विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

मराठ्यांच्या शस्त्रास्त्रां संदर्भात सभासद बखर, आज्ञापत्र तसेच शिवकालीन आणि उत्तरकालीन साधनांमधून शिवकालीन लष्करामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती

 


मराठ्यांच्या शस्त्रास्त्रां संदर्भात सभासद बखर, आज्ञापत्र तसेच शिवकालीन आणि उत्तरकालीन साधनांमधून शिवकालीन लष्करामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळते.
हिंदवी स्वराज्याच्या लष्कराकडे निरनिराळ्या प्रकारच्या तलवारी, कट्यारी, जमदाडा पट्टे, भाले बाक(?) बिचवे, सैत्या, धनुष्यबान, बंदुका, छोट्या -मोठ्या तोफा इत्यादी शस्त्रास्त्रे होती. असे आपण म्हणू शकतो.
अद्ययावत पद्धतीच्या युरोपियन बंदुका, तोफा, लांब पल्ल्याच्या तलवारी, दारुगोळा, हातबॉम्ब आदी शस्त्रास्त्रांची शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडे आणि इंग्रजांची कडे वारंवार मागणी केलेली कागदपंत्रांमध्ये आढळते. अर्थातच इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी ही मागणी पूर्ण करण्यास कायम टाळाटाळ केली. क्वचित प्रसंगी त्यांनी मराठ्यांना शस्त्रास्त्रे विकली. त्याचबरोबर युद्धामधून मुसलमानी सरदारांवर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना पराभूत करुन पिटाळून लावल्यानंतर अथवा त्यांची छावणी लुटल्यानंतर मराठा सैन्य दलाच्या हाती अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे लागत असत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर तोफा ओतण्याचा कारखाना सुरु केला होता. पोर्तुगीजांच्या धर्तीवर शिवरायांनी दारूगोळा तयार करण्याचा कारखाना सुरु केला. या कामासाठी शिवरायांच्या पदरी पोर्तुगीज इंग्रज व फ्रेंच अधिकारी असल्याची माहिती कागदपत्रांमधून मिळते.
शिवरायांच्या लष्करातील मराठी सैनिक आक्रमण आणि संरक्षण यासाठी आपल्या जवळ शस्त्रास्त्रे बाळगत या शस्त्रास्त्रांचे प्रामुख्याने दोन प्रकारांत विभाजन करता येईल.
अ) आक्रमक शस्त्रास्त्रे
ब) बचावात्मक शस्त्रास्त्रे
तलवार, कट्यार, खंजीर, गदा, भाला या प्रकारची शस्त्रे शत्रूच्या जवळ जाऊन शत्रूवर निर्णायक वार करून किंवा हल्ला करून युद्धात निर्णायक विजय प्राप्त करून देतात. ही शस्त्रे हातात धरून मारावयाची असतात. धनुष्यबाण हे प्रक्षेपक क्षेत्र मानले जाते. हे शस्त्र शत्रूवर नेम धरून मारावयाचे असते.ही सर्व आक्रमक शस्त्रास्त्रे होती
या पुढील काही पोस्ट मध्ये आपण आक्रमक शस्त्रास्त्रे कोणकोणती होती आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला जात होता याची माहिती घेऊयात.
कमेंट मध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा.
धन्यवाद.
@maratha_riyasat

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...