विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

A History of Warfare

 

फिल्डमार्शल मॉंटगोमेरीने बाजीरावांच्या फौजेत दर दोन घोड्यां आड तिसरा रिकामा घोडा असे असं त्याच्या

A History of Warfare मध्ये म्हटलं आहे. तर या तिसऱ्या घोड्याचा उपयोग नेमका कसा असे?
——————————————————
१) दोघात तीन घोडी याचा अर्थ सरासरी दोन घोडेस्वार असतील तर एक तिसरा रिकामा घोडा असे. म्हणजे एकूण फौज ५०००० असेल तर २५००० रिकामी घोडी असत. अर्थात दरवेळेस हे गुणोत्तर २:१ असेलच असं नाही, हा अंदाजे आकडा आहे.
२) पूर्वी फारतर १५-२० कोसांची एक मजल घोडेस्वार मारू शकत असत. पायदळासह हे अंतर जायला दोन दिवस लागत, घोडेस्वारांना एक दिवस. हे मी अंताजी माणकेश्वरांच्या मारवाड स्वारीतील एका पत्राच्या आधारे सांगतो आहे. १ कोस म्हणजे २ मैल, १ मैल म्हणजे १.६ किलोमीटर्स. म्हणजेच १ कोस = ३.२ किमी.
३) मोहिमेत अनेकदा लूट होई. ती सोबत नेण्यासाठी, अनेकदा जवळपास असलेलं खाण्याचं सामान ठेवण्यासाठी या घोड्यांचा उपयोग होई. मोठी फौज असताना बाजारबुणगे सोबत असतात. इथे घोडेस्वारांना शास्त्राशिवाय इतर काही न्यायचं नसतं. पण केवळ Cavalry अथवा घोडदळ असेल तर बाजारबुणगे वगैरे काही नसतं. अशा वेळेस आपापलं सगळं घोड्यावरूनच न्यावं लागतं. इथे ही रिकामी घोडी उपयुक्त असत.
४) कधी मोठ्या लांबच्या मजला मारायच्या असतील तर आधीच ज्यावर स्वार बसला आहे ते घोडं स्वाऱ्याच्या वजनाने धावून दमलेलं असतं. अशा वेळेस त्या घोड्याला मोकळीक म्हणून दुसरा घोडा वापरता येऊ शकतो.
बाजीरावांनी वेगवान हालचालींसाठी अशा पद्धतीने काही कल्पना उपयोगात आणल्या, त्यातलीच ही एक मॉंटगोमेरीने दिली आहे. आगामी पुस्तकात बाजीरावांच्या लढायांसोबत यावरही काहीसं लिहिलं आहे. लवकरच आपल्या भेटीला येईल..
- कौस्तुभ कस्तुरे [ @kaustubh.kasture ]
———————————————————

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...