नाईक-बावणे हे क्षत्रिय मराठा घराणे दक्खन मध्ये आजे आणि पांगरी (परगणा जालना उर्फ जाल्नापूर ) येथील होते .तेथून ते सन १७०७ नंतर साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात घोडदल प्रमुख म्हणून आले .शाहूराजांनी त्यांना अंबाजोगाई परगण्यातील गिरवली(बावणे ) आणि मौजे तांदुळजा हि जहागिरी बहाल केली व हि वतने मोकासा करून दिली .
बादशाह कडून " राव " हा किताब प्राप्त झालेल्या या घराण्याला बावणे (सरदार ) आणि राव हि नावे जोडली गेली ." नाईक " हा किताब छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्याभिशेकाच्यावेली बहाल केला .शाहजहान बादशाह बरोबर मोहिमेत असताना बावन दिवसांत बावन किल्ले जिंकल्यामुळे घराण्याचे आडनाव बावणे पडले . पुढे औरंगजेबाच्या कारकिर्दीत हे " राव " नाईकराव बावणे झाले .
आणि त्यांना मनसब जहागीर प्राप्त झाली .त्यानंतर बहादुरशाहने त्यांना " निशानजेब " हा सर्वोच्च किताब दिला
No comments:
Post a Comment