विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 5 September 2020

श्रीमंत_छत्रपती_महाराणी_सईबाईसाहेब

 




श्रीमंत_छत्रपती_महाराणी_सईबाईसाहेब
...
फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या वाड्यात रेऊबाई व मुधोजीराव नाईक निंबाळकरांच्या पोटी जन्मलेल्या निंबाळकरांच्या राजकन्या ‘सई’ जेव्हा शहाजीराजे भोसले यांच्या सून व शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून भोसले घराण्यात दाखल झाल्या तेव्हापासूनच शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका सुवर्ण अध्यायाला सुरूवात झाली...
सईराणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम, राजांची पहिली सखी, किंबहुना सुख-दुखःच्या हिंदोळ्यात साथ देणारी जन्मोजन्मांची अर्धांगीणी स्वराज्य निर्मितीपासून पुढच्या काही वर्षांपर्यंतच्या प्रवासात आपल्या पतीच्या सुखातच सुख मानीत सईबाईसाहेबांनी राजांना समर्थपणे साथ दिली शिवछत्रपतींच्या सुरवातीच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये एक आई म्हणून ज्याप्रमाणे जिजाऊंसारख्या खंबीर मार्गदर्शक त्यांना लाभल्या त्याचप्रमाणे एक पत्नी म्हणून सईराणींसारख्या एका शांत संयमी व्यक्तीमत्वाची सोबतदेखील त्यांच्या पाठीशी नेहमीच होती.. सईराणीसाहेब व राजांची साथसोबत अवघ्या १८-१९ वर्षांची.. परंतु हा कालखंड म्हणजे राजांच्या आयुष्यातील उमेदीचा व स्वराज्य निर्मितीच्या ध्येयाचा महत्वपूर्ण असा कालखंड चढ-उतारांच्या या कित्येक प्रसंगात राजांनी आपल्या मनातील हलक्या व नाजूक गोष्टींचा उलगडा अनेकदा राणीसाहेबांसमोरच केला असेल...
चित्राचा प्रसंग आहे हा अर्थातच संभाजी महाराजांच्या जन्मानंतरचा (१६५८ दरम्यान) संभाजी महाराजांचा जन्म म्हणजे राणीसाहेब व राजांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण अशी घटना १४ मे १६५७ रोजी स्वराज्याचे युवराज सईराणींच्या पोटी पुरंदरावर जन्मास आले..दुर्दैवाने शंभू बाळांच्या जन्मानंतर अवघ्या दोन-अडीच वर्षांतच राजांच्या आयुष्यातील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण करत सईबाईसाहेब परलोकवासी झाल्या या दोन अडीच वर्षांच्या अल्पप्रवासात एक आई म्हणून राणीसाहेबांनी शंभूबाळांविषयी जी काही स्वप्ने पाहिली असतील व शंभू बाळ व राजांसमवेत जे काही मोजके क्षण घालवले असतील त्याच क्षणांना आमच्या कल्पनेनुसार या चित्राच्या माध्यमातून चित्रबध्द करण्याचा प्रयत्न केला आहे...
चित्रामध्ये उजवीकडे आपल्या पुत्रास मांडीवर घेऊन बसलेले आहेत ते अर्थातच युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज...
अखंडसौभाग्यवती महाराणी सईबाई सरकार सकळगुण मंडळीत वज्रचुडा अलंकृत अखंडसौभाग्यती धाकल्या आऊ सईबाईसाहेब
चित्रकार : अमित निंबाळकर..♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...