विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

••शिवराय आणि सह्याद्री•••

 


••शिवराय आणि सह्याद्री•••
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
शिवरायांचे आठवावे स्वरूप । शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप । भुमंडळी ।।१८।।
शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांची सलगी देणे । कैसे असे ।।१९।।
सकळ सुखांचा त्याग । करुनी साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।२०।।
समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच जे वर्णन केलंय,त्यांच्या एवढं सुंदर शब्दात कोणी वर्णन केला असेल, अस मला वाटत नाही .
शिवरायांनी काही खूप साध्या पण महत्त्वपूर्ण घटकांचा व्यवस्थित वापर करून जगभर कीर्ती स्थापन केली.
त्यानुसार पाच गोष्टी सांगता येतील.
१) सह्याद्री - खरेतर सह्याद्री हा मुळातच विलक्षण आहे.सह्याद्रीत काही ठिकाणी एवढं घनदात जंगल आहे की सूर्य प्रकाश पण खाली पोहचत नाही. सह्याद्रीची खरी ताकत महाराजांनी चांगलीच ओळखली.
मुघल हे वजनदार , धिप्पाड पण आळशी हे त्यांनी हेरल. त्यांना सपाट मुलखात लढाई करण्याची सवय.घोड्या वर बसून,सोबत तोफखाना,हत्ती, उंट घेऊनच ते बाहेर निघत. हे सर्व सह्याद्रीत कठीण. पाई चालून, धरपडून ते पाय मोडून घेत. म्हणून महाराजांनी डोंगरदर्यांना विलक्षण महत्व दिलं.
सह्याद्री हा मराठ्यांचा कित्येक पिढ्यांचा पाठीराखा. सर्व चोर वाटा,घाट यांची इथल्या लोकांना खडानखडा माहिती असतं. मुघल सैन्य एकदा का घाट माथा उतरून खाली आलं की खेळ संपला . चारी बाजूंनी वाटा बंद करून,शत्रू ला चारी बाजूंनी चोप द्यायचा. कुठून हल्ला होतोय हे कळायच्या आधीच मुंडका छाटलेलं असायचं.
प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाच्या मृत्यू नंतर त्याच्या सैन्याला अशाच प्रकारे महाराजांनी व मावळ्यांनी चोप दिला. अफजल खान हा महाराजांवर चाल करून आला त्या वेळी निघतांना त्याने त्याच्या ६४ बायकांचा बळी दिला.अफजल खानाला लोक सैतान म्हणत, पण महाराजांनी दोन मिनटात त्याला पद्धतशीर संपवला. कित्येक युद्ध महाराज ह्या सह्याद्रीच्या साथीने जिंकले.
कमीत कमी सैन्य आणि शत्रूची जास्तीत जास्त हानी ही राजांची युक्ती आणि त्यात सह्याद्रीचीही पुरेपूर साथ.
पुढे महाराणी ताराबाई यांनी ही असाच वापर करून औरंगझेबाला मराठ्यांपुढे गुडघे टेकायला भाग पाडलं.
धन्य तो सह्याद्री ज्याला महाराजांचा पाऊल स्पर्श झाला व त्यांचा सहवास त्याला लाभला.
✒ -आदित्य सांगळे (@aditya_s08_)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...