विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

••• तलवार •••

 


••• तलवार •••
मराठा वीरांचे आवडते शस्त्र तलवार हे अमुक्त शस्त्र प्रकारात मोडते. अरुंद, समांतर पण सरळ व दुधारी पाते आणि साध्या मुठी अशी तलवारीची बनावट असते.
मराठ्यांनी स्पेन, इटली, जर्मनी येथे तयार झालेली पाती घेऊन त्यांस हिंदुस्तानी पद्धतीच्या लवंगी व डेरेदार व खोपडी मुठी बसविल्या.
पट्टा, सकेला किंवा धोप आणि किरच या तीन तलवारी मराठी कल्पनेतूनच तयार झाल्या आहेत. त्यांची बनावट सुरुवातीस दमास्कन या इराणी पद्धतीने व नंतर हिंदुस्थानी पद्धतीने करण्यात येई. पट्टा इतर तलवारी पेक्षा जास्त परिणामकारक असतो.
शिवरायांच्या भवानी तलवारीचे वर्णन-
"श्री भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवलकर सावंत यांच्याकडून तीनशे (३००) होणास घेतली, आणि तिचे नाव भवानी ठेवले"
मराठा मुठीच्या आणि लांब पात्यांच्या तलवारीने स्वतः शिवराय वापरत होते हे त्यांच्या तलवारीचा वर्णनावरून सिद्ध होतेच.
शिवरायांनी आपली नाणी मराठी लिपीत काढून आपला स्वाभिमान दाखवला.तसेच त्यांनी परकियांकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टींचेही अनुकरण केले. इंग्रज डच पोर्तुगीज यांच्याकडील तोफा आणि गट बांधणी करणारे कल्पक आपल्याकडे असावेत. यासाठी त्यांनी केलेला पत्रव्यवहार शिवरायांच्या आधुनिक दृष्टी ची साक्ष देतो.
शिवरायांसारख्या सतत युद्ध मग्न असणाऱ्या राजाला त्याकाळी लढाई करण्याच्या दृष्टीने आधुनिक चांगल्या दर्जाची शस्त्रे आपल्याजवळ असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. आधुनिक शस्त्र आपल्या जवळ असावीत हा शिवरायांचा दृष्टिकोन त्यांच्या ठायी त्यांचे वडील वडील शहाजी महाराजांकडून आलेला होता.
शिवाजी महाराजांनी आपल्या तलवार या शस्त्राचा उपयोग केल्याचा उल्लेख इतिहासात अनेक वेळा मिळतो. त्याचे एक उदाहरण पुढीलप्रमाणे सांगता येईल.
"तलवारीने महाराज अंधारात आंधळी कोशिंबीर खेळले आणि लाल महाल रक्ताने लाल लाल होऊन गेला खानाची पंचावन्न माणसे ठार झाली. त्यात त्याचा मुलगा अब्दुल फत्तेखान हा देखील होता"
यानंतर आपण पुढील पोस्टमध्ये इतर काहीच आक्रमक शास्त्रांची माहिती घेऊयात.
कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा.
धन्यवाद.
@maratha_riyasat
*COPYRIGHT*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...