छत्रपती संभाजी महाराज यांच्या लष्करी कामगिरीचे निष्कर्ष -
1. आपल्या उद्दिष्टांचा सातत्याने पाठपुरावा आणि आक्रमक पवित्रा ही युध्दशास्त्राची दोन महत्वाची तत्वे संभाजी महाराजांनी कधीही दृष्टीआड होऊ दिली नाहीत.
2. युद्ध व्यवहाराच्या दृष्टीने पाहताही गोव्याच्या लढाईची हाताळणी करण्यात महाराज कुशल होते.
3. सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यास त्यांच्यात ईर्षा निर्माण करणे हे सेनानायकाचे कर्तव्य आहे , याचा विसर संभाजी महाराजांनी पडू दिला नाही.
4. गनिमीकावा युद्धनीतीची सर्व तत्वे प्रत्यक्षात उतरवून मोगली सेनेविरूद्ध यशस्वी कारवाई होऊ शकते , हे संभाजी महाराजांनी सिद्ध केले.
5. सन 1680 ते 1685 लगातार मोगल , सिद्दी व पोर्तुगीज यांच्या विरुध्द मध्य महाराष्ट्र , कोकणपट्टी व गोवा या प्रदेशात आक्रमक व बचावात्मक अशी दुहेरी लढत देऊन या सर्व शक्तींना संभाजी महाराजांनी हैराण केले ही बाब युध्द शास्त्रीयदृष्ट्या कौतुकास्पद ठरते. कल्याण, औरंगाबाद, चांदा, बिदर, फलटण व खाली रायगड एवढ्या विस्त्रुत प्रदेशात सामर्थ्य धारण करणार्या औरंगजेब बादशहाशी संभाजी महाराजांनी जो सामना केला त्याला इतिहासात तोड नाही. एवढा पराक्रमी बादशहा आपले प्रचंड सामर्थ्य संभाजी महाराजांच्या वर खर्च करत असताना 1681 - 1683 पर्यंत औरंगजेबास काहीच परिणाम दिसून येईना. उलट अनेक ठिकाणी मराठ्यांनी मोगलांस गाठून त्यांचा धुव्वा उडविला.
अशा सर्व गोष्टी पाहून औरंगजेबाची खात्री झाली की, संभाजीराजांना जिंकणे वाटले तितके सोपे काम नाही. आपले सैनिक कुचराई करतात, असा त्याचा समज होता, तो आता साफ खोटा ठरला. अशा पद्धतीने युध्दाचा शेवट होणार नाही असे औरंगजेबाला कळून चुकले. वैतागून त्याने 1683 च्या पावसाळ्यात आपल्या ठिकठिकाणच्या सर्व सेनानींना वाटाघाटी साठी आपल्या जवळ बोलावले.
इंग्रज लोकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा केलेला गौरव -
औरंगजेब अद्यापपावेतो तेथुन हललेला नाही. अशी वंदता आहे की संभाजी राजे आणि सुलतान अकबर यांच्या विरुध्द केलेले युध्द आपल्या उमरावांवर सोपवून तो माघारी दिल्लीला जाण्याच्या विचारात आहे. तो अतिशय चिडखोर बनला असून मनात अस्थिर झालेला आहे. त्याचे उमरावही असमाधानी झालेले आहेत. जर त्याचे आयुष्य संपुष्टात आले नाही तर कटकटी वाढतील आणि आपल्याला सतत भीतीच्या वातावरणात दिवस काढावे लागतील
- सुरतकर इंग्रजांनी सेंट जॉर्ज किल्ल्याला पाठवलेले पत्र.(19 जुन 1686)
पोस्ट - @_s_a_r_d_a_r_4_7
Pic Credit- @chetanart92
धन्यवाद.
@maratha_riyasat
No comments:
Post a Comment