विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 October 2020

इतिहासाच्या_पानातील_काही_अज्ञात_वीर_शिंदे_पुरुष भाग ५

 


इतिहासाच्या_पानातील_काही_अज्ञात_वीर_शिंदे_पुरुष
भाग ५
पोस्टसांभार :रोहित शिंदे
लखमु शिंदे ह्यांचे पूर्वाश्रमीचे उल्लेख काहीच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे मूळ ठिकाण, वतन, वनश ह्या बाबत इतिहास पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
लखमु शिंदे ह्यांनी १६९० च्या आसपास औरंगाबाद ते सोलापूर ह्या राजमार्गावर मोघलांना अक्षरश हैराण करून सोडले होते. ह्याच काळात लखमु शिंदेंनी रावदलपत बुंदेला व मामुरखान ह्यांच्या विरुद्ध भूम, माणेगाव, तुळजापूर येथे छापे घालून लुटालूट करत धावपळीच्या लढाया केल्या होत्या.
पुढे मात्र देवराई गावात ह्यांच्यात मोठी लढाई झाली ह्या लढाईत #लखमु_शिंदे_सोबत_तीन_हजार_स्वार होते. मात्र लढाईत अपयश येउन त्यांचे भाऊ बंद मारले गेले व ते स्वतः कैद झाले.ह्यांनंतर मात्र त्याचं बाबद्दल माहिती मिळत नाही.
हा विजय मोघलांस एवढा महत्वाचा होता की बादशाहने ह्या विजयाबद्दल राव दलपत बुंदेलाची मनसब ५०० ने वाढवली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...