विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

•••कट्यार•••

 


•••कट्यार•••
छोट्या शस्त्रांपैकी सर्वात प्रभावी शस्त्र कट्यार. या शस्त्राचा उगम महाराष्ट्रात झाला आहे म्हणूनही कट्यार हे मराठा पध्दतीचे शस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार होय.
तुम्ही शिवरायांच्या कित्येक चित्रांमध्ये कमरेला शेल्यामध्ये कट्यार ठेवलेली नक्कीच बघितलेली असेल.
पोटाच्या डाव्या बाजूस शेल्यात खोचुन टोक डाव्या बाजूस येत असे.
उपयोग - तलवार बाजूला ठेवून म्यान करून अथवा पडल्यास क्षणार्धात आपल्या उजव्या हाताने कट्यार उपसून पवित्रा घेऊन पोटात वा बरगड्या भोसकली जात असे. कट्यारीचा वार झाला तर कोणी वाचणे शक्यच नाही.
कट्यार प्रभावी असल्याने इतर सर्व राजांनी आपल्या सैन्यात कट्यारीचा वापर केला होता. त्यामुळे निरनिराळ्या पद्धतीच्या काटेरी पहावयास मिळतात.
"मराठा पद्धतीची कट्यार ही अखंड ओतलेली असे म्हणजे जोडलेली नसे. एकूण लांबी २० ते २० इंचापर्यंत असे. यापैकी सुमारे अर्धाभाग पकडण्यासाठी आडवी मुठ व हाताचं संरक्षण करणाऱ्या दोन उभ्या पट्टया. अशी मजबूत कट्यार व नक्षीकाम अगदी क्वचितच"
मानकर्यांची कट्यार शोभिवंत. मजबूत,जाडजूड व सोन्या-चांदीचे कलाकुसरीचे नक्षीकाम केलेली असे. ती समारंभपूर्वक सन्मानाने दिली जायची.
सैनिकांची कट्यार ही नेहमीच साधी पण मजबूत असायची.
स्त्रिया व मुलांकरता लहान आकाराच्या वजनाला थोड्या हलक्या व सुशोभित कट्यारी असायच्या. कट्यारींना पातं झाकण्यासाठी लाकडाची म्यान असायची.
कट्यार या हत्यारा संबंधी जी. एन. पंत अशी माहिती देतात की,
"मराठा लोगो द्वारा गहराई से तलाशी गई, खाॅचे की पत्ती से निर्मित जौहरयुक्त कट्यारो का भी प्रयोग किया जाता था | एक प्रमुख प्रकार की कट्यार थी जिसे बिछवा कहते थे"
कट्यारीला काही ठिकाणी जमदाड असेही म्हणतात. जमदाड म्हणजे यमदाढ किंवा यमाची दाढ.
कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद.
✒ - @maratha_riyasat

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...