मोगलांच्या लष्करात खंजीर नावाचे एक शस्त्र होते. अगदी त्या खांजिरा चात एक प्रकार म्हणजे बिचवा होय. याच्या मुठी वरती पायाचा मुठी कडील भाग व मुठीचा मागील भाग यांमध्ये फरक असतो. म्हणजे लोखंड गोल-चपटी पट्टी असते. त्यामुळे मराठा तलवारीच्या मुठी प्रमाणे बोटांचे संरक्षण होते
सदर शस्त्र दिसायला विंचवाच्या नांगी प्रमाणे असल्याने बिच्छू/बिचवा असे म्हणतात.
बिचवा उजव्या किंवा डाव्या हाताचा असे.
परताच्या ठेवणीप्रमाणे तयार केले जात असत. बिचव्याची मूठ नक्षीदार असते व मागील बाजूस रूंद असते.
अफजलखानाचा वध केला तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी डाव्या हातात वाघनखांबरोबर उजव्या हातात बिचवा वापरला होता, या घटनेतील बिचव्याच्या वापराचे उदाहरणाचे सविस्तर विवेचन पुढील प्रमाणे -:
"मार्गशीर्ष शु. ७ शुक्रवार ता.१०/११/१६५९ हा उभयतांच्या भेटीचा दिवस निश्चित झाला. ते दिवशी भेटीच्या आधी शिवाजीने आपल्या बचावाचा पोशाक चढविला. अंगात चिलखत व त्यावर अंगरखा, शिरस्त्राण व वर पागोटे, उजव्या हातात भवानी तलवार व बाहीते बिचवा डाव्या हातात वाघनखे, अशी आपल्या संरक्षणाची सिद्धता केली."
---------○○☆☆☆☆○○------------
No comments:
Post a Comment