विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 September 2020

श्रीमंत पेशवा बाजीराव

 #१६_सप्टेंबर_१७२७

सन १७२५ च्या उत्तरार्धात

श्रीमंत पेशवा बाजीराव यांची नजर कर्नाटकावर रोखली गेली. सन १७२५ नोव्हेंबर महिन्यात पेशवा बाजीराव कर्नाटक स्वारीवर निघाले. छत्रपती शाहू महाराज यांचे मांडलिकत्व पत्करावे म्हणून बाजीरावांचे दूत, वकील ठिकठिकाणच्या संस्थानिक, राजे आदींकडे रवाना झाले.
प्रथम काहींनी खळखळ केली नंतर मात्र म्हैसूर, गुत्ती, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टण, चित्रदुर्ग, बिदनुर, कनकगीरी, गदग, सुरापुर, अर्काट अशा दक्षिणेतल्या सर्व संस्थानिकांना पेशवा बाजीराव यांनी छत्रपती शाहू माहाराजांचे मांडलिक बनवले. कर्नाटक व श्रीरंगपट्टण या दोन मोहीमा सन १७२७ सप्टेंबर पर्यंत उरकल्यावर पुढील मोहीम म्हणजे पून्हा एकदा निजाम!
कोल्हापूरकर संभाजी महाराजांना हाताशी धरून निजामाने कारस्थाने रचण्यास सुरवात केली. निजामाने दक्षिणेतील स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून स्वराज्यात बंडाळ्या उभ्या करण्याचा खेळ आरंभला.
निजामाने थेट पुण्यावर चाल केली.
पेशवा बाजीराव यांनी दिनांक १६ सप्टेंबर सन १७२७ रोजी निजामा विरूध्द मोहीम सुरू केली. निजाम पुण्यावर येत आहे पाहून बाजीराव निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून निघाले.
अखेर दिनांक २५ फेब्रुवारी सन १७२८ रोजी औरंगाबाद जवळ पालखेड येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामास पुरता जेरीस आणून मानहानीकारक पराभव केला.
निजाम मराठी फौजांना पूर्ण शरण आला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...