, मोरेश्वर पंडितराय यांच्या मुद्रा आहेत. यांवरून महाराणी येसूबाईंचा राजयकारभारील सहभाग प्रामुख्याने जाणवतो.
• चाफळ यात्रेसबंदी दिवाकर गोसावी यांना महाराणी येसूबाईंनी लिहलेले पत्र:-
या पत्रामध्ये चाफळच्या यात्रा सुखरूप पार पडावी. लष्कराचा कोणताही त्रास रयतेला होऊ नये. याची काळजी महाराणी येसूबाईंनी घेतली होती. म्हणून त्यांनी दिवाकर गोसावी यांना अभयपत्र दिलेले होते. या पत्रात त्यांच्या सही शिक्क्यानिशी राज्यकारभारचा मिळलेला अधिकार किती दक्षतेन वापर करत असे ते दिसून येते.
पुढील पोस्ट मध्ये आपण महाराणी येसूबाईंविषयी खालीलप्रमाणे माहिती जाणून घेणार आहोत.
• छत्रपती संभाजीराजेंची कैद व महाराणी येसूबाई
• महाराणी येसूबाईंचे चातुर्य व निर्णय
• महाराणी येसूबाई आणि युवराज शाहूराजेंची कैद
• २९ वर्षाचा वनवास आणि सुटका
संदर्भ :- महाराणी येसूबाई (डॉ. मीना मिराशी)
थोरले शाहू महाराज (र. वि. हेरवाडकर)
स्वराज्यरक्षक संभाजी (मालिका)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...