भाग ३
पोस्टसांभार :रोहित शिंदे
पोस्टसांभार :रोहित शिंदे
सदर
यादी ही शिंदे पुरुषाची असली तरी माणकोजी दहातोंडे ह्यांचे नाव समाविष्ठ
करण्याचे कारण की त्यांचे पूर्वाश्रमीचे कुळ ही शिंदे च होते. व नन्तर
दहातोंडे हे उपणाम लागले.
माणकोजी
हे स्वराज्याचे प्रथम सरनौबत होते. त्यांनी भोसले कुळात शहाजी महाराज व
शिवाजी महाराज ह्या पितापुत्रांची तबबल ३५ वर्षे सेवा केली.
माणकोजींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा ह्या गावी इ.स. १५९२ रोजी झाला.
माणकोजींनी
सुरवातीस निजामशाहीत शहाजी राजांच्या पदरी राहून मोगलांच्या विरुद्ध अनेक
लढाया मारल्या. नन्तर पुढे सहजी महाराज कर्नाटकात गेल्यावर तेही तिकडे काही
काळ राहून नन्तर मात्र १६४२ मध्ये जिजाऊ मासाहेबांबरोबर देशावर आले. व
स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून नियुक्त झाले.
फत्तेखानाविरुद्ध पुरंदर च्या लढाईत मानकोजींचा सक्रिय सहभाग होता.
पुढे मानकोजींनी #लोहगड_व_विसापूर हे दोन गड स्वतः जिंकून घेतले होते.
मानकोजींनी
मोरेंच्या विरुद्ध जावळीच्या लढाईत व त्यांनतर अफजलखानाविरुद्ध प्रतापगड
च्या लढाईत दोन्हीवेळेस रणतोंडी चा घाट अडवून धरला होता. व त्यामार्गे
शत्रूची पूर्णपणे नाकेबंदी केली होती.
पुढे मात्र वयोमानामुळे त्यांनी शस्त्र खाली ठेवले. व जुलै - ऑगस्ट १६६२ मध्ये शिवापूर येथे त्यांचा मृत्यू झाला.
टीप -
काही इतिहास अभ्यासक / संशोधक तुकोजी चोर ह्यांस प्रथम सरनौबत मानतात.
व मानकोजींनी महाराजांच्या हुकुमाची नाफार्मनी केल्याने शिक्षेस पात्र ठरल्याचे उलकेख करतात
No comments:
Post a Comment