विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

••महादजी•••

 


••महादजी•••
( ? १७२७ – १२ फेब्रुवारी १७९४).
उत्तर पेशवाईतील एक पराक्रमी सेनानी आणि मुत्सद्दी.
पहिल्या बाजीराव पेशव्यांचा विश्वासू सरदार राणोजी यास चिमाबाईपासुन झालेला हा वीर.
शिंद्यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कण्हेरेखेड (ता. कोरेगाव) या गावचे.
राणोजी व जयाप्पा शिंदे यांबरोबर महादजीने प्रथम तळेगाव-उंबरीच्या निजामावरील लढाईत पराक्रम करून नाव मिळविले.
औरंगाबाद (१७५१), साखरखेडले (१७५६), पंजाब (१७५९) इ. मोहिमांतही त्यांनी भाग घेतला.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत (१७६१) एका पठाणाने केलेल्या आघातामुळे ते लंगडा झाले असताना राणेखान नावाच्या एका मुसलमान भिस्त्याने त्यांस मदत केली.
थोरल्या माधवरावांनी त्यांस १७६८ मध्ये सरदारकी दिली. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांची दौलत खालसा करावी, म्हणून राघोबा प्रयत्नशील होता. तेव्हा महादजींनी अहिल्याबाईस मातोश्री मानून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे ठरविले.
पेशव्यांनी महादजींस पानिपतचे अपयश धुऊन काढण्यासाठी बिनीवाले व कानडे यांबरोबर दिल्लीकडे रवाना केले (१७७१). तिथे महादजीने नजीबखानाचा रोहिलखंड प्रांत लुटून ताब्यात घेतला.
त्यामुळे पेशव्यांस उत्तरेत मराठयांचा जम बसविण्यास महादजींचे मोठे साहाय्य झाले.
इंग्रजांच्या कवायती सेनेची शिस्त पाहून त्यांनी डि. बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्यास आपल्या पदरी ठेवले आणि शिस्तबद्ध फौज तयार केली.
त्यांनी तोफा ओतण्याचा कारखाना आग्र्यात काढून हत्यारे तयार करण्यास उत्तेजन दिले. दिल्लीच्या बादशाहीवरील मराठ्यांचे जे वर्चस्व कमी झाले होते, या कवायती फौजेच्या जोरावर ते पुन्हा प्रस्थापित केले आणि त्यासाठी दिल्लीतील मुसलमान सरदारांच्या १७८४ मधील भांडणाचा फायदा घेऊन बादशहास ताब्यात घेतले.
"ताज क्या देखते हो ,जन्नत तो ग्वालियर है
दिल्ली को भी पुछो उसकि जान मराठे हि है"
श्रीमंत श्री महादजी शिंदे यांनी ताजमहालामध्ये आपल्या सैन्याचे घोडे बांधले होते याचा उल्लेख अनेक समकालीन फ्रेंच पत्रव्यवहार मध्ये होतो.
उत्तर हिदुस्थानात सु. बारा वर्षे राहून तेथे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर महादजी जून १७९२ मध्ये पुण्यास आले. सवाई माधवरावांनी त्यांचा यथास्थित मानसन्मान केला. सुमारे पावणेदोन वर्षे ते पुण्यात स्वस्थच होते. अखेर एकाएकी नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथे त्यांचे निधन झाले. त्यांची छत्री वानवडीस आहे.
कमेंट मध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा.
धन्यवाद.
@maratha_riyasat

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...