विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

शिवरायांचे निष्ठावंत शिलेदार

 

•••

शिवरायांचे निष्ठावंत शिलेदार •••
वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्र्वरी जेव्हा रक्ताचा अभिषेक करून महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या सोबतीला त्यांचे बाल मित्र येसाजी कंक, तानाजी मालुसरे , बाजी पासलकर , वडीलधारे कान्होजी जेधे, दादोजी कोंडदेव हे सर्व निष्ठावंत लोकं साथीला होते. ही सर्व मंडळी राजांसोबतच स्वराज्य साठी प्राण अर्पण करायला तयार झालीत.
शिवाजी महाराज यांच्या विजयी होण्याचं एक कारण म्हणजे त्यांनी उत्तम निष्ठावंत, स्वाभिमानी आणि विश्वासू साथीदारांची केलेली पारख. राजांना माणसं ओळखायची दृष्टी मात्र विलक्षण होती.
कान्होजी जेधे,येसाजी कंक , तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेतोजी पालकर, हंबीरराव मोहिते,मोरोपंत पिंगळे, बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी, बाजी पासलकर, जीवा महाला, बहिर्जी नाईक, आदी लोकं, जितके नाव घेऊ तितके कमीच.
अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.महाराजांनी एक एक माणूस हिर्या सारखा घडविला.
स्वामिनिष्ठा ही बाजारात विकत मिळत नाही. तर राजांनी त्यांच्या चमत्कारिक व्यक्तिमत्व आणि असाधारण धाडसाने माणसं मिळवली.
लाखो शूरवीर मावळे हे राजांच्या एका शब्दा खातर आपला जीव द्यायला तयार झाले. लढणारा प्रत्येक मावळा ही लढाई केवळ स्वराज्याची नसुन आपली आहे हेच समजुनच लढला. महाराजांनी मावळ्यांना स्वराज्यात त्यांच्या योग्यतेनुसारच स्वराज्यात स्थान दिलं.
• मुरारबाजी ज्याचं विलक्षण युद्धकौशल्य आणि स्वामीनिष्ठा बघुन दिलेरखानानं युद्ध थांबवून त्यांना आपल्या बादशहीत जहागीर देऊ केली, बाजीप्रभु देशपांडे ज्यांनी केवळ ३०० मावळ्यांच्या सोबतीने 6 तास घोडखिंड लढवून आपल्या रक्ताने खिंड पावन केली,
किंवा प्रतापराव गुजर की ज्यांना आपण केलेल्या चुकीमुळे महाराजांना तोंड दाखवण्या पेक्षा मृत्यू प्रिय म्हणून १० हजार संख्या असलेल्या शत्रुच्या गोटात फक्त ६ सरदारांसोबत घुसणे असो,किंवा रायगडच्या बांधकाम वेळी पैसे कमी पडले म्हणून आपले दागिने गहाण ठेऊन दुर्ग बांधायचा काम चालू ठेवणारा हिरोजी इंदलकर,
शत्रुच्या छावणीतून खडा न खडा माहिती आणणारे बहिर्जी नाईक, किंवा चाकण चा भुईकोट किल्ला शाईस्तेखानाच्या २० हजार सैन्यिसमोर ५६ दिवस लढवणारा फिरंगोजी नरसाळा असो.
शिवरायांच्या मावळ्यांच्या स्वामीनिष्ठेची उदाहरणे जितकी द्यावी तितकी कमीच आहेत.
✒-आदित्य सांगळे (@aditya_s08_ )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...